India PM Narendra Modi Birthday 2025 marathi health camps swasth nari sashakt parivar abhiyaan
PM Modi Birthday Gift : आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ७५ वा वाढदिवस आहे. या निमित्ती देशभरात विविध उपक्रम राबवले जाणार आहेत. विशेषकरुन महिला आणि मुलांसाठी आज केंद्र सरकारने स्वस्थ नारी, सशक्त परिवार मोहीम सुरु केली आहे. याअंतर्गत याचा उद्देश महिला आणि मुलांसाठी आरोग्य सेवा मजबूत करणे, चांगली उपलब्धता, दर्जेदार काळजी सुनिश्चित करणे आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, याअंतर्गत देशभरात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर पर्यंत काही महत्त्वपूर्ण योजना राबवल्या जाणार आहेत. विकसित भारताच्या संकल्पनेला चालना देण्यासाठी मध्य प्रदेशातून दुपारी १२ वाजता धार येथे स्वस्थ वारी, सशक्त परिवार च्या आणि ८ व्या राष्ट्रीय पोषण महिन्याच्या मोहिमेला पंतप्रधान मोदींच्या हास्ते शुभारंभ केला जाणार आहे.
यासाठी देशभरात ७५ हजार आरोग्य शिबिरे आयोजित केले जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही शिबिरे आयुष्यामान आरोग्य मंदिरे, सामुदायिक आरोग्य केंद्रे आणि सरकारी आरोग्य संस्थांमध्ये आयोजित केली जाती.
या शिबिरांमध्ये विशेष करुन महिला आणि मुलांच्या आरोग्यवर लक्ष्य केंद्रित केले जाणार आहे. याअंतर्गत आरोग्य तपासणी, आवश्यक उपचारही दिले जाणार आहेत. देशातील प्रत्येक कुटुंबाला दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.
PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75 वा वाढदिवस; मध्यप्रदेशात केला जाणार साजरा
आरोग्य शिबिरांशिवाय देशभरातील अंगणवाड्यांमध्ये पोषण महिना सुरु करण्याची घोषण केली आहे. याअंतर्गत महिला आणि मुलांमध्ये पोषण आहार, आरोग्य बाबत जागरुकता निर्माण करणे आहे. याद्वारे सरकार निरोगी कुटुंब आणि मजबूत समुदाय निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा व निर्णय घेण्यात आला आहे.
यामुळे एका सक्षम राष्ट्राचा पाय रचला जाईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे सरकारच्या आरोग्यसेवेच्या योजनांना पाठिंबा मिळेल असे नड्डा यांनी म्हटले.
या योजनेसाठी केंद्रीय सरकाने खाजगी रुग्णालयांकडूनही मदतीचे आवाहन केले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी देशभरातील खाजगी आरोग्य क्षेत्रातील संस्था, रुग्णालये, डॉक्टर्स यांना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. इंडिया फर्स्ट च्या धोरणासाठी विक्षित भारतासाठी सामूहिक प्रयत्ननांना बळकटी देणे महत्त्वाचे असल्याचे म्हटले आहे.