Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नक्षलवाद संपणार! CPI टॉप कमांडर गणेशला कंठस्नान; ‘या’ राज्यात सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश

आज देशभरात सर्वत्र नाताळ साजरा केला जात आहे. दरम्यान ओडीशा राज्यात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले. ओडीशामध्ये आज एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2025 | 03:49 PM
नक्षलवाद संपणार! CPI टॉप कमांडर गणेशला कंठस्नान; ‘या’ राज्यात सुरक्षा यंत्रणेचे मोठे यश
Follow Us
Close
Follow Us:

ओडीशामध्ये सुरक्षा यंत्रणेला मोठे यश 
नक्षलवादी कमांडर गणेशला घातल्या गोळ्या 
दोन दिवस आधीच 22 नक्षलवाद्यांनी केले आत्मसमर्पण

आज देशभरात सर्वत्र नाताळ साजरा केला जात आहे. दरम्यान ओडीशा राज्यात पोलिस आणि सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले. ओडीशामध्ये आज एक मोठे ऑपरेशन राबविण्यात आले. या कारवाईत कम्युनिस्ट सेंट्रल कमिटी (मावोइस्ट)चा टॉप कमांडर गणेश उडकेला कंठस्नान घातले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणेला मोठे यश प्राप्त झाले आहे. नक्षलवाद नष्ट करण्याच्या मोहिमेत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

६९ वर्षीय कमांडर गानेश्वर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. तसेच सुरक्षा यंत्रणा आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत गणेशसह चार नक्षलवादी ठार झाले आहेत. त्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश होता. ओडीशा पोलिसांचे नक्षलवादी ऑपरेशनचे डीआयजी यांनी या ऑपरेशनबद्दल माहिती दिली.

ओडीशा स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सीआरपीएफ, बीएसएफच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली आहे. कंधमाल आणि गंजम जिल्ह्यातील झालेल्या कारवाईत गणेशला कंठस्नान घालण्यात आले. त्याच्यावर 1 कोटीपेक्षा जास्त रकमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. या ऑपरेशनमध्ये तीन नक्षलवादी ठार झाले. ज्यात दोन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे.

अंत होने वाला है! ‘या’ राज्यात तब्बल 22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; प्रत्येकावर होते 1 लाखांचे बक्षीस

ओडीशा राज्यातील अनेक जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या विरोधात सर्च ऑपरेशन अजूनही सुरूच आहे. या भागात अजून काही नक्षलवादी लपले असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुरक्षा यंत्रणांची संयुक्त पथके या ठिकाणी सर्च ऑपरेशन राबबत आहेत.

22 नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण

केंद्र सरकारने नक्षलवादाच्या विरुद्ध कडक कारवाई सुरू केली आहे. मार्च 2026 पर्यंत देशातील नक्षलवाद नष्ट करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. एकतर शरण यावे किंवा सुरक्षा यंत्रणेची गोळी खावी असे दोनच पर्याय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नक्षलवाद्यांच्या समोर ठेवले आहेत. दरम्यान ओडीशा राज्यात एकाच वेळी तब्बल 22 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे.

“गोळ्यांचे शिकार व्हा किंवा…”; युद्धविराम नाहीच; अमित शहांनी नक्षलवाद्यांना ठणकावले

ओडीशा राज्यातील मलकानगिरी जिल्ह्यात 22 नक्षलवाद्यांनी सामूहिकरित्या आत्मसमर्पण केले आहे. या 22 नक्षलवाद्यांच्या डोक्यावर 1 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना आर्थिक मदत केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली. या वर्षातील ओडीशामधील सर्वात मोठे आत्मसमर्पण आहे.शरण आलेल्या नक्षलवाद्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मागच्या काही काळामध्ये विविध राज्यात अनेक नक्षलवाद्यांनी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण केले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये एक विभागीय समिती सदस्य, 6 एसीएम आणि 15 पक्ष सदस्यांचा समावेश आहे.

 

Web Title: Indian armed forces and odisha police encounter cpi leader ganesh naxalism end marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Indian Armed Forces
  • naxalism
  • Odisha

संबंधित बातम्या

महिलेला ‘चेटकीण’ म्हटल्यास तरुंगवास, ओडिशा मानवाधिकार आयोगाची कठोर शिफारस
1

महिलेला ‘चेटकीण’ म्हटल्यास तरुंगवास, ओडिशा मानवाधिकार आयोगाची कठोर शिफारस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.