कर्नाटकातील CM पदाचे दावेदार देशातील सर्वात श्रीमंत आमदार; अफाट संपत्तीचे मालक, कुठून येतो पैसा
कर्नाटकातील काँग्रेस सरकारमध्ये पुन्हा एकदा नेतृत्वबदलाची चर्चा रंगली आहे. येत्या दोन ते तीन महिन्यांत राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेऊ शकतात, असा दावा काँग्रेस आमदार एच.ए. इक्बाल हुसेन यांनी ३० जून रोजी केला होता. त्यांच्या या विधानामुळे कर्नाटकात सत्ताधारी काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी सुरू असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना, याचा निर्णय पक्षाच्या हायकमांडकडे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे शिवकुमार मुख्यमंत्री होणार की नाही, याबाबत सध्या शंका आहे. मात्र जर शिवकुमार मुख्यमंत्री बनले, तर ते देशातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्र्यांपैकी एक ठरतील. त्यांच्या अफाट संपत्तीची माहिती पाहिली, तर ते देशातील श्रीमंत नेत्यांमध्ये अग्रस्थानी आहेत.
एडीआर (Association for Democratic Reforms) आणि National Election Watch यांनी 2023 मध्ये प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, डी.के. शिवकुमार हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत आमदार आहेत.
एकूण संपत्ती – 1,413 कोटी
अचल संपत्ती – 273 कोटी
चल संपत्ती – 1,140 कोटी
एकूण कर्ज/देनदाऱ्या – 265 कोटी
अचल संपत्ती (Immovable Assets)
शेती जमीन – 30 कोटी
बिगरशेती जमीन – 70 कोटी
व्यावसायिक इमारती – 942 कोटी
निवासी इमारती – 84 कोटी
चल संपत्ती (Movable Assets)
रोख रक्कम – 16 लाख
बँकेत ठेव – 16 कोटी
शेअर्स व बाँड्स – 4.20 कोटी
मोटार गाडी – केवळ एक Toyota Qualis (8.35 लाख)
मौल्यवान घड्याळं – Rolex व Hublot ब्रँड्स
सोनं – सुमारे 2 किलो
चांदी – सुमारे 12 किलो (एकूण किंमत – 3.28 कोटी)
2008 ते 2023 पर्यंत संपत्तीत झपाट्याने वाढ
2008: ₹75 कोटी
2013: ₹251 कोटी
2018: ₹840 कोटी
2023: ₹1,413 कोटी
15 वर्षांत शिवकुमार यांच्या संपत्तीत तब्बल 18 पट वाढ
डी.के. शिवकुमार आणि त्यांची पत्नी विविध व्यवसायांमध्ये सक्रिय आहेत. त्यांच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत:
अचल संपत्ती भाड्याने देऊन मिळणारे उत्पन्न
शैक्षणिक संस्थांमधील गुंतवणूक
इतर व्यवसायिक उपक्रम
शिवकुमार यांची पत्नी सुद्धा आर्थिक व्यवहारांमध्ये सक्रिय असून कुटुंबाच्या संपत्तीत त्यांचाही मोठा वाटा आहे.
डी.के. शिवकुमार यांनी आपली राजकीय कारकीर्द 1989 मध्ये सुरू केली, तेव्हा ते वयाच्या केवळ 27 व्या वर्षी पहिल्यांदा आमदार बनले. त्यांनी 1989, 1994, 1999 आणि 2004 मध्ये सातनूर मतदारसंघातून विजय मिळवला. 2008 पासून ते कनकपूरा मतदारसंघातून सलग निवडून येत आहेत.
2023 मध्ये काँग्रेसच्या मोठ्या विजयानंतर त्यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. राजकीय वर्तुळात असे मानले जाते की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यात ढाई-ढाई वर्षांच्या रोटेशन सिस्टमवर मुख्यमंत्रीपदाचे ठरवण्यात आले आहे, ज्यानुसार 2025 च्या पहिल्या सहामाहीत शिवकुमार मुख्यमंत्री होऊ शकतात.
Asaduddin Owaisi : बिहारमध्ये NDA चं टेन्शन वाढलं! ओवेसींचा पक्ष महाआघाडीत सामील होणार
डी.के. शिवकुमार यांच्यावर करचुकवेगिरी व भ्रष्टाचाराचे आरोप देखील झाले आहेत. 2019 मध्ये प्रवर्तन संचालनालय (ED) ने त्यांना अटक केली होती. मात्र 2020 मध्ये त्यांना न्यायालयाकडून दिलासा मिळाला.
डी.के. शिवकुमार हे केवळ कर्नाटकच नव्हे तर देशाच्या राजकारणातील एक प्रभावशाली आणि संपन्न चेहरा म्हणून ओळखले जातात. जर ते मुख्यमंत्री झाले, तर संपत्तीच्या बाबतीत ते देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्र्यांमध्ये गणले जातील. परंतु त्यांच्या भूतकाळातील वाद, संपत्तीतील झपाट्याने वाढ, आणि राजकीय महत्वाकांक्षा यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार हे निश्चित आहे.