आज देशातील 14 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार
परतीच्या पावसाचा जोर वाढला
पुढील दोन तीन दिवस महत्वाचे
India Weather Update: कालप्रमाणेच आज देखील देशभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज देशभरातील अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने अलर्ट जारी केला आहे. पर्वतीय राज्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवस पूर्वेकडील राज्यांमध्ये तर महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस राजस्थान, पंजाब, गुजरात आणि अन्य भागात पावसासाठी अनुकूल आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्रातील कोंकण किनारपट्टी भागातील जिल्ह्यांमध्ये देखील जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, आसाम, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, तेलंगणा या राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशमधील 14 राज्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या राज्यांना अलर्ट जारी केला आहे. राजधानी दिल्लीत आज हवामान मोकळे राहण्याचा अंदाज आहे.
‘या’ राज्यांमध्ये मुसळधार
अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा राज्यात 21 सप्टेंबरपर्यंत सलग पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे भारतीय हवामान विभागाने मध्य प्रदेश, ओडीशा, विदर्भ, छत्तीसगड, झारखंडमध्ये आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात कोंकण, पश्चिम महाराष्ट्र, पुणे या भागात अति जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
India Rain Alert: परतीच्या पावसाचा देशभरात अक्षरशः धुमाकूळ; पुढचे काही तास…; IMD चा इशारा काय?
महाराष्ट्रात दोन दिवस मुसळधार
महाराष्ट्रातील कोंकण, पुणे, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ व मराठवाडा भागात कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे. पुढील दोन दिवस राज्याला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि कोंकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
‘या’ राज्यांत होणार मुसळधार
मुंबईसह पुण्यामध्ये त्याचबरोबर पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरीला देखील ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होणार असल्याची शक्यता हवामान विभागाने दर्शवली आहे. पुण्यामध्ये काही ठिकाणी काही ठिकाणी गजबजून वादळ, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस आणि वेगवेगळ्या ठिकाणी (३०-४० किमी प्रतितास) वेगाने वारे वाहतील असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.