Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंगनाचा मतदारसंघात रोड शो; म्हणाली, ‘मला स्टार समजू नका”

हिमाचल प्रदेशामधील मंडी या लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री कंगना रणौत ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. नुकताच तिने आपल्या मतदारसंघात रोड शो केला.

  • By प्रीति माने
Updated On: Mar 29, 2024 | 05:40 PM
कंगनाचा मतदारसंघात रोड शो; म्हणाली, ‘मला स्टार समजू नका”
Follow Us
Follow Us:

मंडी: लोकसभा निवडणूक जवळ येऊ लागल्यामुळे भाजप जोरदार प्रचार करत आहेत. हिमाचल प्रदेशामधील मंडी या लोकसभा मतदार संघातून अभिनेत्री कंगना रणौत ही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार आहे. नुकताच तिने आपल्या मतदारसंघात रोड शो केला. यावेळी जनतेशी संवाद साधताना तिने विरोधकांवरही जोरदार निशाणा साधला. “मंडीतील लोकांना या गोष्टीचा अभिमान आहे की त्यांची मुलगी आणि बहीण आता निवडणुकीच्या रिंगणात उभी आहे. विकास हाच भाजपचा मुद्दा आहे आणि मंडीमधील लोक हे दाखवून देतील की त्यांच्या मनात काय आहे”, असे आवाहन कंगना राणौत हिने केले.

कंगना राणौत हिने राजकारणात एन्ट्री केल्यानंतर काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी कंगनाविषयी जी वादग्रस्त पोस्ट शेअर केली होती. याबद्दल देखील कंगनाने रोड शोमध्ये चोख उत्तर दिले. रोड शो दरम्यान कंगना म्हणाले, “जे लोक तुमच्या मुलीची किंमत ठरवतात, ते कधीच तुमचे होऊ शकत नाहीत. जे प्रभू श्रीराम यांचे होऊ शकत नाहीत, ते तुमचे कधीच होऊ शकत नाही”, अशा शब्दांत तिने टोला लगावला. मंडी काय आहे, हे इथले लोकच सांगतील. मतदान करताना लोक काँग्रेसला चोख उत्तर देतील, असे कंगना या रोड शोदरम्यान म्हणाली.

पुढे कंगना म्हणाली, “काँग्रेसला मंडीमधून माझी उमेदवारी मान्य नाही. म्हणूनच ते खालच्या पातळीचं राजकारण करत आहेत. त्यांचे नेते राहुल गांधी हे हिंदूंमधील शक्ती नष्ट करण्याबद्दल बोलतात. त्यांचे प्रवक्ते मंडीमधील महिलांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी करतात. मंडी हे नाव ऋषी मांडव यांच्या नावावरून मिळालं आहे. याठिकाणी ऋषी पराशर यांनी तपश्चर्या केली होती. अशा मंडीमधील महिलांबद्दल ते आक्षेपार्ह टिप्पणी करतात. त्यांच्याकडून यापेक्षा वेगळी काय अपेक्षा असेल”, अशा शब्दांत कंगनाने काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. मला हिरोइन किंवा स्टार समजू नका. मला तुमचीच बहीण किंवा मुलगी समजा, अशा शब्दांत अभिनेत्री व भाजप उमेदवार कंगना रणौत हिने मतदार संघातील लोकांना भावनिक आवाहन केले.

Web Title: Kangana ranaut roadshow in mandi jibes at opposition says those who could not be of lord ram nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • loksabha elections 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.