Indian economy ranks fourth in the world information by NITI Aayog
नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरमुळे संपूर्ण जगामध्ये भारताची चर्चा आहे. यामधून भारतीय सैन्याची आणि केंद्र सरकारचा निश्चय दिसून आला आहे. त्याचबरोबर भारतावर दहशतवादी हल्ला करणारा आणि पोकळ धमक्या देणारा पाकिस्तान हातात कटोरा घेऊन जगासमोर भीक मागत आहे. तर दुसरीकडे भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे. भारताने जपानला मागे टाकून हे यश मिळवले आहे. अशा परिस्थितीत, पाकिस्तान जरी पोकळ आश्वासने देत राहिला तरी, भारताविरुद्ध त्यांना उभे राहणे आता अशक्यप्राय झाले आहे.
भारताचे नाव लष्करी कारवाई, अर्थव्यवस्था, प्रगती, परंपरा आणि संस्कृती यामुळे जगात उंचावत आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत, भारताने जपानला मागे टाकत चौथे स्थान मिळवले आहे. याबाबत नीती आयोगाने माहिती दिली आहे. नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले की, जागतिक आणि आर्थिक वातावरणात भारत अनुकूल आहे. आज भारत 4000 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था बनला आहे. अर्थव्यवस्थेच्या बाबतीत जपानही आता आपल्या मागे आहे हे भारतीयांसाठी एक मोठे यश आहे. आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला देत, बीव्हीआर सुब्रमण्यम म्हणाले आहेत की आता भारतीय अर्थव्यवस्था जपानपेक्षा मोठी झाली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
हे तीन देश पुढे आहेत
ही कामगिरी करून भारताने इतिहास रचला आहे. आता जागतिक पातळीवर फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी या देशांच्या अर्थव्यवस्था भारताच्या पुढे आहेत. जर देशाने सध्याच्या विकास योजनेवर टिकून राहिल्यास, पुढील अडीच ते तीन वर्षांत भारत जर्मनीला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू शकेल.
अमेरिकेच्या टॅरिफ अन् पाकिस्तानच्या तणाव परिस्थितीचा परिणाम नाही
विशेष म्हणजे अमेरिकेच्या वाढीव टॅरिफ शुल्कामुळे जगभरात अशांतता आणि खर्चाचा डोलारा वाढताना दिसत आहे. असे असताना भारताने जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचे हे स्थान मिळवले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे टॅरिफ देखील भारताच्या वाढीला रोखू शकले नाहीत. तसेच, पाकिस्तानसोबतच्या तणावाच्या युद्ध परिस्थितीचा देखील भारताच्या अर्थव्यवस्थेवर कोणताही परिणाम झालेला नाही. भारताचा आर्थिक विकास वाढत राहिला आणि पाकिस्तानला पुन्हा एकदा भारताच्या तुलनेत आपले स्थान लक्षात आले. भारत ही दीर्घकाळापासून जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आयएमएफने भारताची ताकद मान्य केली
जागतिक बँकेपासून ते आयएमएफपर्यंत आणि अनेक जागतिक संस्थांनी भारतीय अर्थव्यवस्थेची ताकद मान्य केली आहे आणि त्यांच्या अलीकडील अहवालांमध्ये म्हटले आहे की भविष्यातही भारताचा जीडीपी विकास दर आघाडीवर राहील. अशा परिस्थितीत, केअरएज रेटिंग्जच्या अलीकडील अहवालात असा अंदाज आहे की चौथ्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढ 6.8 टक्के राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे आर्थिक वर्ष 2025 चा एकूण विकास दर 6.3 टक्के होईल. ईपीएफ खातेधारकांच्या आशा भंगल्या, फक्त ८.५% दराने व्याज दिले जाईल, सरकारने मान्यता दिली
जपान जकाती आणि महागाईच्या विळख्यात अडकला
एकीकडे भारताने जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे, तर दुसरीकडे जपानची अर्थव्यवस्था जकाती आणि महागाईत अडकली आहे. अहवालानुसार, एप्रिलमध्ये जपानमधील महागाई झपाट्याने वाढून ३.५% झाली, जी बाजारातील अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे.