पंतप्रधानांच्या भाषणाने बदलली जागतिक संरक्षण बाजारपेठेची धारणा; राफेलमध्ये तेजी... (फोटो- istockphoto)
भारत आणि फ्रान्समध्ये एका महत्वाच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. भारताचे संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग यांनी भारत आणि फ्रान्समधील 26 राफेल करारावर स्वाक्षरी केली. या करारांतर्गत, भारताला फ्रान्सकडून 22 सिंगल सीटर विमाने आणि 4 डबल सीटर विमाने मिळणार आहेत. हा करारा 63 हजार कोटी रुपयांमध्ये करण्यात आला आहे. या विमानांची क्षमता अणुबॉम्ब डागण्याची आहे. शस्त्रास्त्र खरेदीबाबत भारताचा फ्रान्ससोबत हा सर्वात मोठा करारा आहे. दरम्यान हे राफेल लढाऊ विमान किती शक्तिशाली आहे, हे जाणून घेऊयात.
राफेल एम हे लढाऊ विमान मरीन या नावाने ओळखले जाते. मरीन म्हणजे समुद्रातील विमान. त्यामुळे भारत सरकार जी 26 राफेल विमाने घेणार आहे ती भारतीय नौदलासाठी खरेदी केली जाणार आहेत. ही 26 राफेल एम लढाऊ विमाने आयएनएस विक्रांतवर तैनात केली जाणार आहेत. या राफेल विमानात अनेक खास फीचर्स आहेत, ज्यामुळे शत्रूराष्ट्राचा थरकाप उडेल. चल तर या लढाऊ विमानाबद्दल जाणून घेऊयात.
वेग आणि अचूक वेध
लढाऊ विमानासाठी सर्वात महत्वाचे असते ते म्हणजे त्याचा वेग. राफेल लढाऊ विमानाबद्दल बोलायचे झाले तर त्याचा वेग हा 2202 किमी प्रती तास इतका आहे. जे पाकिस्तानच्या JF-17 1910 आणि J-10 CE या लढाऊ विमानापेक्षा जास्त आहे. राफेल स्पीड आणि अचूक वेध यामध्ये सरस आहे.
इंधन क्षमता सर्वोत्तम
राफेल लढाऊ विमानची इंधन क्षमता ही 11,202 लीटर इतकी आहे. याची इंधन क्षमता ही चीनकडे असणाऱ्या लढाऊ विमानापेक्षा आहे. इंधन क्षमता जास्त असल्याने हवेत अधिक वेळ राहत येते. ज्यामुळे शत्रूवर मात करणे सहज शक्य होते . हवेतल्या हवेतच इंधन भरण्याची क्षमता राफेल विमानात आहे.
आकाशात सर्वाधिक उंच उडणारे
राफेल विमान आकाशात 50 हजार फुट उंच उडू शकते. राफेल मरीन जेट्स हे आताच्या राफेलपेक्षा जास्त अत्याधुनिक आहेत.
राफेल अधिक घातक
राफेल एम लढाऊ विमानात 30 एमएम की ऑटोकेनन गन बसवण्यात आली आहे. यामध्ये 14 हार्डपॉईंट्स देखील आहेत. यामध्ये तीन वेगवेगळ्या पद्धतीने हवेत मिसाईल फायर करण्याची क्षमता आहे. सात प्रकारे हवेतून जमिनीवर मारा करणारी मिसाईल्स आहेत. याची रडार सीसीतम अधिक वेगवान आणि अत्याधुनिक आहे.
राफेल खरेदी करण्यापूर्वी भारताने फ्रान्सकडून हवाई दलासाठी 36 राफेल जेट विमाने देखील खरेदी केली आहे. 2016 मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये झालेल्या करारातील सर्व विमानेही भारतात पोहोचली आहे. ही विमान हवाई दलाच्या अंबाला आणि हशिनार हवाई विमानतळावर तैनात करण्यात आली आहे. हा करार 58 कोटी रुपयांना करण्यात आला होता. राफेल मरीन विमानांची वैशिट्ये हवाई दलाच्या राफेल विमानांपेक्षा अधिक प्रगत आणि अत्याधुनिक आहेत.
सध्या भारताच्या हवाई दलाकडे मिग-29 विमान आहेत. ही विमाने आयएनएस विक्रमादित्यवर तैनात आहेत. नवीन लढाऊ विमाने ही मिग-29 च्या मदतीसाठी आहेत. नवीन राफेल सागरी विमानांची वाढती मागणी आणि मर्यादित उपल्बधतेमुळे भारताने राफेल सागरी विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हा करार भारत आणि फ्रान्स संबंधा मजबूत करण्याच्या दृष्टीने एक महत्वपूर्ण पाऊल मानले जात आहे. या करारामुळे भारताची समुद्री ताकद वाढणार आहे. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर या करारामुळे चांगल्या संबंधामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला फ्रान्सकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे.