Photo Credit- X@ANI कश्मीरमध्ये पुन्हा मोठ्या हल्ल्याची तयारी? गुप्तचर यंत्रणांकडून हाय अलर्ट जारी
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपास सुरू असतानाच जम्मू आणि काश्मीरमधून महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. जम्मू-कश्मीरमध्ये पुन्हा एकदा मोठा दहशतवादी कट रचला जात असल्याचे आढळून आले आहे. केंद्रशासित प्रदेशातील तुरुंगांवर हल्ल्याच्या शक्यतेची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. महत्त्वाची बाब म्हणाजे सुरक्षा दलांना पूंछमध्ये दहशतवाद्यांचा एक अड्डाही सापडला आहे जिथून टिफिन बॉक्समध्ये (Improvised explosive device)आयईडी जप्त करण्यात आले आहेत. सध्या याबद्दल अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जम्मू आणि काश्मीरच्या तुरुंगांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. या माहितीच्या पार्श्वभूमीवर तुरुंग परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवादी जम्मूमधील कोट बलवाल तुरुंग आणि श्रीनगर मध्यवर्ती तुरुंगाला लक्ष्य करू शकतात, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. मोठ्या दहशतवाद्यांपासून ते स्लीपर सेल सदस्यांपर्यंत, सर्वजण या तुरुंगात कैद असल्यामुळे या तुरुंगांना लक्ष्य केले जाऊ शकते, असेही बोलले जात आहे.
पहलगाम हल्ल्यातील मोठा सुगावा NIAच्या हाती…; कोण आहे का मुश्ताक अहमद जरगर?
गुप्तचर माहितीच्या आधारे, तुरुंगांच्या सुरक्षेचा आढावा घेतला जात आहे आणि कोणतीही घटना टाळण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. त्यासाठी सीआयएसएफच्या डीजींनी परिस्थितीतीचा आढावा घेण्यासाठी श्रीनगरमधील उच्च सुरक्षा अधिकाऱ्यांची भेट घेतली. २०२३ मध्ये, जम्मू आणि काश्मीरमधील तुरुंग सीआरपीएफकडून सीआयएसएफकडे सोपवण्यात आले होते.
Jammu & Kashmir | Hideout busted in Hari Marote village in Surankot sector of Poonch district with recovery of five IEDs, say Poonch Police
(Source: Poonch Police) pic.twitter.com/HO36EbKPza
— ANI (@ANI) May 5, 2025
दुसरीकडे, संयुक्त कारवाईत, सैन्य आणि जम्मू-काश्मीर पोलिसांना पूंछच्या सुरनकोटमध्ये दहशतवाद्यांचे लपण्याचे ठिकाण शोधून काढण्यात यश आले आहे. या कारवाईदरम्यान सैन्याला तीन टिफिन बॉक्स आणि दोन लोखंडी बादल्यांमध्ये IED आढळून आले आहे.
पहलगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी दक्षिण काश्मीरमध्ये लपून बसले आहेत आणि सक्रिय आहेत असे संकेत मिळाले असल्याची माहिती एनआयए च्या सुत्रांकडून मिळाली आहे. या भागात आणखी दहशतवादी लपून बसल्याची विश्वसनीय माहिती आहे. बैसरनमधील हल्ल्यादरम्यान काही अंतरावर इतर दहशतवादी उपस्थित होते आणि त्यांनी कव्हर फायर देऊन दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला असावा असाही संशय सुत्रांकडून व्यक्त केला जात आहे.