Jammu & Kashmir: उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न; लष्कराने घातले 'इतक्या' जणांना कंठस्नान
श्रीनगर: पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा बालेकिल्ला समजला जातो. पाकिस्तान सातत्याने दहशतवादाच्या माध्यमातून भारताचा डिवचण्याचा प्रयत्न करत असतो. जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवादी घुसखोरी करून सैन्यावर आणि अनेक ठिकाणांवर हल्ला करून देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. दरम्यान काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचे पुन्हा प्रयत्न केले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. काल रात्री उशिरा देखील दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. याला भारतीय लष्कराने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
काश्मीरमध्ये नुकीतच विधानसभा निवडणूक पार पडली आहे. या निवडणुकीत चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. मात्र निवडणूक होताच दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. शनिवारी रात्री दहशतवाद्यांनी जमू काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केला आहे. बरमुल्ला जिल्ह्यातील उरी सेक्टरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरीचा प्रयत्न भारतीय लष्कराने हाणून पाडला आहे.
या घुसखोरीत भारतीय लष्कराने एका दशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. त्यानंतर भारतीय लष्कराने पूर्ण परिसराला वेढा घातला असून, सर्च ऑपरेशन राबविले जात आहे. प्रत्यक्ष सीमेजवळ असलेल्या परिसरात लष्कर, पोलीस आणि आठ राष्ट्रीय रायफल्सकडून या भागातील अन्य दहशतवाद्यांच्या शोधात रात्री उशिरा सर्च ऑपरेशन सुरू होते. रात्रीच्या वेळेस कोणत्याही प्रकारची हानी होऊ नये म्हणून सुरक्षा दलाकडून अतिरिक्त दक्षता घेण्यात आली होती.
प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ दहशतवादी सतत भारताच्या कुरापती काढण्याचा प्रयत्न करतात. त्याला आपले शूर सैनिक चोख प्रत्युत्तर देत असतात. तसेच भारतीय लष्कर सातत्याने दहशतवाद्यांच्या शोधासाठी सर्च ऑपरेशन राबवत असते. काही वर्षांपूर्वी दहशतवाद्यांनी उरी सेक्टरमध्ये भारतीय लष्करावर मोठा हल्ला केला होता. यामध्ये झोपेत असलेल्या सैनिकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यानंतर भारतीय लष्कराने सर्जिकल स्ट्राईक करून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले होते.
जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणूक झाली आहे. यामध्ये कॉँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स कॉँग्रेस आघाडीचे सरकार आले आहे. ओमर अब्दूल्ला यांनी जम्मू काश्मीर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये नवीन सरकार स्थापन होताच दहशतवाद्यांनी हल्ला करण्यास केली. तर काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात त्यांनी एका कामगाराची हत्या केली होती. आता भारतीय लष्कराने मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे .