नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या ईशान्य भागात एकाच वेळी ६ जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. ईशान्य दिल्लीतील शास्त्री पार्क येथील घरात गुरुवारी रात्री एका कुटुंबातील आठपैकी सहा जणांचा गुदमरून मृत्यू झाला. मृत्यूचे कारण डासांपासून बचाव करणाऱ्या कॉईलबद्दल सांगितले जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. कॉइलमुळे उशीला आग लागली, त्यामुळे दोन जण भाजून मरण पावले, तर उर्वरित 4 जणांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.