Imtiaz Ahmed Magre helped terrorists jumping into river video viral pahalagam attack
कुलगाम : जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेमध्ये वाढ करण्यात आली आहे. पहलगाम हल्ल्यामध्ये 27 निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे भारताकडून आक्रमक भूमिका घेतली जात आहे. भारताकडून आरोपींची धरपकड केली जात असून आरोपींची कसून चौकशी केली आहे. दरम्यान, दहशतवाद्यांना अन्न आणि पाणी दिल्याचा आरोप एका तरुणावर होता. याला लष्कराने ताब्यात घेतले होते. मात्र चौकशीदरम्यान त्याने पळ काढून नदीमध्ये उडी घेतली. या तरुणाचे नदीमध्ये मृत्यू झाला आहे. मृत आरोपी तरुणाच्या कुटुंबियांनी लष्कारावर गंभीर आरोप केले आहेत.
दहशतवाद्यांना मदत करणारा आणि त्यांना राहण्यासाठी जागा देण्याऱ्या आरोपीचे नाव इम्तियाज अहमद मागरे असे या तरुणाचे नाव आहे. 23 वर्षीय या तरुणावर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे त्याला जम्मू काश्मीर पोलिसांनी ताब्य़ात घेतले होते. या चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबुल देखील केला होता. मीडिया रिपोर्टनुसार, कुलगाम जिल्ह्यातील तंगमार्ग येथील जंगलामध्ये तो दहशतवाद्यांना मदत करत होता. दहशतवाद्यांना अन्न देणे, रसद पुरवणे आणि इतर प्रकारची मदत इम्तियाज अहमद मागरे करत होता. याबाबत त्याने चौकशीमध्ये कबुली देखील दिली होती.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
याच प्रकरणामध्ये सुरक्षा यंत्रणाने त्याला ताब्यात घेतले होते. मात्र दुसऱ्याच दिवशी इम्तियाज अहमद मागरे याचा मृतदेह आढळला आहे. इम्तियाज अहमद मागरे याने अतिरेकी लपलेल्या ठिकाणी घेऊन जाण्याचे मान्य केले. मात्र त्यानंतर नदीमध्ये उडी मारल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. त्याने नदीमध्ये उडी मारली असल्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. सोशव मीडियावर याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मात्र मागरे कुटुंबियांनी सुरक्षा यंत्रणावर गंभीर आरोप करुन त्याच्या मृत्यूच्या तपासाची मागणी केली आहे.
पहलगाम हल्ल्याच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मागरेचे कुटुंबिय आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. इम्तियाज मागरे याचा कोठडीत मृत्यू झाला असावा, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी व्यक्त केला आहे. राज्याच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्या सकिना इटू यांनी रविवारी मागरेच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि त्यांनी या मृत्यूचा तपास व्हावा अशी मागणी केली. सकिना इटू म्हणाल्या, “राज्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून हे दुर्दैवी आहे. मी नायब राज्यपालांना विनंती करते की, त्यांनी या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. इम्तियाज अहमाद रातून नेण्यात आले आणि आज त्यांचा मृतदेह सापडला.”