कर्नाटक सरकारला हायकोर्टाचा दणका
कर्नाटकमध्ये संघावर बंदी घालण्याची मागणी
चित्तापुरमध्ये होणार संघाचे पथसंचलन
Karnataka Government Ban RSS: कर्नाटक सरकारचे मंत्री प्रियंक खरगे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. त्याबाबत पत्र लिहीत त्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना या प्रकरणी तपास करण्याचे आदेश दिले होते. संघाला सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रम घेण्यासाठी बंदी घालावी अशी मागणी केली होती. त्यानंतर 2 नोव्हेंबरला चित्तापुर येथे संघाचा एक कार्यक्रम होणार होता. त्याला तेथील स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली होती. मात्र आता या प्रकरणात हायकोर्टाने सरकारला दणका दिला आहे.
2 नोव्हेंबर रोजी चित्तापुर येथे संघाचा एक कार्यक्रम होणार होता. संघाचे पथसंचलन या ठिकाणी होणार होते. मात्र कायदा सुव्यवस्थेचे कारण डेट स्थानिक प्रशासनाने त्या संचलनाला परवानगी नाकारली होती. त्यानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांनी कर्नाटक हायकोर्टात धाव घेतली. त्यानंतर हायकोर्टाने संघाला या ठिकाणी पथसंचलन करण्याची परवानगी दिली आहे.
कर्नाटक सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 2 नोव्हेंबरला चित्तापुर येथे संचलन करण्याची परवानगी दिली आहे. चित्तापुर हा प्रियंक खरगे यांचा मतदारसंघ आहे. प्रियंक खरगे यांनी संघावर बंदी घालण्याची मागणी केली होती. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. दरम्यान स्थानिक प्रशासनाने उपस्थित केलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्यांना देण्यात आली आहेत. राज्यात इतर ठिकाणी देखील शांततेत मिरवणूक/कार्यक्रम पार पडले आहेत, असे याचिकाकर्त्यांनी हायकोर्टाच्या निदर्शनास आणून दिले.
RSS Ban होणार? देशातील ‘हे’ राज्य मोठ्या निर्णयाच्या तयारीत मुख्यमंत्र्यांनी दिले थेट कारवाईचे आदेश
रविवारी कर्नाटकातील चित्तपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली. चित्तपूर गृह राज्यमंत्री प्रियांक खरगे यांचा मतदारसंघ आहे. चित्तपूर हा कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा बालेकिल्ला मानला जातो. तिथे शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याची भीती अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. याच कारणास्तव त्यांनी आरएसएसच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली होती. पोलिस संरक्षणात नगर परिषदेने मुख्य रस्त्यावर आरएसएसने लावलेले कट-आउट आणि बॅनर काढून टाकण्यात आले होते. चित्तपूरमध्ये शांतता आणि कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून आणि कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी, १९ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या आरएसएसच्या पथ संचलन कार्यक्रमाची परवानगी नाकारण्यात आली होती.