
Terrorists open fire during search operation in Kishtwar
Anti-Terror Search Operation : जम्मू-काश्मीरच्या किश्तवाड जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, सुरक्षा रक्षकांनी या चकमकीत जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा कमांडर सैफुल्लाह याला सुरक्षा दलांनी घेराव घातल्याचेही सांगितले जात आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार सुरू आहे. किश्तवाडमधील अत्यंत संवेदनशील भागात हा गोळीबार सुरू आहे. या भागात सातत्याने दहशतवादी घुसखोरीचे प्रयत्न होत असतात. (Jammu-Kashmir Terror Attack)
Divorce : घटस्फोटांच्या प्रकरणांत लक्षणीय वाढ; धक्कादायक कारण जाणून घ्या सविस्तर
मिळालेल्या माहितीच्या, आधारे सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढा घालून शोधमोहीम (Search Operation) सुरू केली. स्वत:ला अडकलेले पाहून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून, सध्या या भागात चकमक सुरू आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संबंधित परिसराला वेढा घालून शोधमोहीम (Search Operation) सुरू केली. स्वत:ला अडकलेले पाहून लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या जवानांवर बेछूट गोळीबार सुरू केला. याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले असून, सध्या या भागात चकमक सुरू आहे.
पाकिस्तान समर्थित दहशतवादी थंडीच्या काळात, विशेषतः बर्फवृष्टीच्या काळात जेव्हा सीमेवरील सुरक्षा कमी असते, त्यावेळी भारतात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. खराब हवामानामुळे पाळत ठेवणे आणि सुरक्षा आव्हानात्मक बनते. पण यावेळी मात्र सुरक्षा दलांनी त्यांच्या रणनीतीत बदल केला असून दहशतवाद्यांविरोधातील शोधमोहीम सुरूच ठेवली आहे. दरम्यान, देशात अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहशतवाद्यांवर सुरक्षा दलांचे हे ऑपरेशन प्रभावी ठरत आहे. सुरक्षा दलांनी जैश-ए-मोहम्मद (जेईएम) च्या दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरण्यात आले आहे. ही चकमक बर्फाच्छादित चतरू वनक्षेत्रात होत आहे, जो पूर्वी दहशतवादी घुसखोरी आणि संघर्षाचा केंद्रबिंदू होता. ( Jammu-Kashmir)
UP Crime News 2026: शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद POCSO अंतर्गत लैंगिक शोषणाचा गुन्हा दाखल
लष्कर, निमलष्करी दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई केली असून या कारवाईत अनेक दहशतवद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. सुरक्षा दलांच्या सतर्कता आणि सतत्या कारवायांमुळे या भागांमध्ये दहशतवाद्यांचे नेटवर्क खूपच कमकुवत झाले आहे. पण चकमकी अजूनही सुरू आहे आणि परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. गेल्या महिन्यात, किश्तवाड प्रदेशात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये सुमारे अर्धा डझन चकमकी झाल्या. या चकमकीत एक सैनिक शहीद झाला आणि एक दहशतवादीही मारला गेला. रविवारी झालेल्या चकमकीला लष्कराच्या जवानांना दोन संशयित अतिरेक्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सुरुवात झाली, त्यानंतर चतरूच्या जंगलात शोध मोहीम सुरू करण्यात आल्याचे बोलली जात आहे.
सीमावर्ती भागात दहशतवाद्यांच्या हालचालींची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतली आहे. गुप्तचर यंत्रणा आणि सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भागात जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचे दोन ते तीन दहशतवादी लपल्याची खात्रीशीर माहिती मिळाली होती.