Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत पाकिस्तानला संपवणार! “Operation Sindoor 1.0 प्रमाणे…”; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Indian Army: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 03, 2025 | 07:58 PM
भारत पाकिस्तानला संपवणार! "Operation Sindoor 1.0 प्रमाणे..."; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

भारत पाकिस्तानला संपवणार! "Operation Sindoor 1.0 प्रमाणे..."; लष्करप्रमुखांच्या इशाऱ्याने पाकड्यांची हवा टाईट

Follow Us
Close
Follow Us:

ऑपरेशन सिंदूरने मोडले पाकिस्तानचे कंबरडे 
दहशतवादाचा समूळ नाश करण्याचा केंद्र सरकारचा निर्धार 
भारतीय लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला इशारा

Indian Army Chief: पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर मोठी कारवाई केली. ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानचे कंबरडे मोडले. अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान भारतीय लष्कराने घातले. त्यातच आता भारतीय लष्कराच्या प्रमुखांनी पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी भारत पूर्णपणे तयार असल्याचे सांगितले. ते राजस्थानच्या घडसाना येथे बोलत होते.

भारताचे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांनी जवानांना सतर्क आणि कोणत्याही कारवाईसाठी तयार राहण्याच्या सूचना केली. भारत पूर्णपणे तयार आहे. यावेळी आम्ही ऑपरेशन सिंदूर 1.0 प्रमाणे संयम राखणार नाही. पाकिस्तानला आपले भौगोलिक अस्तित्व टिकवून ठेवायचे असेल तर त्यांना दहशतवाद थांबवावा लागेल. जवानांनी तयार राहिले पाहिजे. ईश्वराची इच्छा असल्यास तुम्हाला लवकरच संधी मिळेल.  असे लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी म्हणाले.

ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी मे महिन्यात हवाई दल दिनानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूरबद्दल महत्त्वपूर्ण खुलासे केले. या पत्रकार परिषदेत सांगितले की, भारताने चार ते पाच एफ-१६ पाकिस्तानी लढाऊ विमाने पाडली. भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, या कारवाईदरम्यान भारताने सुमारे १२ पाकिस्तानी विमाने पाडली, ज्यात ९ ते १० लढाऊ विमाने समाविष्ट आहेत. त्यांनी पाकिस्तानची खिल्ली उडवत म्हटले की, ते भारतीय विमानांबद्दल पसरवत असलेल्या “प्रेमकथा” चालू ठेवल्या पाहिजेत.

भारताने दहशतवादी तळांना लक्ष्य

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ७ मे ते १० मे पर्यंत चालणारे ऑपरेशन सिंदूर सुरू करण्यात आले. भारतीय हवाई दल प्रमुखांनी सांगितले की, या कारवाईत भारताने बहावलपूरमधील जैश-ए-मोहम्मदच्या मुख्यालयाला लक्ष्य करून अनेक पाकिस्तानी हवाई तळांवर अचूक हल्ले केले.

पाकिस्तानची पाच एफ-१६ आणि जेएफ-१७ लढाऊ विमाने उद्ध्वस्त, ऑपरेशन सिंदूरबाबत हवाई दल प्रमुख एपी सिंह यांचा खुलासा

S-400 ने गेम चेंजरची भूमिका बजावली

हवाई दल प्रमुख म्हणाले, “आमच्या प्रणालींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचे गंभीर नुकसान झाले आहे हे स्पष्ट आहे.” या कारवाईने पुन्हा एकदा भारतीय हवाई दलाची ताकद आणि सामरिक क्षमता सिद्ध केली आहे. ते म्हणाले, “आमच्या लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणाली, विशेषतः अलीकडेच मिळवलेल्या S-400, ने गेम चेंजरची भूमिका बजावली. त्यांच्या रेंजने 300 किलोमीटर अंतरावरून पाकिस्तानी विमानांना नष्ट केले, जे आतापर्यंत नोंदवलेले सर्वात लांब जमिनीवरून हवेत मारा करणारे लक्ष्य आहे.”

Web Title: Indian army chief upendra dwivedi warned pakistan end terrorism operation sindoor news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • indian army
  • Operation Sindoor
  • pakistan
  • Pakistani Terrorist

संबंधित बातम्या

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला
1

जयशंकर मॉस्कोमध्ये, तर रशियाचे विशेष दूत मोदींच्या भेटीला; भारताच्या हालचालींमुळे पाक धास्तावला

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान
2

PAK रॅपर तल्हा अंजुम वादाच्या भोवऱ्यात; live concert दरम्यान फडकावला भारतीय ध्वज, दिले धाडसी विधान

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…
3

VIDEO VIRAL : भारताविरुद्ध विष ओकणाऱ्या पाकिस्तानी रॅपर Talha Anjumने कॉन्सर्टमध्ये अभिमानाने ओढला तिरंगा अन्…

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
4

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.