तिसरं महायुद्ध होणार? कुठे युद्ध, कुठे तणाव, दुसऱ्या महायुद्धाहूनही अधिक भयंकर स्थिती
पहलगाम हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून युद्धसदृश स्थिती निर्माण झाली आहे. तिकडे युक्रेन-रशिया युद्ध सुरू आहे. मीडल इस्टमध्ये इस्रायल हमास संघर्ष सुरू आहे. तर चिन आणि तैवानमध्ये संध्या संघर्ष नसला तरी तणावाची स्थिती कायम आहे. सध्या जगात दुसऱ्या महायुद्धापू्र्वी जशी स्थिती होती, तशीच स्थिती निर्माण झाली असून तिसऱ्या महायुद्धाची भीती जगाला सतावत आहे.
दुसऱ्या महायुद्धाआधीही अनेक देश आपापसात लढत होते. इटलीने इथिओपियावर हल्ला केला होता, तर सोव्हिएत संघ आणि स्पेनमध्ये तणावपूर्ण स्थिती होती. मात्र, नुकताच पहिलं महायुद्ध अनुभवलेल्या जगात इतक्या टोकाचं वातावरण बनलं नव्हतं, जितंक आता दिसत आहे. सध्या जगातील जवळपास सर्व देश तोफेच्या तोंडावर आहेत. कोणत्याही क्षणी ठिणगी पडू शकते आणि युद्ध भडकू शकतं.
कुठे युद्ध, कुठे संघर्ष
रशिया-युक्रेन युद्ध
फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या या युद्धाला तीन वर्षांहून अधिक काळ झाला आहे. या दरम्यान लाखो युक्रेनियन नागरिक विस्थापित झाले आहेत. हजारो जणांचे प्राण गेले, परंतु अद्यापही थांबण्याचे कोणतेही संकेत नाहीत.
इस्रायल-हमास संघर्ष
2023 च्या ऑक्टोबरमध्ये हमासने इस्रायलवर हल्ला केला, ज्याला उत्तर म्हणून इस्रायलने मोठी सैनिकी कारवाई सुरू केली आणि युद्ध भडकलं, गाझापट्टी उद्ध्वस्त झाली आहे. संपूर्ण मीडल इस्ट देशांना याची झळ बसली आहे.
अफगाणिस्तान-पाकिस्तान, इराण-इस्रायल
अफगाणिस्तान व पाकिस्तानच्या सीमेवर थेट युद्ध नसले तरी संघर्ष सुरू आहे. तसेच इराण व इस्रायल यांच्यातील तणाव दीर्घकाळापासून सुरू आहे.
अफ्रिकेतील संघर्ष
सूदानमध्ये 2023 पासून दोन सैनिकी गटांमध्ये संघर्ष सुरू असून देश उद्ध्वस्त झाला आहे. माली, बुर्किना फासो, हैती आणि नायजर या देशांत धर्मांध हिंसाचाराने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
इराक, सीरिया, आणि दहशतवाद
मध्यपूर्व जवळपास दोन दशकांपासून अशांत आहे. इराक आणि सीरियात इस्लामिक स्टेटसारखे दहशतवादी अजूनही सक्रिय आहेत.
भारताचे शेजारी देश
पाकिस्तानमध्ये बलुचिस्तान व खैबर पख्तूनख्वा प्रांतात दहशतवादी कारवाया व सैनिकी कारवाया सुरू आहेत.
चीन-तैवान तणाव
चीन आणि तैवानमधील संबंध सतत बिघडत आहेत. आत्तापर्यंत थेट युद्ध नाही, परंतु तणाव वाढल्यास तैवान आक्रमक होऊ शकतो, असे स्थिती आहे.
पहिले महायुद्ध का झालं?
ऑस्ट्रियाचा युवराज फ्रांझ फर्डिनँडची सर्बियन राष्ट्रवाद्याने हत्या केली. यानंतर युरोपातील जवळपास सर्व देश युद्धात सामील झाले.
Jammu Kashmir News: जम्मू-कश्मीरच्या सुंदरबनीमध्ये तीन संशयित…;सुरक्षा यंत्रणांकडून शोधमोहीम सुरू
दुसरे महायुद्ध (1939)
जर्मनीच्या हिटलरने पोलंडवर हल्ला केल्याने युद्ध सुरू झाले. पहिल्या महायुद्धात स्पष्ट विजय-पराजय झाला नव्हता. हिटलरने संधी साधून विस्तारवादी धोरण अवलंबलं. पोलंडवर हल्ल्यानंतर ब्रिटन व फ्रान्सने युद्ध जाहीर केले. पुढे अमेरिका, जपानसारखे देशही युद्धात सामील झाले.
तिसरे महायुद्ध शक्य आहे का?
एका संसर्गजन्य रोगासारखी स्थिती युद्धाची बनत चालली आहे. दोन देशांमध्ये युद्ध सुरू झालं की इतर देश हळूहळू त्यात अडकतात. कधी विचारधारा, तर कधी राजकीय गरजेमुळे. हेच आत्ता घडू शकतं. काही देश रशियाच्या बाजूने जातील, काही अमेरिकेसोबत. ज्यांना युद्ध नको आहे, तेही यात ओढले जाऊ शकतात.
GIS (Geographic Information System) च्या रिपोर्टनुसार, हे संभाव्य चित्र आहे. जर्मनीच्या गुप्तचर संस्थेचे माजी उपाध यक्ष रूडॉल्फ जी. अॅडम यांच्या मते, तिन्ही गट एकमेकांकडे संशयाने पाहतील आणि हेच युद्धाला खतपाणी घालू शकतं.
कोणते देश कुठल्या गटात असतील?
पश्चिमी उदारमतवादी व भांडवलशाही देश:
अमेरिका, कॅनडा, यूके, युरोप, जपान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण कोरिया.
दुसरा गट:
रशिया, बेलारूस, इराण, सीरिया, व्हेनेझुएला, उत्तर कोरिया. चीन
तिसरा गट (नवा गट):
विकसनशील देशांचा तिसरा गट आहे. भारत याचा नेतृत्व करू शकतो. दक्षिण आशियाई देश, दक्षिण अमेरिका व अरब देश यामध्ये असतील.