नवी दिल्ली : देश आज 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Independence Day) लाल किल्ल्यावरुन ध्वजारोहण करतील. तत्पूर्वी त्यांनी मणिपूरच्या परिस्थितीविषयी भाष्य केले. ‘मणिपूरच्या महिलांना खूप त्रास सहन करावा लागला. पण देश मणिपूरसोबत आहे. आम्ही शांततेच्या माध्यमातून तोडगा काढू’, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी आपल्या भाषणात कुठले मुद्दे मांडणार? कुठल्या नव्या घोषणा करणार? याची उत्सुकता आहे. सरकारने आतापर्यंत केलेल्या कामांवर त्यांच्या भाषणाचा फोकस असेल. या आजच्या कार्यक्रमात 1800 खास पाहुणे सहभागी होणार आहेत.
राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील 75 जोड्यांना पारंपारिक वेशात समारंभासाठी निमंत्रित केलं आहे. या कार्यक्रमात देशभरातून 400 पेक्षा जास्त सरपंच, 250 शेतकरी आणि सेंट्रल विस्टाशी संबंधित कामगार सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मणिपूरमध्ये हिंसाचार झाला. अनेकांनी आपल जीवन गमावलं. पण आता हळूहळू शांतता निर्माण होत आहे. देश मणिपूरच्या जनतेसोबत आहे. शांततेनेच यावर तोडगा निघेल.’