Pahalgam Terror Attack: भारताची पाकिस्तानवर मोठी स्ट्राईक; थेट 'या' गोष्टीवर केला प्रहार
नवी दिल्ली: पहालगाम हल्ल्यानंतर भारत सरकार चांगलेच आक्रमक झाले आहे. अनेक धोरणात्मक निर्णय घेत भारताने पाकिस्तानची कोंडी केली आहे. वाघा बॉर्डर बंद केली आहे. सिंधु जल करार स्थगित केला आहे. सीमेवर भारताने हालचाली वाढवल्या आहेत. तसेच आता भारताने पाकिस्तानबाबत आणखी एक कठोर निर्णय घेतला आहे. पाकिस्तानसोबतच व्यापारी सबंध पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय भारत सरकारने घेतला आहे.
गेल्या आठवड्यात जम्मू – काश्मीरच्या पहालगाम येथे टीआरएफच्या दहशतवाद्यांनी पआर्यटकांवर भ्याड हल्ला केला होता. त्यामध्ये तब्बल 28 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. पाकिस्तानी नागरिकांना तातडीने भारत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
भारताने आता पाकिस्तानची अर्थव्यवस्था मोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानसोबतचा सर्व प्रकारचा व्यापार बंद केला आहे. पाकिस्तानकडून होणाऱ्या इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट व्यापाऱ्यावर बंदी घातली आहे. परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने याबाबतचे निर्देश जारी केले आहेत.
Direct or indirect Import or transit of all goods originating in or exported from Pakistan, whether or not freely importable or otherwise permitted, shall be prohibited with immediate effect. pic.twitter.com/KBamc3DhdW
— ANI (@ANI) May 3, 2025
भारताने राष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे या सुचनेत म्हटले आहे. भारताने पहालगाम हल्ल्याचा बदल घेण्यासाठी अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. या हल्ल्याचा तपास एनआयए करत आहे. एनआयएच्या तपासात अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत.
पाकिस्तान खबरदार! राफेल, मिराजचा आक्रमक युद्धाभ्यास
इंडियन एअर फोर्सने उत्तर प्रदेशच्या गंगा एक्सप्रेस वे वर फ्लाईपास्ट केले. शाहजहापुरच्या साडे तीन किमीच्या मार्गावर लढाऊन विमानांनी टेक ऑफ आणि लॅंडींगचा सराव केला आहे. भारतीय वायुसेनेचे राफेल, मिराज आणि जग्वार या लढाऊ विमानांनी अवकाशात सराव केला. हा सराव पाहून अनेकांना युद्ध सुरू झाले की काय असे वाटत होते.
गंगा एक्सप्रेस वे च्या हवाई पट्टीवर राफेल, मिराज आणि जग्वार या लढाऊ विमानांसह ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टने देखील लॅंडींग आणि टेक ऑफचा सराव केला. युद्धाच्या वेळेस इमर्जन्सी असल्यास मदत व्हावी म्हणून या एक्सप्रेस वे च्या हवाई पट्टीवर हा सराव करण्यात आला. उत्तर प्रदेशमधील गंगा एक्सप्रेस वे हा देशातील असा पहिला हायवे आहे की, ज्यावर लढाऊ विमानांना टेक ऑफ आणि लॅंडींग करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
पहलगाम हल्ल्यामागे ISI चा हात, NIA च्या रिपोर्टमध्ये काय?
पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयए राष्ट्रीय तपास संस्था करत आहे. सुरुवातीच्या तपासात मोठी माहिती समोर आली आहे. पहालगाम हल्ल्यात पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना लष्कर ए तोयबा, आयएसआयचा आणि पाकिस्तानी सैन्याचा हात असल्याचे समोर आले आहे. एनआयएने केलेल्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत.
पाकिस्तान खबरदार! राफेल, मिराजचा आक्रमक युद्धाभ्यास; थेट UP च्या ‘गंगा एक्सप्रेस-वे’ वर केले…
तिथे घटनास्थळी केलेल्या चौकशीत दहशतवादी बैसरन खोऱ्यात नव्हे तर अन्य ठिकाणी रक्तपात करू इच्छित होते. मात्र शेवटच्या क्षणी त्यांनी आपले टार्गेट बदलले आणि बैसरन खोऱ्यात पर्यटकांवर हल्ला केला. हल्ला करण्याच्या 2 दिवस आधीपासूनच दहशतवादी बैसरन खोऱ्यात उपस्थित होते. पहालगाम हल्ल्यात सहभागी असलेले दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये होते. तिथून ते आपल्या हँडलर्सच्या संपर्कात होते. या दहशतवाद्यांना पाकिस्तानमधूनच निर्देश मिळत होते. पाकिस्तानमधूनच यांना या कृत्यासाठी पैसे पुरवण्यात आल्याचे समोर आले आहे.