Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

राज्यात दिवसाचे कमाल तापमान हळूहळू वाढत असले तरी किमान तापमान कमी असल्याने सकाळ-रात्री गारवा कायम आहे आणि कडक उन्हाची तीव्रता अजून जाणवत नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 15, 2026 | 02:30 PM
कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

कडक उन्हाची अजून प्रतीक्षा! किमान तापमानामुळे राज्यात गारवा कायम, हवामानाचा बदलता अंदाज

Follow Us
Follow Us:
  • सकाळच्या वेळेत काही ठिकाणी धुके किंवा धुरकट वातावरण
  • लोणावळा-लोणगाव परिसरात रात्रीची थंडी कायम
  • अमरावती येथे कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले
राज्यात दिवसाच्या कमाल तापमानात हळूहळू वाढ होत असली तरी सकाळ-रात्रीच्या किमान तापमानात अजूनही थंडावा टिकून आहे. त्यामुळे कडक उन्हाची तीव्र झळ अद्याप जाणवत नाही. बहुतांश भागांत उन्हाची तिरीप सहनीय असून, आकाश मुख्यतः निरभ्र असण्याने भर पडली आहे. दरम्यान, सकाळच्या वेळेत काही ठिकाणी धुके किंवा धुरकट वातावरण अनुभवायला मिळत आहे.

Raigad News: माथेरानमध्ये वाद पेटला! हात रिक्षाचालकांना ई-रिक्षा नाही, नेमकं काय आहे प्रकरण? वाचा सविस्तर

उन्हाची चाहूल पण गारव्याची साथ!

मध्य महाराष्ट्रात पुणे, नगर, नाशिक, सातारा, सांगली परिसरात कमाल तापमान साधारण ३२ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले गेले आहे. अहमदनगर येथे किमान तापमान सुमारे १३.७ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरल्याने पहाटे गारवा जाणवत आहे. सोलापूर, लोणावळा-लोणगाव परिसरातही दिवसाचे तापमान वाढत असले तरी रात्रीची थंडी कायम आहे, तर कोकण पट्टयात मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये कमाल तापमान ३२ ते ३४ अंशांच्या आसपास असून किमान तापमान १९ ते २२ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

किमान तापमानात फारशा बदलाची शक्यता कमी

विदर्भात उष्णतेचा चढता आलेख दिसत असून अमरावती येथे कमाल तापमान सुमारे ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. अकोला, वर्धा, ब्रह्मपुरी, चंद्रपूर भागातही ३४ ते ३५ अंशांच्या आसपास तापमान नोंदले गेले आहे, मात्र किमान तापमान १६ ते १८ अंशांच्या दरम्यान असल्याने रात्रीची थंडी अजून कायम आहे. हवामान तज्ज्ञांच्या मते, पुढील काही दिवसांत दिवसाच्या तापमानात हळूहळू वाढ होण्याची शक्यता असून, किमान तापमानात फारसा बदल होणार नाही. त्यामुळे राज्यात उन्हाच्या झळा पूर्णपणे जाणवायला अजून काही काळ लागणार असून, तोपर्यंत उन्हाची तिरिप सहनीयच राहणार आहे.

Raigad News: आरोग्यसेवेचा गंभीर प्रश्न! ‘आपला दवाखाना’ नावापुरताच? सुविधांच्या अभावामुळे रुग्ण झाले हैराण

गारवा राखण्यास किमान तापमानाचा ‘रोल’ मुख्य

राज्यात अनेक ठिकाणी दिवसाचे कमाल तापमान ३३ ते ३६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचत असले, तरी किमान तापमान १३ ते १८ अंशांदरम्यान टिकून आहे. हाच घटक सध्या गारवा राखण्यास निर्णायक ठरत आहे. किमान तापमान कमी असल्याने रात्री व पहाटे थंडावा जाणवतो. किमान तापमानात मोठी वाढ झाल्यासव उकाडा व कडक उन्हाची झळ तीव्रतेने जाणवू लागते. म्हणूनच, सध्या राज्यात उन्हाची तिरिप सहनीय राहण्यामागे किमान तापमानाचा मुख्य रोल’ असल्याचे हवामान तज्ज्ञ स्पष्ट करतात.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Waiting for the heatwave cooler nights keep temperatures pleasant across the state mumbai news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 02:30 PM

Topics:  

  • Maharashtra Temperature
  • Mumbai News
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी
1

मुंबई हायकोर्ट लिपिक टायपिंग टेस्टमध्ये कल्याण केंद्रावर गोंधळ; विद्यार्थ्यांचे आंदोलन, पुनर्परीक्षेची मागणी

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला
2

मुंबईसह छोट्या शहरांनाही वाहतूककोंडीचा विळखा; गर्दीच्या वेळी वाहनांचा वेग १५ किमीपर्यंत घटला

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो
3

बुलेट ट्रेनचा वेग वाढणार, देखभालीचीही जय्यत तयारी; 3 शहरांत उभारले जाणार अत्याधुनिक डेपो

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4

Raigad News: स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी राष्ट्रध्वज उलटा फडकवला; ग्रामविकास अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.