भारतीय वस्त्र उद्योगावर मोठं संकट, तर ७ ऑगस्टनंतर कंपन्या बंद कराव्या लागणार?
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के आयात शुल्क (टॅरिफ) लावण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे भारत अमेरिकेत निर्यात करणाऱ्या उत्पादनांवर मोठं संकट ओढवलं आहे. सर्वाधिक फटका भारतीय वस्त्र उद्यागोला बसण्याची शक्यता आहे. ७ ऑगस्टपासून आयात शुक्क लागू होणार असून, यामुळे भारतीय निर्यातदारांना उत्पादन खर्चापेक्षा कमी दराने उत्पादनांची विक्री करावी लागणा असून मोठ्या प्रमाणात कामगार कपातीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
निर्यातदारांची परिस्थिती आधीच बिकट झाली आहे. त्यातच मालाची तोट्यात विक्री करावी लागणार असून फॅक्टऱ्या बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्रम्प यांच्या या घोषणेचा परिणाम भारतीय उत्पादनांवर होण्याआधी सरकारने तात्काळ हस्तक्षेप करावा, अशी मागणी, वस्त्र निर्यात प्रोत्साहन परिषदेचे (अपेरल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच) अध्यक्ष सुधीर सेखरी यांनी केली आहे.
भारताच्या रेडीमेड वस्त्र (RMG) निर्यातीसाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे. २०२४ मध्ये अमेरिकेच्या एकूण वस्त्र आयातीपैकी ३३ टक्के हिस्सा भारताचा होता, अशी माहिती एईपीसीने दिली आहे. २०२० मध्ये भारताचा हिस्सा ४.५ टक्के होता, २०२४ मध्ये त्यात वाढ होऊन ५.८ टक्क्यांवर पोहोचला आहे. तर अमेरिकेत निर्यात करणाऱ्या देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे.
भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या प्रमुख ३ उत्पादनांमध्ये, कॉटन टी-शर्ट्स (९.७१ टक्के), महिलांचे कापसाचे ड्रेसे (६.५२ टक्के) आणि लहान मुलांचे कापसाचे कपड्यांचा (५.४६ टक्के) समावेश आहे. भारताच्या एकूण कापड उत्पादन निर्यातीत या उत्पादनांचा अनुक्रमे १० टक्के, ३६ टक्के आणि २० टक्के वाटा आहे.
२०२४ – २५ आर्थिक वर्षात चीन अजून अमेरिकेचा प्रथम क्रमांकाचा निर्यातदार आहे. चीनचा निर्यातीत एकूण २१.९ टक्के वाटा आहे. २०२० मध्ये २७ टक्के निर्यात करण्यात आली होती. चीन, व्हिएतनाम आणि बांगलादेश या तीन देशांना २०२४ मध्ये अमेरिकेत ४९ टक्के कापड उत्पादने निर्यात केली होती. विषेष म्हणजे, चीनवर सर्वात मोठा निर्यातदार असूनही केवळ ३० टक्के आयात शुल्क कायम ठेवण्यात आलं आहे. तर व्हिएतनाम आणि बांगलादेशवर केवळ २० टक्के आयात शुल्क आकारलं जातं.
भारतीय वस्त्र उद्योगासाठी अमेरिका ही सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे. २०२४-२५ मध्ये भारताने १०.९१ अब्ज डॉलर किमतीची कापड उत्पादने अमेरिकेत निर्यात केली आहे. मात्र ट्रम्प आपल्या विधानावर कायम राहिले आणि २५ टक्के आयात शुल्क आकारलं तर भारताची उत्पादने बांगलादेशच्या तुलनेत स्पर्धेत मागे पडण्याची शक्यता आहे.
अमेरिकेतील बाजारात भारतीय वस्त्र उद्योगाने मोठी प्रगती केली आहे. गेल्या १० वर्षांत भारताचा अमेरिकेशी व्यापार २० अब्ज डॉलरवरून ४० अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स, औषधं आणि वस्त्र उद्योगामुळे ही वाढ झाली आहे, असं विश्लेषण मॉर्गन स्टॅन्लीने केलं आहे.
भारत-अमेरिका व्यापार करार अजूनही काही अटींमध्ये अडकून पडला आहे. कृषी आणि वाहन उद्योगासारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये अटीशर्थींवरून मतभेद आहेत. विशेषत: भारताने मका आणि शोयाबीनसारखी Genetically Modified म्हणजेच GM उत्पादनांची अमेरिकेतून आयात करावी अशी मागणी ट्रम्प यांनी केली आहे. मात्र भारतातने अद्याप तसा कोणताही निर्णय घेतलेला नाही. दोन्ही देशांमध्ये कृषी क्षेत्रातील व्यापार वादग्रस्त मुद्दा राहिलेला आहे. हे दोन्ही देशांमधील वादग्रस्त मुद्द्यांपैकी एक राहिला आहे. युनायटेड स्टेट्स व्यापार प्रतिनिधीने (USTR) पूर्वीही GM उत्पादनांवरील भारतातील निर्बंध व्यापारात भेदभाव असल्याचं म्हटलं आहे. आता ट्रम्प आपला निर्णय मागे घेतात का आणि भारत सरकार त्याला कसं प्रत्युत्तर देणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.