
देशाच्या अनेक राज्यात २०२५ चा सूर्य मावळला! (Photo Credit- X)
भारतातील शेवटचा सूर्यास्त: भक्ती आणि उत्साहाचे वातावरण
मुंबई: देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेटवे ऑफ इंडिया आणि मरिन ड्राईव्ह येथे पर्यटकांनी मावळत्या सूर्याला निरोप देत २०२६ च्या स्वागताची तयारी सुरू केली आहे.
#WATCH | Maharashtra: Visuals of the last sunrise of the year 2025, from Mumbai’s Gateway of India. pic.twitter.com/myrA9gJkcl — ANI (@ANI) December 31, 2025
देशभरातील २०२५ सालच्या शेवटच्या सूर्यास्ताची दृश्ये
Watch: Visuals of the final sunset of 2025 from across the country pic.twitter.com/ZJdHgqRxkE — IANS (@ians_india) December 31, 2025
नवी मुंबईतील २०२५ सालच्या शेवटच्या सूर्यास्ताचे दृश्य
Navi Mumbai, Maharashtra: Visuals of the last sunset of 2025 from Navi Mumbai pic.twitter.com/aX2MTOjQbM — IANS (@ians_india) December 31, 2025
प्रभू श्रीरामांच्या नगरीत, अयोध्येच्या सरयू घाटावर २०२५ चा अखेरचा सूर्यास्त झाला. हे विलोभनीय दृश्य पाहण्यासाठी आणि शरयू नदीच्या आरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भगवान जगन्नाथांचे शहर असलेल्या पुरी (ओडिशा) मध्ये अथांग सागराच्या किनारी आणि पश्चिम बंगालमधील जलपाईगुडी येथे नागरिकांनी वर्षातील शेवटचा सूर्यास्त अनुभवला.
जगात २०२६ ची पहिली पहाट: किरिबाती आणि न्यूझीलंड अग्रभागी
जगातील वेळेच्या गणितानुसार, काही देशांमध्ये २०२६ चे आगमन आधीच झाले आहे. पॅसिफिक महासागरातील किरिबाती (Kiribati) हा २०२६ चे स्वागत करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. येथील लाईन आयलंडमध्ये मध्यरात्रीचे १२ वाजताच नवीन वर्षाच्या उत्सवाचा अधिकृत प्रारंभ झाला.
न्यूजीलैंड के ऑकलैंड में आधिकारिक तौर पर 2026 की शुरुआत हुई. #HappyNewYear #HappyNewYear2026 pic.twitter.com/PrLPXkVIfw — Versha Singh (@Vershasingh26) December 31, 2025
न्यूझीलंडमध्येही मध्यरात्रीचे १२ वाजले असून ऑकलंडमधील ‘स्काय टॉवर’वर फटाक्यांची भव्य आतषबाजी करून नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले.
उत्सवाचा जागतिक प्रवास
नवीन वर्षाचा हा प्रवास आता पॅसिफिक बेटांकडून ओशनियाच्या काही भागातून पूर्व आशियाकडे सरकेल. त्यानंतर दक्षिण आशिया (भारत), आग्नेय आशिया, मध्य पूर्व, युरोप, आफ्रिका आणि शेवटी अमेरिकेपर्यंत हा उत्साह पोहोचेल. जगातील सर्वात शेवटी नवीन वर्षाचे स्वागत अमेरिकेतील हॉवलँड आणि बेकर आयलंड येथे होईल. भारतात आता मध्यरात्रीच्या १२ ची प्रतीक्षा असून, दिल्ली, मुंबई, बंगळुरू आणि गोव्यासारख्या शहरांमध्ये कडक सुरक्षेत नवीन वर्षाच्या स्वागताचा जल्लोष सुरू झाला आहे.