बंगळुरू : भारताने सूर्य मोहिमेअंतर्गत ‘आदित्य एल 1’ चे (Aditya L1) यशस्वी प्रक्षेपण केले. त्यानंतर पृथ्वीभोवतीच्या दोन कक्षा आदित्य एलने यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. त्याचा पुढचा प्रवास सुरू आहे. या प्रवासादरम्यान आदित्य एलने पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी घेतली आहे.
Aditya-L1 Mission:
👀Onlooker!Aditya-L1,
destined for the Sun-Earth L1 point,
takes a selfie and
images of the Earth and the Moon.#AdityaL1 pic.twitter.com/54KxrfYSwy— ISRO (@isro) September 7, 2023
इस्रोने कॅप्शनसह एक्सवर याचा व्हिडीओ शेअर केला आहे. इस्रोने म्हटले आहे की, आदित्य एलचा प्रवास सुरू आहे. या प्रवासादरम्यान एल1 आदित्यच्या बोर्डवर बसवलेले कॅमेरे व्हीईएलसी आणि सूटने (पेलोड कॅमेरा) पृथ्वी आणि चंद्राची छायाचित्रे टिपली आहेत. आदित्यने 4 सप्टेंबर रोजी ही छायाचित्रे टिपली आहे. आदित्य सूर्याच्या दिशेने एल 1 बिंदूकडे निघाला आहे. जाता जाता त्याच्या नजरेस (कॅमेरा) पडणाऱ्या पृथ्वी आणि चंद्रासोबत सेल्फी घेतली आहे, असे इस्रोने मिश्किलपणे म्हटले आहे.
इस्रोने व्हिडिओत म्हटले आहे की, आदित्य एल 1 च्या बोर्डवर बसवलेल्या दोन कॅमेऱ्यांनी स्वतःची सेल्फी घेतली. सोबत पृथ्वी आणि चंद्र या दोघांच्या प्रतिमासुद्धा त्यात टिपल्या गेल्या आहेत. या प्रतिमेत पृथ्वी एका विशाल निळ्या गोलासारखी दिसत आहे, तर चंद्र एक लहानशा कणासारखा भासत आहे.