Indian Navy: पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध तणावाचे झाले आहेत. पहलगाम हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याचा बदल घेण्याची मागणी संपूर्ण देशवासी करत आहेत. केंद्र सरकारने देखील अनेक निर्णय घेत पाकिस्तानचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. तसेच भारताने युद्धाभ्यास देखील सुरु केला आहे. त्यातच आता भारतीय नौदलाने एका स्वदेशी मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे.
#WATCH | DRDO (Defence Research and Development Organisation) and Indian Navy successfully conducted validation trial of Multi-Influence Ground Mine. This system will further enhance undersea warfare capabilities of Indian Navy.
(Video Source: DRDO) pic.twitter.com/tnaASlhpvt
— ANI (@ANI) May 5, 2025
भारत पाकिस्तानवर हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले जात आहे. कोणत्याही क्षणी पहलगाम हल्ल्याचा बदल घेतला जाऊ शकतो. या भीतीने पाकिस्तानची घाबरगुंडी उडाली आहे. त्यातच आता भारतीय नौदलाने डीआरडीओसोबत एका स्वदेशी मिसाईलचे यश्वी परीक्षण केले आहे. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे.इंडियन नेव्हीने स्वदेशी अशा मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईन या मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. या प्रकरणी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी नौदलाला शुभेच्छा दिल्या आहेत.
भारतासाठी हे परीक्षण का आहे खास?
भारतीय नौदलाने स्वदेशी मिसाईलचे यशस्वी परीक्षण केले आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेच्या दृष्टीने भारताचे हे महत्वाचे पाऊल आहे. MIGM मिसाईलने भारतीय नौदलाची ताकद वाढवली आहे. भारत पाकिस्तान संबंध ताणले गेले असताना हे परीक्षण महत्वाचे समजले जात आहे. हे मिसाईल इतके घातक आहे कि, थेट पाणबुडीला लक्ष्य करू शकते.