Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bullet Train: भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा ‘फर्स्ट लूक’ समोर! ताशी २८० किमी वेग; रेल्वे मंत्रालयाने जारी केले अधिकृत डिझाइन

भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचे अधिकृत डिझाइन जाहीर केले आहे. ताशी २८० किमी वेगाने धावणाऱ्या या ट्रेनचे काम मुंबई आणि गुजरातमध्ये वेगाने सुरू आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 18, 2026 | 08:12 PM
भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा 'फर्स्ट लूक' समोर! (Photo Credit- X)

भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा 'फर्स्ट लूक' समोर! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • भारताच्या पहिल्या बुलेट ट्रेनचा ‘फर्स्ट लूक’ समोर!
  • ताशी २८० किमी वेग; रेल्वे मंत्रालयाने जारी केले अधिकृत डिझाइन
नवी दिल्ली: भारतातील पहिल्या बुलेट ट्रेनचे (Bullet Train) स्वप्न आता प्रत्यक्षात येताना दिसत आहे. भारतीय रेल्वेने देशातील पहिल्या हाय-स्पीड बुलेट ट्रेनचे अधिकृत डिझाइन जाहीर केले आहे. नवी दिल्लीतील रेल्वे मंत्रालयाच्या गेट नंबर-४ वर या अत्याधुनिक ट्रेनचे भव्य छायाचित्र लावण्यात आले असून, ते पाहण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. भारताच्या वाहतूक क्षेत्राचा चेहरामोहरा बदलून टाकणाऱ्या या ‘सुपरफास्ट’ ट्रेनची ही पहिली अधिकृत झलक मानली जात आहे. हा प्रकल्प मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल कॉरिडॉरवर (MAHSR) धावणार असून, यामुळे देशातील रेल्वे प्रवासाचे एक नवीन युग सुरू होणार आहे.
A picture of the country’s first proposed bullet train has been displayed at the Ministry of Railways. The picture has been installed at Gate Number 4: Indian Railways pic.twitter.com/LcbwMstDuw — ANI (@ANI) May 18, 2026

मुंबई ते अहमदाबाद: ५०८ किमीचा प्रवास अवघ्या काही तासांत

मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचा ५०८ किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प भारताचा पहिला बुलेट ट्रेन प्रकल्प आहे. ही हाय-स्पीड ट्रेन महाराष्ट्र, गुजरात आणि दादरा व नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातून धावणार आहे. या संपूर्ण मार्गावर एकूण १२ स्थानके (Stations) निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये:

  • महाराष्ट्र: मुंबई (BKC), ठाणे, विरार, बोईसर.
  • गुजरात व इतर: वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, वडोदरा, आणंद, अहमदाबाद आणि साबरमती.

प्रकल्पाचे काम युद्धपातळीवर

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या ताज्या अपडेटनुसार, गुजरात मधील सर्व ८ स्थानकांच्या पायाभरणीचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्रातही ठाणे, विरार आणि बोईसर दरम्यान बांधकाम प्रक्रियेला वेग आला आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (BKC) येथील भूमिगत स्टेशनसाठी खोदकामाचे काम अंतिम टप्प्यात आहे. या प्रकल्पाचे सर्वात मोठे आकर्षण असलेल्या समुद्राखालील (Undersea Tunnel) बोगद्याचे कामही अत्यंत वेगाने पुढे सरकत आहे.

मोठी बातमी! मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा सर्वात मोठा अडथळा दूर, समुद्रात 7 किलोमीटर खोल बनणार बोगदा

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत ताशी २८० किमीचा वेग

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मेक इन इंडिया’ (Make in India) मोहिमेतंर्गत या बुलेट ट्रेनचे कोच भारतातच तयार केले जात आहेत. चेन्नईची ‘इंटिग्रल कोच फॅक्टरी’ (ICF) आणि बेंगळुरूपी ‘BEML’ या कंपन्या संयुक्तपणे या ट्रेनचे सेट्स विकसित करत आहेत. रेल्वेच्या तांत्रिक अहवालानुसार, या ट्रेनचा डिझाइन स्पीड ताशी २८० किलोमीटर इतका प्रचंड असेल. यामुळे मुंबई-अहमदाबाद दरम्यानचा तासांचा प्रवास काही मिनिटांवर येणार आहे.

जापानी तंत्रज्ञान आणि भारतीय गरजांचा मेळ

हा संपूर्ण बुलेट ट्रेन प्रकल्प जपानच्या जगप्रसिद्ध ‘शिनकानसेन’ हाय-स्पीड रेल तंत्रज्ञानाच्या मदतीने विकसित केला जात आहे. मात्र, याचे डिझाइन भारतीय हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि प्रवाशांच्या गरजा लक्षात घेऊन खास पद्धतीने मॉडिफाय करण्यात आले आहे. सुरक्षा, आराम आणि जागतिक दर्जाच्या डिजिटल सुविधांनी ही ट्रेन सज्ज असेल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

भारतीय रेल्वेच्या इतिहासातील सर्वात मोठी क्रांती

ऑटोमोबाईल आणि पायाभूत सुविधा क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, हा प्रकल्प केवळ एक ट्रेन नसून भारताच्या आर्थिक विकासाला गती देणारे इंजिन ठरेल. यामुळे दोन मोठ्या राज्यांमधील व्यापार वाढेल, नवीन रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि जागतिक स्तरावर हाय-स्पीड रेल्वे तंत्रज्ञान बाळगणाऱ्या मोजक्या देशांच्या यादीत भारताला मानाचे स्थान मिळेल.

Mumbai–Ahmedabad Bullet Train Project : ‘बीकेसी ते शिळफाटा’ बोगदा अंतिम टप्प्यात, एनएचएसआरसीएलकडून मोठी अपडेट समोर

Web Title: Indian railways reveals first official design of mumbai ahmedabad bullet train

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Bullet Train
  • mumbai ahmedabad bullet

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.