Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sleeping In Office: ऑफिसमध्ये थकव्याने लागली डुलकी? कारवाई होत असेल तर हायकोर्टाच्या निर्णयाने उडेल बॉसची झोप, काय सांगतो कायदा?

सध्याच्या काळामध्ये आपण अनेक तास ऑफिसमध्ये काम करत असतो. कामाचा ताण आणि थकवा यामुळे कधी कधी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी किंवा थोडा वेळ झोप लागण्याची शक्यता असते.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 05, 2025 | 03:42 PM
Sleeping In Office: ऑफिसमध्ये थकव्याने लागली डुलकी? कारवाई होत असेल तर हायकोर्टाच्या निर्णयाने उडेल बॉसची झोप, काय सांगतो कायदा?

Sleeping In Office: ऑफिसमध्ये थकव्याने लागली डुलकी? कारवाई होत असेल तर हायकोर्टाच्या निर्णयाने उडेल बॉसची झोप, काय सांगतो कायदा?

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या काळामध्ये आपण अनेक तास ऑफिसमध्ये काम करत असतो. कामाचा ताण आणि थकवा यामुळे कधी कधी कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये डुलकी किंवा थोडा वेळ झोप लागण्याची शक्यता असते. मात्र अशी डुलकी घेणे किंवा पॉवर नॅप घेणे कर्मचाऱ्यांना भीतीचे वाटते, बॉसने पाहिले तर अडचण निर्माण होऊ शकते म्हणून अनेक जण थकवा आलेला असताना देखील डुलकी घेणे टाळतात. आपल्याला कामावरून काढले जाऊ शकते अशी भीती वाटत असते. मात्र आता तुम्हाला ऑफिसमध्ये कामाच्या वेळेस डुलकी लागली तरी घाबरण्याचे कारण नाहीये.  यासाठी कर्नाटक हायकोर्टाने एक प्रकरणात दिलेला निकाल आपण जाणून घेऊयात.

कर्नाटकमधील एका पोलिस हवालदाराचा कामाच्या वेळेस डुलकी घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर कामाच्या वेळेत असे केल्यामुळे त्या पोलिस हवालदाराला निलंबित करण्यात आले होते. निलंबित केल्याने त्याने हवालदाराने कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली होती आणि दाद मागितली. यावर हायकोर्टाने आपला निकाल दिला आहे. भारतीय संविधानानुसार लोकांना झोपण्याचा आणि आराम करण्याचा अधिकार आहे. वेळोवेळी आराम आणि झोपेचे आयुष्यात महत्व असल्याचे हायकोर्टाने निकालात सांगितले आहे.

कायदा काय सांगतो? 

मानवधिकाराच्या कायद्याच्या कलम 24 नुसार, कामाच्या ठिकाणी कामावर असताना देखील आराम आणि सुट्ट्या घेण्याचा अधिकार प्राप्त झालेला आहे. ज्यात कामाच्या तासांची योग्य वेळ आणि पगारासह सुट्ट्यांचा समावेश आहे. कामाच्या दिवसांमध्ये दिवसाला 8 तास आणि आठवड्याला 48 तासांपेक्षा जास्त वेळ काम नसावे असे कायद्यात म्हटले आहे. काही परिस्थितीत हा नियम अपवाद असू शकतो.

काय आहे प्रकरण? 

निलंबित होण्याआधी कर्नाटक राज्य परिवहन महामंडळात काम करणाऱ्या एका हवालदाराने सलग 2 महीने 16 तास सलग शिफ्ट केली होती. त्यावलेस कामावर असताना त्याला काही वेळासाठी डुलकी लागली. यामुळे त्याला निलंबित करण्यात आले. त्यानंतर या हवालदाराने हायकोर्टात धाव घेतली होती. डुलकी लागली म्हणून निलंबित करणे हे योग्य नसल्याचे या हवालदाराने आपल्या याचिकेत म्हटले होते. यानंतर हायकोर्टाने केकेआरटीसीचा हा निर्णय रद्द केला. तसेच परिवहन विभागाला चांगले खडे बोल सुनावले. हवालदाराला विना विश्रांती दोन शिफ्टमध्ये काम लावणे ही प्रशासनाची चूक असल्याचे हायकोर्टाने म्हटले आहे.

हायकोर्टाचा आदेश काय?

निलंबित केलेल्या हवालदाराला निलंबित काळातील वेतन आणि अन्य इतर लाभ देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. याचिकाकरता एकाच शिफ्टमध्ये काम करताना असताना झोपला असतं टर ती त्याची चूक होती. मात्र विनय ब्रेक दोन महीने त्याला 16 तास काम करण्यास भाग पाडले गेले. कामाच्या ताणामुळे त्यांना दोन शिफ्टमध्ये काम करावे लागत होते. त्यामुळे एक दिवस त्याला डुलकी लागली म्हणून निलंबन करणे हे योग्य ठरत नाही, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

Web Title: Karnataka highcourt decision employee can take sleep at office article 24 about constable suspension case marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 05, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Best Sleep
  • High court
  • office work

संबंधित बातम्या

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन
1

CJI Bhushan Gawai: “आता खंडपीठ उभारणीसाठी…”; CJI भूषण गवई यांचे कोल्हापुरात प्रतिपादन

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान
2

Kabutar Khana News: “… हे अत्यंत महत्वाचं आहे; कबुतरखान्याच्या प्रकरणावर CM फडणवीसांचे महत्वाचे विधान

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी
3

५ उच्च न्यायालयांमध्ये १६ न्यायाधीशांची नियुक्ती, केंद्र सरकारकडून अधिसूचना जारी

Dadar Kabutarkhana closed : कबुतर पाळणे हे राजेशाही थाट! मात्र दाणा पाणी टाकण्याची अडवली आहे वाट
4

Dadar Kabutarkhana closed : कबुतर पाळणे हे राजेशाही थाट! मात्र दाणा पाणी टाकण्याची अडवली आहे वाट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.