उपराष्ट्रपती पदासाठी एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला (फोटो - सोशल मीडिया)
c p radhakrishnan : नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरु आहे. एनडीएकडून सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी देण्यात आली. अनेक नावे चर्चेमध्ये असताना भाजपने नेहमीप्रमाणे धक्कातंत्र वापरत सी पी राधाकृष्णन यांना उमेदवारी जाहीर केली. सी पी राधाकृष्णन हे महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल देखील आहेत. दरम्यान, सी पी राधाकृष्णन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील उपस्थित होते.
सी पी राधाकृष्णन यांचा उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सीपी राधाकृष्णन यांच्या नावाचे प्रस्तावक बनले आहेत. यावेळी भाजपचे सर्व वरिष्ठ नेते तसेच समर्थक नेते उपस्थित होते. सीपी राधाकृष्णन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, केंद्रीय मंत्री जितन राम मांझी, चिराग पासवान यांच्या उपस्थितीत उपराष्ट्रपती पदासाठी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.
बातमी अपडेट होत आहे.