Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manmohan Singh Death : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन; AIIMS मध्ये घेतला अखेरचा श्वास

Manmohan Singh Death News: Live Updates : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. आज त्यांची प्रकृती खालावल्याने तातडीन एम्स च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं होतं.

  • By संदीप गावडे
Updated On: Dec 26, 2024 | 10:47 PM
देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा, शासकीय कार्यक्रम रद्द; मनमोहन सिंग यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार

Follow Us
Close
Follow Us:

Manmohan Singh Death News: Live Updates : भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं आज निधन झालं. ते ९२ वर्षांच्या होते. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली आहे. आज त्यांची प्रकृती खालावल्याने तातडीन एम्स (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स) च्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं आहे. डॉक्टरांचं विशेष पथक त्यांची तपासणी करतं होतं. दोन वेळा देशाचे पंतप्रधान राहिलेले डॉ. मनमोहन सिंग यांना अनेक दिवसांपासून आरोग्यविषयक समस्यांचा सामना करावा लागत होता. याआधीही प्रकृतीच्या कारणास्तव त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं.

Samvidhan Bachao Yatra : मोठी बातमी! राहुल गांधीची ‘संविधान बचाओ यात्रा’ या दिवशी सुरू होणार; वर्षभर चालणार कार्यक्रम

डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी स्वातंत्र्यपूर्व काळात पंजाब प्रांतातील एका गावात झाला. सामान्य पार्श्वभूमीतून आलेल्या डॉ. सिंग यांनी त्यांच्या आयुष्यात शिक्षण, अर्थशास्त्र आणि राजकारणात विलक्षण कामगिरी केली आहे. डॉ.मनमोहन सिंग यांनी 1948 मध्ये पंजाब विद्यापीठातून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली. यानंतर त्यांनी 1957 मध्ये केंब्रिज विद्यापीठातून (यूके) अर्थशास्त्रात प्रथम श्रेणी ऑनर्स पदवी प्राप्त केली. त्यांनी 1962 मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या नफील्ड कॉलेजमधून अर्थशास्त्रात डी.फिल पदवी मिळवली. त्यांना शिक्षणात आवड असल्यामुळे त्यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अध्यापनाचं कामही केलं.

1971 मध्ये डॉ. सिंग भारत सरकारमध्ये रुजू झाले आणि वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार बनले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयाचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं.

Devendra Fadnavis: सुशासनाच्या माध्यमातून एक ट्रिलीयन अर्थव्यवस्थेचा मार्ग बळकट होईल- देवेंद्र फडणवीस

आर्थिक सुधारणांचं अवघ्या जगाने केलं कौतुक

1991 ते 1996 या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी आर्थिक सुधारणांचे व्यापक धोरण राबवलं. त्यांच्या या धोरणाचं जगभरात कौतुक झालं. या सुधारणांनी भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढलं आणि नवी दिशा दिली. डॉ. मनमोहन सिंग 1991 मध्ये पहिल्यांदा राज्यसभेचे सदस्य झाले. त्यांनी पाच वेळा आसामचे प्रतिनिधित्व केले आणि 2019 मध्ये राजस्थानमधून राज्यसभा सदस्य झाले. 1998 ते 2004 पर्यंत भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदी डॉ. त्यांनी 1999 मध्ये दक्षिण दिल्लीतून लोकसभा निवडणूकही लढवली होती, पण त्यांना यश आले नाही.

2004 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर, 22 मे रोजी त्यांना भारताचे पंतप्रधान म्हणून नियुक्त करण्यात आले. 2009 मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली आणि 2014 पर्यंत ते या पदावर राहिले.

Web Title: India former prime minister dr manmohan singh passed away age of 92 in aiims

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 10:27 PM

Topics:  

  • Dr. Manmohan Singh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.