Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता मदरशांमध्येही गिरवले जाणारा रामायणाचे धडे; विशेष शिक्षकांची नियुक्ती

उत्तराखंडातील मदरशांमध्येही रामायण धडे गिरवले जाणार आहे. यामुळे मुस्लीम मुलांना या संस्कृतीविषयी माहिती कळेल आणि त्यांनी इतिहास समजेल अशी भूमिका वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घेत ही घोषणा केली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 27, 2024 | 06:59 PM
आता मदरशांमध्येही गिरवले जाणारा रामायणाचे धडे; विशेष शिक्षकांची नियुक्ती
Follow Us
Close
Follow Us:

उत्तराखंड : अयोध्येमध्ये (Ayodhya) राम मंदिर उद्घाटन (Ram Mandir Inauguration) सोहळा पार पडल्यानंतर देशभर उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र रामनाम घेतले जात आहे. दरम्यान, उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. उत्तराखंडातील मदरशांमध्येही रामायण (Ramayan) धडे गिरवले जाणार आहे. यामुळे मुस्लीम मुलांना या संस्कृतीविषयी माहिती कळेल आणि त्यांनी इतिहास समजेल अशी भूमिका वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी घेत ही घोषणा केली आहे. त्यांना अनेकांना विरोध दर्शवण्यात आला असला तरी ते आपल्या निर्णयावर ठाम (Ramayan lectures in Madrasahs) असल्याचे देखील शादाब शम्स यांनी सांगितले.

उत्तराखंडातील 117 मदरशांमध्ये हे रामायणाचे शिक्षण दिले जाणार आहे. त्याचबरोबर संस्कृत, वेद, पुराणं याचे देखील शिक्षण दिले जाणार आहे. रामायण शिकवण्यासाठी मदरशांमध्ये विशेष शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांच्यामार्फत मुलांना पुस्तकांच्या माध्यमातून श्रीरामाच्या चारित्र्याची ओळख करून दिली जाणार आहे. यापूर्वी शादाब शम्स यांनी सांगितले होते की, आतापासून मदरशांमध्येही संस्कृतचे शिक्षण दिले जाईल, तर मदरसा बोर्डाचे अध्यक्ष डॉ. काझमी यांनी मदरशांमध्ये मुलांना वेदांचे ज्ञान देण्याबाबतही सांगितले होते. या विधानांना मोठा विरोध झाला असला तरी आता मंडळाकडून रामायण शिकविण्याची चर्चा सुरू झाली आहे.

उत्तराखंडमधील मदरशांमध्ये रामायण शिकवण्याच्या निर्णयावर ठाम असलेल्या वक्फ बोर्डाचे अध्यक्ष शादाब शम्स यांनी याबाबत विश्वास व्यक्त केला आहे. ते म्हणाले, “मदरशांमध्ये रामायण वाचल्याने मुलांना त्यांच्या संस्कृतीशी जोडण्याची संधी मिळेल. मुलांना श्रीरामचे चरित्र जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. शादाब शम्स यांच्या या वक्तव्याचे पडसाद राजकारणावरही पडले आहेत. या निर्णयाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत, तर मदरशांमध्ये रामायण नक्कीच शिकवले जाईल, असे बोर्डाने स्पष्ट केले आहे. या निर्णयाला विरोध होत असला तरी, या निर्णयाची अंमलबजावणी थांबवता येणार नाही” असंही ते म्हणाले.

Web Title: In uttarakhand decision was taken for this reason that the recitation of ramayana will now be taught in madrasas nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 27, 2024 | 06:59 PM

Topics:  

  • ayodhya
  • Ram Mandir Inauguration
  • Uttarakhand

संबंधित बातम्या

“मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडवा..कोणतीही मशीद बांधली जाणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने फुटले वादाला तोंड
1

“मुस्लिमांनी अयोध्या जिल्हा सोडवा..कोणतीही मशीद बांधली जाणार नाही; भाजप नेत्याच्या वक्तव्याने फुटले वादाला तोंड

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश
2

अयोध्यामध्ये प्रस्तावित मस्जिदचा आरखडा नाकारला, सर्वोच्च न्यायालयाने राममंदिराऐवजी बांधकाम करण्याचे दिले होते आदेश

IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…
3

IMD Heavy Rain Alert: अरे बाबा आता थांब रे! उत्तराखंडमध्ये पाऊस करणार कहर; तर ‘या’ राज्यांमध्ये…

Uttarakhand Disaster : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर; पुनर्वसनासाठी केंद्राकडून मोठ्या मदतीचे संकेत
4

Uttarakhand Disaster : पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर; पुनर्वसनासाठी केंद्राकडून मोठ्या मदतीचे संकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.