Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India-Pakistan ceasefire: युद्धबंदी कराराबाबत काय चर्चा झाली…? काय म्हणाले विक्रम मेस्त्रीं

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' वर पोस्ट करून भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराची घोषणा केली. "अमेरिकेच्या मदतीने दीर्घ वाटाघाटींनंतर, भारत आणि पाकिस्तानने ताबडतोब युद्धबंदीवर सहमती दर्शविली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 11, 2025 | 12:29 PM
India-Pakistan ceasefire: युद्धबंदी कराराबाबत काय चर्चा झाली…?  काय म्हणाले विक्रम मेस्त्रीं
Follow Us
Close
Follow Us:

India-Pakistan ceasefire: पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पकिस्तानच्या सर्व सीमारेषांवर पाकिस्तानकडून सातत्याने गोळीबार करण्यात येत होता. ७ मे रोजी झालेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत पाकिस्तानने ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी भारतावर हल्ले केले. पाकिस्तानच्या आवाहनानंतर, काल संध्याकाळी (१० मे ) दोन्ही देशांमध्ये पु्न्हा युद्धबंदी करार झाला, परंतु शेजारी देशाने पुन्हा त्याचे उल्लंघन केले. काल रात्री ८ वाजताच्या सुमारास जम्मू आणि काश्मीरमध्ये ड्रोन दिसले आणि स्फोटांचे आवाजही ऐकू आले. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनावर भारताने तीव्र प्रतिक्रिया दिली.

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा पाकिस्तानला इशारा

पाकिस्तानच्या हल्ल्यांबाबत बोलताना भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री म्हणाले की, ‘ आज संध्याकाळी (१० मे) भारत आणि पाकिस्तानच्या लष्करी ऑपरेशन्स महासंचालकांमध्ये झालेल्या कराराचे वारंवार उल्लंघन केले जात आहे. हे आज झालेल्या युद्धबंदी कराराचे उल्लंघन आहे. भारतीय लष्कर या उल्लंघनांना पुरेसा आणि योग्य प्रतिसाद देत आहे आणि आम्ही या उल्लंघनांना खूप गांभीर्याने घेत आहोत. आम्ही पाकिस्तानला आवाहन करतो की त्यांनी युद्धबंदी उल्लंघनांना तोंड देण्यासाठी योग्य पावले उचलावीत आणि ही परिस्थित गांभीर्याने आणि जबाबदारीने हाताळावी. भारतीय लष्करदेखील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवर तसेच नियंत्रण रेषेवर सीमा उल्लंघनाच्या कोणताही प्रकार घडल्यास त्याला चोख प्रत्युत्तर दिले जावे, असे निर्देश सैन्याला देण्यात आले आहेत. धन्यवाद.

जगातील युद्ध काही संपेना! इस्रायल-हमास युद्ध सुरुच; गाझावरील हल्ल्यात 23 पॅलेस्टिनींचा मृत्यू

दरम्यान, भारत-पाकिस्तानात झालेल्या युद्धबंदीच्या करारानंतर विक्रम मिस्री यांनी काल संध्याकाळी (१० मे) झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले की, “पाकिस्तानच्या डीजीएमओने आज भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३५ वाजता भारताच्या डीजीएमओंना फोन केला. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती करण्यात आली आणि दोन्ही देशांतील ,सैन्यालाही तशा सुचना देण्यात आल्या. यानंतर सोमवारी (१२ मे) दोन्ही देशांचे डीजीएमओ १२ मे रोजी दुपारी १२ वाजता पुन्हा चर्चा करणार आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांच्या मध्यस्थीनंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धबंदी

विक्रम मिस्री यांच्या वक्तव्याच्या काही मिनिटे आधी, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ वर पोस्ट करून भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराची घोषणा केली. “अमेरिकेच्या मदतीने दीर्घ वाटाघाटींनंतर, भारत आणि पाकिस्तानने ताबडतोब युद्धबंदीवर सहमती दर्शविली. दोन्ही देशांनी शहाणपण दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि लक्ष दिल्याबद्दल धन्यवाद.” असं लिहीत त्यांनी दोन्ही देशांचे आभारही मानले.

India-Pakistan Conflict: तुम्ही X वर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंहला फॉलो करताय का? थांबा, वाचा का

Web Title: India pakistan ceasefire what was discussed regarding the ceasefire agreement what did vikram mestri say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • india pakistan war
  • India-Pakistan Conflict
  • India-Pakistan tension

संबंधित बातम्या

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे
1

Kashmir At UN : ‘7 भारतीय विमाने पाडली…’; UNGA मध्ये शाहबाज शरीफचे भारताविरुद्ध पुन्हा आक्षेपार्ह आणि खोटे दावे

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय
2

ISIRun : पाकिस्तानचा भारताविरुद्ध नवा हेरगिरीचा कट; कराचीतील आयएसआयचे युनिट 412 सक्रिय

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video
3

MIG 21 Retirement: भारताचा ‘बादशाह’ निवृत्त! मिग-21 ने अनेकदा पाकड्यांना चारली धूळ; पहा Video

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे
4

Operation Sindoor: पाकिस्तानचा खोटा इतिहास पसरवण्याचा कट; पाकिस्तानी शाळांमध्ये शिकवणार ‘ऑपरेशन सिंदूर’ चे दिशाभूल करणारे धडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.