गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. सध्या दोन्ही देशांत शस्त्रसंधी झालेली असली तरी परिस्थिती पूर्णपणे निवळलेली नाही.
गेल्या काही वर्षांत दहशतवादी कारवायांचे स्वरूप बदलले आहे. सैनिकांसोबतच आता दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांवर हल्ले होऊ लागले आहेत. पहलगामच्या हल्ल्यापर्यंत दशहतवादाचा पापाचा घडा भरला आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल' वर पोस्ट करून भारत आणि पाकिस्तानमधील युद्धबंदी कराराची घोषणा केली. "अमेरिकेच्या मदतीने दीर्घ वाटाघाटींनंतर, भारत आणि पाकिस्तानने ताबडतोब युद्धबंदीवर सहमती दर्शविली.
युद्धविरामानंतर जम्मूमध्ये शांतता होती. स्फोट किंवा गोळीबाराचा कोणताही आवाज ऐकू आला नाही. पाकिस्तानकडून येथे कोणतीही हालचाल दिसून आलेली नाही. पण, भारतीय लष्कर अजूनही सतर्क आहे.
भारताने लक्ष्य केलेल्या चार पाकिस्तानी एअरबेसमध्ये मुरीद चकवाल एअरबेस, नूर खान एअरबेस (रावळपिंडी), रहीम यार खान एअरबेस आणि रफीकी एअरबेस (शोरकोट, पंजाब) यांचा समावेश आहे.