राज्यात पावसाचे पुनरागमन होणार; मुंबईत पावसाचा जोर वाढणार, पुण्यासह सांगली, कोल्हापूरमध्ये तर...
नवी दिल्ली: देशभरात मान्सून सक्रिय झाला आहे. अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र दक्षिण भारतात जोरदार पाऊस कोसळत आहे. दरम्यान आज हवामान विभागाने देशातील कोणकोणत्या राज्यांना पावसाचा इशारा दिला आहे ते जाणून घेऊयात. पर्वतीय राज्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज आहे. बिहार. उत्तर प्रदेशमध्ये देखील जोरदार पाऊस होऊ शकतो.
मुसळधार पावसामुळे अनेक राज्यांमध्ये वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले आहेत. सखल भागात पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा देखील प्रभावित झाली आहे. उत्तर प्रदेशमध्ये गंगा नदी दुथडी भरून वाहत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये आज पावसाची शक्यता कमी आहे. मात्र प्रयागराजमध्ये सकाळपासून पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीत आज आणि उद्या हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे.
पर्वतीय राज्यांमध्ये कोसळधार
गेले अनेक दिवस उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक नद्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. राष्ट्रीय महामार्ग बंद आहेत, नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पर्वतीय राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच नदीकाठच्या व सर्व नागरिकांना सावधान राहण्याचा सूचना देखील देण्यात आल्या आहेत.
‘या’ राज्यांमध्ये होणार मुसळधार पाऊस
भारतीय हवामान विभागाने आज अनेक राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जम्मू काश्मीर, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, चंदीगड, दिल्ली या राज्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra Rain Alert: पुढील तीन तास महत्वाचे; कोकण, पुण्यासह ‘या’ भागात पाऊस तांडव करणार, सतर्कतेचा इशारा
मोडक सागर, मध्य वैतरणा, तानसा धरणातुन विसर्ग सुरू
मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात पाणी पुरवठा करणाऱ्या मोडक सागर, मध्य वैतरणा आणि तानसा या धरणातुन अनुक्रमे ४४८८.२५, २०१२.६७ आणि ३३१५.२५ क्युसेक इतका विसर्ग सुरू आहे. आपत्तीच्या अनुषंगाने प्रशासनातर्फे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांना संभाव्य आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. विदर्भात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. मराठवाड्यातील काही जिल्हे अजून पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आहे.