कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची खुर्ची धोक्यात? मल्लिकार्जुन खरगे यांच्या विधानाने खळबळ
कर्नाटकात काँग्रेस सरकारला दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर आता नेतृत्व बदलाचे वारे वाहू लागले आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचं पद धोक्यात असल्याची चर्चा असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे या चर्चांना आणखीन बळ मिळालं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसमधील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.
कर्नाटकातील मुख्यमंत्रीपदाच्या बदलाची चर्चा काही नवीन नाहीत. सरकार स्थापनेच्या वेळीच मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्यात अनौपचारिक वाटाघाटी झाल्याचं माणलं जातं. त्यानुसार सिद्धरामय्यांना अर्धा कार्यकाळ मुख्यमंत्री राहायचं, त्यानंतर शिवकुमार यांच्याकडे सूत्र सोपवण्यात यावीत, असा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितलं जात होतं. आता दोन वर्षांचा टप्पा गाठल्यानंतर, या तडजोडीच्या अंमलबजावणीची वेळ आल्याचा दावा काँग्रेस मधील काही नेत्यांमध्ये सुरू आहे.
याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे वरिष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा बंगळुरू दौरा आणि त्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांचं सूचक विधान या सगळ्याचा संबंध याच्याशी जोडला जात आहे. ऑक्टोबरमध्ये कर्नाटकात मुख्यमंत्रीपदात बदल होण्याची शक्यता आहे का, तेव्हा त्यांनी थेट नकार न देता म्हटलं – “हा निर्णय पूर्णपणे हायकमांडच्या हातात आहे. त्यांच्या मनात काय चाललंय हे कोणालाच माहीत नाही. मात्र या मुद्द्यावरून कुणीही अनावश्यक गोंधळ निर्माण करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे.
खरगेंच्या या उत्तरानं नेतृत्व बदलाच्या शक्यता अधिकच बळावल्या आहेत. कारण काँग्रेस अशा चर्चांवर थेट नकार दिला जातो, मात्र यावेळी खरगेंनी टोलवाटोलवीची भूमिका घेतल्यामुळेच राजकीय चर्चांना अधिक उधाण आलं आहे.
काँग्रेसमधील या गोंधळाचा भाजपा संधीसाधूपणे उपयोग करताना दिसतेय. भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी खरगेंच्या विधानावर जोर देत प्रश्न केला की, “हायकमांड म्हणजे नेमकं कोण?” “जेव्हा कर्नाटकातील नेतृत्वबदलाबाबत विचारण्यात आलं, तेव्हा काँग्रेस अध्यक्षांचं उत्तर होतं की निर्णय हायकमांड घेईल. पण त्यांना हेच माहीत नाही की हायकमांडमध्ये नक्की कोण आहे. म्हणजेच काँग्रेस पक्षात नेतृत्वाचा स्पष्ट अभाव आहे, अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या मागील काही महिन्यांपासून काँग्रेसच्या काही गटांच्या टीकेचे धनी ठरत आहेत. शेतकरी प्रश्न, दलित समाजाच्या असंतोषाची भावना, आणि काही धोरणात्मक निर्णयांमुळे त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दुसरीकडे, राज्याचं नेतृत्व आता डी.के. शिवकुमार यांच्याकडे सोपवावं असं , आता नेतृत्व त्यांच्याकडे सोपवण्याची वेळ झाली आहे.
Asaduddin Owaisi : बिहारमध्ये NDA चं टेन्शन वाढलं! ओवेसींचा पक्ष महाआघाडीत सामील होणार
काँग्रेस हायकमांडने अद्याप यावर अधिकृत भूमिका घेतलेली नसली, तरी खर्गेंच्या सूचक विधानामुळे नेतृत्व बदलाची शक्यता नाकारता येत नाही. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेतृत्व कर्नाटकमध्ये नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या विचारात आहे का, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं आहे.
सध्या तरी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपल्या पदावर कायम आहेत, मात्र राजकीय पारडं कधी आणि कसं झुकेल हे सांगता येत नाही. एकंदरीत, कर्नाटकमधील काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा उफाळून येताना दिसत आहे, आणि त्याचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटणार आहेत.