Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Supreme Court : आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश

भारतात आधीच १४० कोटी पेक्षा अधिक लोक राहत असून भारत हा संपूर्ण जगासाठी काही धर्मशाळा नाही, अशी कठोर टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने एका श्रीलंकन तमिळ नागरिकाची निर्वासित म्हणून भारतात राहण्याची मागणी फेटाळून लावली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: May 20, 2025 | 03:48 PM
आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश

आम्ही आधीच १४० कोटी, भारत धर्मशाळा नाही; सुप्रिम कोर्टाने निर्वासिताला दिले भारत सोडण्याचे आदेश

Follow Us
Close
Follow Us:

भारतात आधीच १४० कोटी पेक्षा अधिक लोक राहत असून भारत हा संपूर्ण जगासाठी काही धर्मशाळा नाही, अशी कठोर टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाने एका श्रीलंकन तमिळ नागरिकाची निर्वासित म्हणून भारतात राहण्याची मागणी फेटाळून लावली आहे. न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी पार पडली.

Sambhal Case : संभल जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मुस्लिम पक्षाला धक्का; न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

याचिकाकर्त्याला 2015 मध्ये लष्करी संघटना ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम’ (LTTE) सोबत संबंध असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. 2018 मध्ये न्यायालयाने त्याला UAPA अंतर्गत दोषी ठरवत 10 वर्षांची शिक्षा सुनावली होती. 2022 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने त्याची शिक्षा कमी करत 7 वर्षांवर आणली, पण शिक्षा पूर्ण होताच देश सोडण्याचे आदेश दिले आणि तोपर्यंत त्याला निर्वासित छावणीत राहण्याची परवानगी देण्यात आली.

श्रीलंकन तमिळ असलेल्या याचिकाकर्त्याने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, श्रीलंकेत त्याच्या जीवाला धोका असल्यामुळे तो व्हिसावर भारतात आला होता. त्याची पत्नी आणि मुले भारतात स्थायिक असून तो गेल्या तीन वर्षांपासून अटकेत आहे आणि अजूनही त्याची देशबंदीची प्रक्रिया सुरू झालेली नाही. यावर न्यायमूर्ती दत्त म्हणाले, “भारत हा संपूर्ण जगातील लोकांसाठी आश्रय देणारा देश नाही. आपल्याकडे १४० कोटी लोकसंख्या झगडत आहे. भारत कोणाचीही धर्मशाळा नाही.”

Jyoti Malhotra Latest News : ज्योती मल्होत्राचे सीक्रेट मिशन; गुप्तहेरीच्या प्रशिक्षणासाठी पाकिस्तान दौरा

याचिकाकर्त्याच्या वकिलांनी संविधानाच्या अनुच्छेद २१ (जीवन व स्वातंत्र्याचे रक्षण) आणि अनुच्छेद १९ अंतर्गत युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने स्पष्ट केलं की, अनुच्छेद २१ अंतर्गत त्याला कायद्यानुसार अटक झाली असून त्याच्या जीवन स्वातंत्र्याचा भंग झालेला नाही. आणि अनुच्छेद १९ केवळ भारतीय नागरिकांनाच लागू होतो. “तुम्हाला इथे स्थायिक होण्याचा काय अधिकार आहे?” असा सवाल न्यायालयाने केला. याचिकाकर्त्याचे वकील त्याच्या जीवाला धोका असल्याचे अधोरेखित करत असताना, न्यायालयाने त्याला भारताऐवजी दुसऱ्या कोणत्याही देशात जाण्याचा पर्याय सूचवला.

Web Title: India not a dharmashala supreme court hearing on sri lankan refugees petition latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 05:51 PM

Topics:  

  • Court Decision
  • Sri Lanka
  • Supreme Court

संबंधित बातम्या

Mumbai News  :   गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?
1

Mumbai News : गिफ्ट टॅक्सच्या मुद्द्यावर मुंबईतील समलिंगी जोडप्याने घेतली मुंबई उच्च न्यायालयात धाव, काय आहे मागणी?

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय
2

मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकेच्या खेळाडूवर ५ वर्षांची बंदी, ICC ने घेतला कठोर निर्णय

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन
3

‘इतकं प्रेम आहे तर घरी घेऊन जा..’ भटक्या कुत्र्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला राहुल वैद्यचे समर्थन

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा
4

Thackeray-Shinde Conflicts: धनुष्यबाणाची लढाई आणखी लांबली; शिदेंना दिलासा, ठाकरेंची निराशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.