Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indigo Flight: पुणे-हैदराबाद विमानाचे इमर्जन्सी लँडिंग; ‘या’ कारणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर

पुणे विमानतळावरून रविवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी इंडिगोच्या विमानाचे उड्डाण झाले. सकाळी १० वाजता हैदराबादला हे विमान पोचणे अपेक्षित होते.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 30, 2025 | 09:55 PM
Indigo Flight: पुणे-हैदराबाद विमानाचे विजयवाडामध्ये इमर्जन्सी लँडिंग; 'या' कारणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर

Indigo Flight: पुणे-हैदराबाद विमानाचे विजयवाडामध्ये इमर्जन्सी लँडिंग; 'या' कारणामुळे प्रवाशांचा जीव टांगणीवर

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: पुण्याहून हैदराबादला जाणाऱ्या इंडीगोच्या विमानात ( ६ई- ६४८३) तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने विजयवाडा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग झाले. यावेळी विमानात १८० प्रवासी व क्रु मेंबर होते. संभाव्य धोका टाळण्यासाठी वैमानिकाने हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी बोलून हा  निर्णय घेतला.

पुणे विमानतळावरून रविवारी सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी इंडिगोच्या विमानाचे उड्डाण झाले. सकाळी १० वाजता हैदराबादला हे विमान पोचणे अपेक्षित होते. मात्र विजयवाडाच्या हवाई क्षेत्रात आल्यानंतर अचानक विमानात तांत्रिक दोष निर्माण झाला. परिणामी विमानाला हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाने विजयवाडा विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार सकाळी पावणे दहाच्या सुमारास विमान सुखरूपपणे उतरले.

इंडिगोचे स्पष्टीकरण

“फ्लाइट ६ई ६४८३ मध्ये तांत्रिक बिघाडाचे निदान झाल्यानंतर सावधगिरीचा उपाय म्हणून वैमानिकाने विजयवाडा येथे सुरक्षितपणे लँडिंग केले. आमची तांत्रिक आणि ग्राउंड टीम प्रवाशांना सर्व सुविधा देत असून, त्यांच्या पुढील प्रवासाची व्यवस्था करण्यात येत आहे.”

विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक कुत्रा आला अन् …

भुवनेश्वरहून पुण्याकडे येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या (IX-1097) विमानाच्या लँडिंगच्या अंतिम टप्प्यात शनिवारी सायंकाळी थरारक प्रसंग घडला. सायंकाळी सहाच्या सुमारास विमान पुणे विमानतळावर उतरण्याच्या तयारीत असताना, धावपट्टीवर अचानक कुत्रा दिसल्याने वैमानिकाने लँडिंग रद्द करण्याचा तात्काळ निर्णय घेतला.त्यावेळी विमान अंदाजे ५० ते १०० फूट उंचीवर होते. वैमानिकाने प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सजगतेने निर्णय घेत पुन्हा हवेत भरारी घेतली, ज्यामुळे मोठा अपघात टळला.

या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, धावपट्टीवर प्राणी कसा पोहोचला, याबाबत चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकारामुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ गोंधळाचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, वैमानिकाच्या दक्षतेमुळे सगळे प्रवासी सुखरूप आहेत.संबंधित यंत्रणांनी या घटनेची दखल घेत सुरक्षेचे उपाय अधिक कडक करण्याचे संकेत दिले आहेत.

Lohegaon Airport News: विमानतळाच्या धावपट्टीवर अचानक कुत्रा आला अन् …

पुणे विमानतळावर गेल्या काही दिवसापासून पक्षी आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. यामुळे विमानाच्या संचलनात बाधा निर्माण होत आहे.यापूर्वी विमानाच्या इंजिनमध्ये पक्षी गेल्याची घटना देखील काही दिवसापूर्वीच घडली होती. आता पुन्हा धावपट्टीवर कुत्रा आल्याने प्रवासी सुरक्षाच धोक्यात आली आहे. शनिवारी विमान उतरत असतानाच नेमकी ही घटना घडली. कुत्रा दिसताच विमान परत आकाशाकडे झेपावले. तशातच, उतरण्याच्या मानसिकतेत असलेले प्रवासीही गोंधळले. वैमानिकाने पुन्हा हवेत झेप घेतल्यानंतर ‘गो-अराऊंड’ पद्धतीने घिरट्या घालीत राहिले. विमान अशाप्रकारे हवेत अर्ध्यातासापेक्षा जास्त कालावधीसाठी होते. दरम्यान  कुत्र्याला हटवण्यासाठी कर्मचारी धावले आणि अखेर सायंकाळी ७ वाजून १२ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे उतरले.

Web Title: Indigo pune hyderabad flight emergency landing in vijaywada international airport marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2025 | 09:55 PM

Topics:  

  • airport
  • Flight Landing
  • indigo news

संबंधित बातम्या

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर
1

Share Market : 10 लाख करोड रुपयांची लॉटरी! Iran युद्ध संपणार या आशेने Share Market मध्ये उसळी; सेन्सेक्स 1187 अंकांवर

Jobs Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विमानतळावर मिळवा हाय-प्रोफाईल जॉब आणि लाखोंचं पॅकेज, वाचा सविस्तर
2

Jobs Alert : 12 वी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी! विमानतळावर मिळवा हाय-प्रोफाईल जॉब आणि लाखोंचं पॅकेज, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.