Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘INDIA’ उमेदवार सुदर्शन रेड्डी यांचे आज नामांकन, भाजपने राज्यसभेत जारी केला व्हीप

९ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यावेळी अनेक विरोधी नेतेही उपस्थित राहतील.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 21, 2025 | 09:49 AM
उपराष्ट्रपती पदासाठी आज करणार अर्ज दाखल (फोटो सौजन्य - X.com)

उपराष्ट्रपती पदासाठी आज करणार अर्ज दाखल (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Close
Follow Us:
  • बी सुदर्शन रेड्डी कऱणार आज अर्ज दाखल 
  • उपराष्ट्रपतीपदाची रेस 
  • कोण मारणार बाजी?

विरोधी पक्षाचे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार बी सुदर्शन रेड्डी आज म्हणजेच गुरुवारी सकाळी ११:३० वाजता आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि रामगोपाल यादव यांच्यासह इंडिया ब्लॉकचे अनेक नेते उपस्थित राहतील असे सांगण्यात येत आहे. ८० विरोधी खासदारांनी प्रस्तावक आणि समर्थक म्हणून स्वाक्षऱ्या केल्या आहेत. सोनिया गांधी यांचेही नाव यात समाविष्ट आहे (फोटो सौजन्य – X@INCINDIA)

विरोधी पक्षाकडून बी सुदर्शन रेड्डी यांचा सन्मान

नामांकनापूर्वी बी सुदर्शन यांनी विरोधी आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. इंडिया अलायन्सने संविधान सदनच्या सेंट्रल हॉलमध्ये बी. सुदर्शन रेड्डी यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता जिथे मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी, राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत यांसारखे सर्व मोठे नेते आणि विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि शरद पवार यांसारख्या अनेक नेत्यांनी प्रथम सुदर्शन रेड्डी यांचा सन्मान केला.

सी पी राधाकृष्णन यांनी केला उपराष्ट्रपती पदाचा उमेदवारी अर्ज दाखल; PM मोदी बनले प्रस्तावक

सीपी राधाकृष्णन यांनी अर्ज दाखल केला

यापूर्वी, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांनी बुधवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नामांकन प्रक्रियेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. सीपी राधाकृष्णन यांनी चार संचांमध्ये नामांकन दाखल केले आहे, ज्याच्या प्रत्येक संचावर २० प्रस्तावक आणि २० समर्थकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. पंतप्रधान मोदी मुख्य प्रस्तावक होते. पंतप्रधान मोदींनी पहिल्या संचावर मुख्य प्रस्तावक म्हणून स्वाक्षरी केली आहे.

NDA उमेदवाराचा विजय जवळजवळ निश्चित

आता तुम्ही उपराष्ट्रपती निवडणुकीचा नंबर गेम कसा आहे याबाबत खरं तर जाणून घेण्याची गरज आहे. यावेळी इलेक्टोरल कॉलेजमध्ये एकूण ७८२ खासदार आहेत. यापैकी ५४२ लोकसभा खासदार आहेत तर राज्यसभेच्या खासदारांची संख्या २४० आहे. पाठिंब्याबद्दल बोलायचे झाले तर, एनडीएला ४२२ खासदारांचा पाठिंबा आहे तर विरोधी पक्षाला एकूण ३१२ खासदारांचा पाठिंबा आहे… तर विजयासाठी ३९१ खासदारांची आवश्यकता आहे. यानुसार, एनडीए उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आता सर्व लक्ष विजयाचे अंतर किती आहे यावर आहे. त्यामुळे बी सुदर्शन रेड्डी काय कमाल करणार याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Vice President Election 2025: कधी बिनविरोध, कधी काट्याची टक्कर; उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकांचा राजकीय इतिहास

कोण आहेत बी सुदर्शन रेड्डी?

  • बी सुदर्शन रेड्डी यांचा जन्म ८ जुलै १९४६ रोजी सध्याच्या तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील तत्कालीन इब्राहिमपट्टणम तालुक्यातील अकुला मैलाराम गावात एका शेतकरी कुटुंबात झाला
  • त्यांनी १९७१ मध्ये हैदराबादच्या उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी मिळवली आणि आंध्र प्रदेश बार कौन्सिलमध्ये वकील म्हणून प्रवेश घेतला. त्यानंतर त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात रिट आणि दिवाणी खटल्यांमध्ये प्रॅक्टिस केली
  • बी सुदर्शन रेड्डी यांनी १९८८ ते १९९० दरम्यान आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सरकारी वकील म्हणून काम केले आहे आणि १९९० मध्ये काही काळ केंद्राचे अतिरिक्त स्थायी वकील म्हणूनही काम केले आहे. ते उस्मानिया विद्यापीठाचे कायदेशीर सल्लागार आणि स्थायी वकील देखील होते
  • ते १९९५ मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश झाले. २००५ मध्ये त्यांना गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यात आले. २००७ मध्ये ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले आणि २०११ मध्ये निवृत्त झाले
  • न्यायाधीश रेड्डी (निवृत्त) मार्च २०१३ मध्ये गोव्याचे पहिले लोकायुक्त बनले. तथापि, काही महिन्यांनंतर सप्टेंबरमध्ये त्यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला.

Web Title: India bloc candidate b sudarshan reddy to files nomination for vice president election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2025 | 09:49 AM

Topics:  

  • C. P. Radhakrishnan
  • NDA
  • Vice President Election

संबंधित बातम्या

Bihar Election: सीट शेअरिंग दरम्यान चिराग पासवानच्या पक्षाची तात्काळ बैठक, NDA मध्ये धुसफूस?
1

Bihar Election: सीट शेअरिंग दरम्यान चिराग पासवानच्या पक्षाची तात्काळ बैठक, NDA मध्ये धुसफूस?

Bihar Assembly Election 2025: NDA मजबूत असलेल्या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान; तर महाआघाडी दोन गटात विभागली
2

Bihar Assembly Election 2025: NDA मजबूत असलेल्या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान; तर महाआघाडी दोन गटात विभागली

Bihar Elections 2025 : बिहार निवडणुकीत येणार रंगत; महागठबंधन आणि एनडीएमध्ये थेट लढत, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला… :
3

Bihar Elections 2025 : बिहार निवडणुकीत येणार रंगत; महागठबंधन आणि एनडीएमध्ये थेट लढत, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला… :

Jagdeep Dhankhar in Raj Bhavan : अखेर झालं जगदीप धनखड यांचं दुर्लभ दर्शन; राजीनाम्यानंतर पहिल्यादाच दिसले कार्यक्रमात
4

Jagdeep Dhankhar in Raj Bhavan : अखेर झालं जगदीप धनखड यांचं दुर्लभ दर्शन; राजीनाम्यानंतर पहिल्यादाच दिसले कार्यक्रमात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.