Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IRCTC Food: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! IRCTCची देशभर धडक कारवाई; हजारो अनधिकृत पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ जप्त

IRCTC Food: रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ व पेय मिळावेत यासाठी IRCTCने अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पेयांच्या विक्री-वितरणाविरोधात विशेष तपासणी मोहीम तीव्र केली आहे. रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या समन्वयाने सर्व झोनमध्ये Quick Response Teams (QRT) तयार करण्यात आल्या आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 17, 2026 | 06:49 PM
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! IRCTCची देशभर धडक कारवाई; हजारो अनधिकृत पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ जप्त

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! IRCTCची देशभर धडक कारवाई; हजारो अनधिकृत पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ जप्त

Follow Us
Follow Us:
  • रेल्वेत अनधिकृत खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई
  • सर्व झोनमध्ये QRT पथके सक्रिय
  • IRCTCची देशभर धडक कारवाई
  • हजारो अनधिकृत पाण्याच्या बाटल्या जप्त
 

IRCTC Food: रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि दर्जेदार खाद्यपदार्थ व पेय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारतीय रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाने म्हणजेच IRCTCने विशेष तपासणी मोहीम अधिक तीव्र केली आहे. अनधिकृत खाद्यपदार्थ, पेये तसेच मंजुरी नसलेले पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर विकणाऱ्या आणि साठवून ठेवणाऱ्या केटरिंग युनिट्सवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या कारवाईचा उद्देश रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये आणि रेल्वेतील खानपान सेवांमध्ये निर्धारित अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि परवाना नियमांचे काटेकोर पालन व्हावे हा आहे.

सर्व झोनमध्ये QRT पथके सक्रिय

या विशेष मोहिमेअंतर्गत IRCTCने Quick Response Teams (QRT) तयार केली आहेत. रेल्वेच्या व्यावसायिक विभागाच्या समन्वयाने ही पथके रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानके तसेच केटरिंग युनिट्सची अचानक तपासणी करत आहेत. तपासणीदरम्यान संबंधित केटरिंग युनिटकडे परवाना, आवश्यक अधिकृत परवानग्या, खाद्यपदार्थांची गुणवत्ता, स्वच्छता, अन्न सुरक्षा आणि इतर निर्धारित निकषांची पूर्तता होत आहे की नाही, याची पाहणी केली जात आहे.

IRCTC : स्वस्तात फिरा जपान! आयआरसीटीसीचे 10 दिवसांचे विशेष पॅकेज; चेरी ब्लॉसमच्या देशात बुलेट ट्रेनचा अनुभव अन् बरेच काही

लखनौमध्ये 117 रेल्वेगाड्यांची तपासणी

28 जुलै ते 8 ऑगस्ट 2026 या कालावधीत लखनौ विभागात IRCTCच्या अधिकाऱ्यांनी रेल्वेच्या व्यावसायिक विभागासोबत विशेष तपासणी मोहीम राबवली. या मोहिमेदरम्यान 117 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मंजुरी नसलेल्या ब्रँडच्या पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या 5,241 बाटल्या जप्त करण्यात आल्या.

चंदीगड विभागात 51 गाड्यांची तपासणी

चंदीगड विभागात अंबाला, लुधियाना, अमृतसर, कटरा आणि जम्मू यांसह विविध स्थानकांवर रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 51 रेल्वेगाड्यांची तपासणी करण्यात आली आणि 3,108 अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. याशिवाय, अंबाला येथे QRT पथकाने केलेल्या दोन अचानक तपासण्यांमध्ये आइसक्रीम आणि फ्लेवर्ड मिल्कसह अनधिकृत उत्पादनांची 13 कार्टन्स जप्त करण्यात आली. सहारनपूर रेल्वे स्थानकावरही अनधिकृत आइसक्रीम, पेये आणि पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर जप्त करण्यात आले.

साबरमतीमध्ये अनधिकृत पाणी आणि ताक जप्त

9 ऑगस्ट रोजी साबरमती BG रेल्वे स्थानकावर ट्रेन साइड व्हेंडिंगच्या कारभाराची अचानक तपासणी करण्यात आली. यावेळी ट्रेन क्रमांक 19223 आणि 19031 मध्ये अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर आणि ताक चढवले जात असल्याचे आढळून आले. IRCTCच्या पथकाने हे साहित्य जप्त करून पुढील कारवाईसाठी ताब्यात घेतले.

हावडा आणि गुवाहाटीतही कारवाई

8 ऑगस्ट रोजी हावडा येथे QRT पथकाने रेल्वेच्या व्यावसायिक विभागासोबत अचानक तपासणी करून अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पेये जप्त केली. संबंधित साहित्याची विल्हेवाट लावण्यात आली. तर 8 ते 14 ऑगस्टदरम्यान गुवाहाटी, कामाख्या, अगरतळा, कटिहार, न्यू जलपाईगुडी आणि डिब्रुगड या भागांत नियमित, अचानक तसेच ऑनबोर्ड तपासण्या करण्यात आल्या. या तपासण्यांमध्ये अनधिकृत पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर, खाद्यपदार्थ, जादा दर आकारणी, कर्मचाऱ्यांची कागदपत्रे, स्वच्छता, कीटक नियंत्रण, उपकरणे आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सेवांच्या दर्जावर विशेष लक्ष देण्यात आले. विविध ठिकाणी अनधिकृत पाणी आणि खाद्यपदार्थ जप्त करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली.

केटरिंग सेवा पुरवठादारांना IRCTCचा इशारा

IRCTCने सर्व केटरिंग सेवा पुरवठादारांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना कोणतेही अनधिकृत खाद्यपदार्थ किंवा पेये रेल्वेत चढवू नयेत, साठवू नयेत किंवा विकू नयेत, अशा स्पष्ट सूचना देण्यास सांगितले आहे. निर्धारित नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित परवाना आणि कराराच्या अटींनुसार कठोर दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

प्रवाशांना सुरक्षित आणि दर्जेदार खानपान देण्यावर भर

रेल्वे प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण अन्न व पेये मिळणे हा या विशेष मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे IRCTCच्या सर्व झोन आणि विभागांमध्ये QRT पथके सक्रिय करण्यात आली आहेत. IRCTCकडून रेल्वेच्या संबंधित व्यावसायिक विभागांसोबत समन्वय साधून अशा तपासणी मोहिमा सातत्याने राबवल्या जाणार आहेत. अनधिकृत खाद्यपदार्थ आणि पेयांची विक्री रोखण्यासोबतच अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या निर्धारित मानकांचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यावर भर दिला जात आहे.

Sri Lanka Tour Package : कमी खर्चात श्रीलंकेची सफर! IRCTC ने लाँच केला ‘रामायण टूर पॅकेज’; 6 दिवसांमध्ये काय असणार खास?

Web Title: Irctc special drive against unapproved food beverages trains railway stations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • food
  • Indian Railways
  • IRCTC

संबंधित बातम्या

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा
1

Kabab: चटपटीत, कुरकुरीत अन् स्वादिष्ट! संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी परफेक्ट हरा-भरा कबाब; रेसिपी नोट करा

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ
2

Kalyan Maggi News: ईईईई…मॅगी खाण्यापूर्वीच दिसल्या आळ्या; पॅकेटची एक्सपायरी 2027, FDAच्या कारवाईदरम्यान कल्याणमधील प्रकाराने खळबळ

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी
3

Pitru Paksh 2026: पितृपक्षातील नैवेद्याच्या पानात आवर्जून ठेवा ‘हे’ पदार्थ, जाणून घ्या पदार्थांची यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.