मोठी बातमी! राहुल गांधीची 'संविधान बचाओ यात्रा' या दिवशी सुरू होणार; वर्षभर चालणार कार्यक्रम
भारत जोडो यात्रेने कॉंग्रेसला नवसंजीवनी दिली. लोकसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं. राहुल गांधींनी दोन यात्रांमधून संपूर्ण देश पिंजून काढला होता. त्यांच्या या यात्रांना देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता पुन्हा 26 जानेवारी पासून काँग्रेसकडून संविधान बचाओ यात्रा अर्थात ‘सेव्ह कॉन्स्टिट्युशन नॅशनल मार्च’ काढण्यात येणार असून हा कार्यक्रम वर्षभर चालणार आहे. कॉंग्रेस वर्कींग कमिटीच्या बैठकीनंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी ही माहिती दिली आहे.
काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, काँग्रेस डिसेंबर 2024 ते जानेवारी 2026 या काळात जनतेच्या संमस्या मांडणार आहे. ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ मोहीम सुरू करणार आहे.
बेलगावी में हुई विस्तारित CWC की ‘नव सत्याग्रह’ बैठक में हमारा नव संकल्प – संविधान की रक्षा के लिए हम संगठित हैं, संकल्पित हैं, समर्पित हैं! pic.twitter.com/QK1JwwgU4G
— Rahul Gandhi (@RahulGandhi) December 26, 2024
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस कार्यकारिणीत गृहमंत्री अमित शहा यांच्या राजीनाम्याच्या मागणीचा पुनरुच्चार करण्यात आला. यासोबतच लवकरात लवकर सामाजिक-आर्थिक जात जनगणना करण्याची मागणीही करण्यात आली होती. काँग्रेस कार्यकारिणीने वाढत्या किमतीबद्दल चिंता व्यक्त केली. अर्थसंकल्पात गरिबांना आर्थिक मदत आणि मध्यमवर्गीयांसाठी करात सवलत द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले. काँग्रेस कार्यकारिणीने बांगलादेशातील धार्मिक अल्पसंख्यांकांवरील हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि त्यांची सुरक्षा आणि कल्याण सुनिश्चित करण्यासाठी केंद्र सरकारला विनंती केली.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, बेळगावी येथे झालेल्या विस्तारित काँग्रेस कार्यकारिणीच्या ‘नवीन सत्याग्रह’ बैठकीत आमचा नवा ठराव मांडला आहे. आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी संघटीत, दृढनिश्चय आणि समर्पित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या बैठकीत काँग्रेस ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ हे देशव्यापी जनसंपर्क अभियान गावोगावी आणि शहरांमधून सुरू करण्यात येणार आहे. बैठकीनंतर केसी वेणुगोपाल म्हणाले की, 2025 हे प्रत्येक स्तरावर काँग्रेसच्या संघटनात्मक सुधारणांचं वर्ष असेल. आम्ही मोठ्या प्रमाणावर संघटनात्मक सुधारणा करू, ज्या त्वरित सुरू होतील. काँग्रेस कार्यकारिणीने दोन ठराव पारित केले – एक महात्मा गांधींवर, तर दुसरा राजकीय परिस्थितीवर, अशी माहिती त्यांनी दिली.