India-Pakistan Conflict: तुम्ही X वर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंहला फॉलो करताय का? थांबा, वाचा काय आहे सत्य?
प्रत्येक भारतीय व्यक्तिला कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यावर गर्व आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या संघर्षादरम्यान आॉपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविण्यामागे सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांचा हात आहे. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांबाबत सतत पोस्ट केल्या जात आहेत. त्यांच्या यशाच्या गाथा सोशल मीडियावर शेअर केल्या जात आहेत. मात्र आता सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांच्या नावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे.
सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांच्या नावाने सोशल मीडिया अकाऊंट एक्सवर अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. या अकाऊंटला हजारो लोकांनी फॉलो देखील केलं आहे. मात्र हे अकाऊंट फेक असल्याचं सत्य PIB फॅक्ट चेकने उघड केलं आहे. विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्या नावाने एक्सवर फेक अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. हे अकाऊंट ‘@WingVyomikStan’ या नावाने तयार करण्यात आलं असून याचे 28,000 फॉलोअर्स देखील आहेत. याशिवाय कर्नल सोफिया कुरेशी यांच्या नावाने देखील फेक एक्स अकाऊंट तयार करण्यात आलं आहे. हे अकाऊंट @SofiyaQuresi या नावाने तयार करण्यात आलं असून याचे 68,000 फॉलोअर्स आहेत. हे दोन्ही एक्स अकाऊंट फेक असल्याचं फॅक्ट चेकने सांगितलं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सरकारद्वारे हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, विंग कमांडर व्योमिका सिंह आणि कर्नल सोफिया कुरेशी यांचे कोणतेही एक्स अकऊंट नाही. हे दोन्ही अकाऊंट फेक आहेत. नागरिकांनी सतर्क रहा. अधिकृत माहितीसाठी फक्त अधिकृत स्त्रोतांवर विश्वास ठेवा. ऑपरेशन सिंदूरवरील मीडिया ब्रीफिंगमध्ये सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंह यांनी त्यांच्या भूमिकेमुळे लोकांचे लक्ष वेधले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्या नावाने अनेक फेक अकाऊंट तयार केले जात आहेत.
भारतीय हवाई दलाच्या पायलट विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी देशातील काही सर्वात आव्हानात्मक भागात हेलिकॉप्टर उडवले आहेत. सरकारने लोकांना कंटेंट शेअर करण्यापूर्वी तथ्ये पडताळण्याचे आवाहन केले आहे आणि सशस्त्र दलांशी संबंधित अपडेट्ससाठी फक्त अधिकृत संरक्षण आणि पीआयबी चॅनेलवर अवलंबून राहण्याचे आवाहन केले आहे. ज्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवा सोशल मीडियावर पसरणार नाहीत.
#Fake Account Alert🚨 Are Wg. Cdr. Vyomika Singh & Col. Sofiya Qureshi on X❓#PIBFactCheck ❌ NO! Both these handles are #fake ✅There is NO official X handle of Wg. Cdr. Vyomika Singh & Col. Sofiya Qureshi 🔎Stay vigilant. Rely only on official sources for authentic… pic.twitter.com/ThJbOgrxfs — PIB Fact Check (@PIBFactCheck) May 10, 2025
7 मे रोजी, ऑपरेशन सिंदूर सुरू झाल्यानंतर कर्नल सोफिया कुरेशी यांनी पहिल्यांदाच माध्यमांना संबोधित केले. सोफिया कुरेशी या बायोकेमिस्ट्रीमध्ये पदव्युत्तर आहे. त्यांचे आजोबाही भारतीय सैन्यात सेवा बजावत होते.
Mother’s Day 2025: मातृदिनानिमित्त BSNL ने दिलं खास गिफ्ट, कमी केली या 3 प्लॅन्सची किंमत
विंग कमांडर व्योमिका सिंग, एक आयएएफ पायलट आहे आणि त्या भारतातील सर्वात आव्हानात्मक भूप्रदेशांसह उच्च-जोखीम असलेल्या झोनमध्ये हेलिकॉप्टर उडवण्याच्या त्यांचया कौशल्यासाठी ओळखल्या जातात.