आता एक ऑर्डर अन् चीन पाकिस्तानची वीतभर...; भारताने केली 'या' घातक मिसाईलची यशस्वी चाचणी
नवी दिल्ली: गेले काही वर्षांपासून भारत सरकार देशाच्या संरक्षण क्षेत्रावर जास्त प्रमाणात काम करत आहे. स्वदेशी हत्यारे बनवण्यात देखील भर दिला जात आहे. बजेटमध्ये देखील संरक्षण क्षेत्रासाठी मोठी रक्कम दिली जात आहे. नुकतेच भारताने एका घातक मिसाईलची यशस्वी चाचणी केली आहे. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानची चिंता वाढली आहे.
भारताने नुकतेच एका मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. डीआरडीओ संस्थेने नुकतेच एक हायपरसोनिक क्रूज मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. या क्षेपणास्त्राच्या रेंजमध्ये चीन आणि पाकिस्तानची महत्वाची शहरे देखील येत असल्याने आता दोन्ही शत्रू राष्ट्रांची चिंता वाढली आहे.
डीआरडीओ संस्थेने हायपोरसोनिक क्रूज मिसाईल (ET-LDHCM) ची चाचणी केली आहे. ही मिसाईल प्रोजेक्ट विष्णूच्या अंतर्गत तयार करण्यात आले आहे. ज्याचा वेग, रेंज भारताच्या संरक्षण क्षेत्रात एक बळकटी निर्माण करायला मदतशीर ठरणार आहे. या मिसाईलच्या बाबतीत अधिक माहिती जाणून घेऊयात.
(ET-LDHCM) मिसाईल काय आहे?
(ET-LDHCM) हे एक स्वदेशी बनावटीची मिसाईल आहे. हे मिसाईल प्रोजेक्ट विष्णूच्या अंतर्गत तयार करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे मिसाईल भारताच्या ब्रह्मोस मिसाईलपेक्षा अत्यंत घातक आहे. भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये ब्रह्मोसचा वापर केला होता. या मिसाईलची निर्मिती भारताच्या आधुनिकीकरणातील एक भाग आहे.
मिसाईलची विशेषणे काय?
भारताचे हे नवीन हायपरसोनिक मिसाईल मॅक 8 च्या वेगाने उड्डाण करू शकते. सोप्या शब्दात हे मिसाईल ११,००० किमी प्रतितास वेगाने शत्रूच्या ठिकाणांवर पोहोचू शकते. याची मारक क्षमता १,५०० किमी इतकी आहे. हे मिसाईल हवेतूनच ऑक्सिजन घेऊन फ्युएल भरते. हे मिसाईल २००० किलोच्या आसपास न्युक्लिअर शस्त्रे वाहून नेऊ शकते. हे मिसाईल तीनही जागांवरून लाँच केले जाऊ शकते. आपली दिशा देखील ते बदलू शकते. म्हणजेच हे शत्रूच्या एअर डिफेन्स सिस्टिमला चकवा देण्यात सक्षम आहे.
हे मिसाईलच्या रेंजमध्ये पाकिस्तानमधील रावळपिंडी, कराची, लाहोर आणि अन्य महत्वाची ठिकाणे येतात. तर हे मिसाईल लडाख किंवा अरुणाचल प्रदेशमधून लाँच केल्यास चीनमधील अनेक मोठी शहरे या द्वारे लक्ष्य केली जाऊ शकतात.