Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Afganistan News: जम्मू-कश्मीरबाबत आफगाणिस्तान मंत्र्यांचे मोठं विधान; पाकिस्तानला मिर्ची झोंबली

२०२१ मध्ये सत्तेत आल्यानंतर उच्चस्तरीय अफगाणिस्तानच्या नेत्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर आले आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 12, 2025 | 09:43 AM
India-Afganistan News: जम्मू-कश्मीरबाबत आफगाणिस्तान मंत्र्यांचे मोठं विधान; पाकिस्तानला मिर्ची झोंबली
Follow Us
Close
Follow Us:
  • अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर
  • ‘जम्मू-कश्मीर हा भारताचे अविभाज्य राज्य’
  • दहशतवादी कारवायांसाठी अफगाणिस्ताना भूभाग वापरू देणार नाही
India-Afganistan News: अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी आमिर खान मुत्ताकी भारत दौऱ्यावर होते. त्यांच्या या दौऱ्यादरम्यान, आमिर मुत्ताकी यांच्या एका विधानाने पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आमिर खान मुत्ताकी यांनी, ‘जम्मू-कश्मीर हा भारताचे अविभाज्य राज्य’ असल्याचे विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाने पाकिस्तानला चांगलाच झटका बसला आहे

भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनामुळे दोन्ही देशांमधील संबंधांना नवे परिमाण लाभले असून द्विपक्षीय सहकार्याचा एक नवीन अध्याय सुरू झाला आहे. मात्र, या निवेदनावर पाकिस्तानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या निवेदनामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान काहीसा एकटा पडला आहे. पाकिस्तानने या विधानाला आपल्या सार्वभौमत्वावर हल्ला ठरवत तीव्र आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही देशांदरम्यान वाढणाऱ्या रणनीतिक आणि आर्थिक सहकार्यामुळे या भागातील राजनैतिक समीकरणांमध्येही बदल घडू शकतात, अशी चर्चा सुरू आहे.

२०२१ मध्ये सत्तेत आल्यानंतर उच्चस्तरीय अफगाणिस्तानच्या नेत्याचा हा पहिलाच भारत दौरा आहे. अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री मौलवी अमीर खान मुत्ताकी ९ ते १६ ऑक्टोबर दरम्यान भारत दौऱ्यावर आले आहेत. आमिर मुत्ताकी आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यातील चर्चेनंतर, १० ऑक्टोबर रोजी एक संयुक्त निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात प्रादेशिक शांतता, दहशतवादाविरुद्ध सहकार्य आणि परस्पर विश्वास यावर भर देण्यात आला. त्याचवेळी निवेदनात जम्मू आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून संबोधण्यात आले, ज्यामुळे पाकिस्तान संतप्त झाला.

पाकिस्तानने तीव्र निषेध नोंदवला

भारत-अफगाणिस्तान संयुक्त निवेदनामुळे संतप्त झालेल्या पाकिस्तानने इस्लामाबादमधील अफगाण राजदूताला बोलावून नाराजी व्यक्त केली. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की जम्मू आणि काश्मीरला भारताचा भाग म्हणून वर्णन करणे हे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांचे उघड उल्लंघन आहे. दहशतवाद हा पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न असल्याचे अफगाणिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या विधानावरही पाकिस्तानने आक्षेप घेतला. पाकिस्तानने दावा केला की ते अफगाणिस्तान सरकारला अफगाणिस्तानच्या भूमीवरून कट रचणाऱ्या दहशतवादी गटांबद्दल सतत माहिती देत ​​आहे.

भारत-अफगाणिस्तान करार

भारत आणि अफगाणिस्तानने जारी केलेल्या संयुक्त निवेदनात दोन्ही देशांनी दहशतवादाविरुद्ध ठाम भूमिका घेतली आहे. अफगाणिस्तानने भारताला आश्वासन दिले आहे की, भारताविरुद्ध कोणत्याही दहशतवादी कारवायांसाठी त्याचा भूभाग वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. दोन्ही देशांनी सर्व प्रकारच्या दहशतवादी कृतींचा तीव्र निषेध नोंदवला आहे.

भारताने अफगाणिस्तानातील आरोग्य क्षेत्राच्या विकासासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा केली आहे. यामध्ये काबूलमधील इंदिरा गांधी बाल आरोग्य संस्थेत थॅलेसेमिया केंद्र उभारणे, विविध प्रांतांमध्ये निदान प्रयोगशाळा, रुग्णालये आणि प्रसूती आरोग्य क्लिनिक उभारणीचा समावेश आहे. या भेटीनंतर अफगाण परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांनी भारत-अफगाणिस्तान संबंधांचे भविष्य “उज्ज्वल आणि परस्पर हितकारक” असल्याचे सांगितले.

 

 

 

Web Title: India afganistan news afghanistan ministers big statement on jammu and kashmir pakistans anger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2025 | 09:43 AM

Topics:  

  • Afganistan
  • india

संबंधित बातम्या

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?
1

“भारताचा विकास झाला तर शेजारील देशांचेही…”, बांगलादेश आणि परराष्ट्र धोरणाबाबत काय म्हणाले एस. जयशंकर?

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?
2

Secret Meeting : भारत-जमात ‘सिक्रेट’ खलबतं! शफीकुर रहमान यांचा खळबळजनक खुलासा; ढाकामध्ये नेमकं काय शिजतंय?

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने
3

IND vs PAK: २०२६ मध्ये पाकिस्तानला नमवण्यासाठी टीम इंडिया सज्ज! ‘या’ दिवशी येणार आमनेसामने

Mutual Fund: म्युच्युअल फंडांचा झपाटा कायम! २०२५ मध्ये एयूएम ८१ लाख कोटींवर
4

Mutual Fund: म्युच्युअल फंडांचा झपाटा कायम! २०२५ मध्ये एयूएम ८१ लाख कोटींवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.