lalu prasad yadav Controversial statement on prayagraj mahakumbha mela
प्रयागराज : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळा सुरु आहे. मागील दोन महिन्यांपासून कोट्यवधी लोकांनी कुंभमेळ्यामध्ये स्नान केले आहे. मात्र लोकांची गर्दी, त्यांची चेंगराचेंगरी यामुळे देखील कुंभमेळा चर्चेत आला आहे. यापूर्वी मौनी अमावस्येला महाकुंभमेळ्यामध्ये चेंगराचेंगरी झाली. मात्र आता दिल्लीमध्ये महाकुंभमेळ्यामध्ये जाणाऱ्या रेल्वेचे वेळापत्रक बदलल्यामुळे दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी झाली. यामुळे देशभरामधून रोष व्यक्त केला जात आहे. यावरुन आता राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनी महाकुंभमेळ्यावर निशाणा साधला आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत १८ जणांच्या सर्व देशभरातून रोष आणि दुःख व्यक्त केलं जात आहे. लालू प्रसाद यादव यांनी देखील झालेल्या चेंगराचेंगरीवरुन सरकारवर रोष व्यक्त करत आक्रमक पवित्रा घेतला आहे. मृत्यूबद्दल शोक व्यक्त करताना त्यांनी म्हटले आहे की, या घटनेला रेल्वेचे गैरव्यवस्थापन जबाबदार आहे. त्यांनी सांगितले की, या घटनेने त्यांना खूप दुःख झाले आहे, परंतु रेल्वेमंत्र्यांनी याची जबाबदारी घेतली पाहिजे. रेल्वेचे हे अनियोजन आहे ज्यांच्यामुळे एवढे जीव गेले आहेत. रेल्वेमंत्र्यानी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा, अशी मागणी लालू प्रसाद यादव यांनी केली आहे.
महाकुंभमेळ्याबाबत मत विचारले असता लालू प्रसाद यादव यांनी वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. लालू प्रसाद यादव यांना माध्यमांनी महाकुंभमेळ्याबाबत विचारले असता ते म्हणाले की,कुंभ…कुंभ..कुंभ… कुंभला काही अर्थ नाहीए. फालतू आहे कुंभ अशीही टीका लालप्रसाद यादव यांनी म्हटले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
प्रयागराज त्रिवेणीमध्ये आतापर्यंत ५० कोटींहून अधिक लोकांनी पवित्र कुंभ स्नान केले आहे. आजही लाखो भाविक दररोज कुंभस्नान करत आहेत. देशातील सामान्य लोकांपासून ते खास लोकांपर्यंत, प्रत्येकजण कुंभस्नानासाठी उत्सुक असतो. पण, लालू कुटुंब कुंभस्नानाला न जाण्याबद्दल विरोधी पक्ष सतत प्रश्न विचारत आहेत. आता, कुंभस्नानाबाबत लालू यादव यांच्या विधानानंतर राजकीय गोंधळ निर्माण होण्याची शक्यता आहे.
जेडीयूने दिला सल्ला
कुंभमेळ्यावरील लालू यादव यांच्या विधानावर, जेडीयूने त्यांना राजकारण करू नका असा सल्ला दिला आहे. जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते राजीव रंजन म्हणाले आहेत की, राजकारण करण्याऐवजी आपण जखमींना आणि मृतांच्या कुटुंबियांना कशी मदत करू शकतो याबद्दल बोलले पाहिजे आणि आपण राजकारण करू नये. असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
त्यांनी सांगितले की जनता दल युनायटेड त्यांच्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांसोबत उभा आहे. जेडीयूच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, रेल्वे मंत्रालय आणि भारत सरकार पीडितांना सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे.
नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरी
शनिवारी रात्री उशिरा नवी दिल्ली रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १३ आणि १४ वर चेंगराचेंगरी झाली. प्रवाशांमध्ये प्लॅटफॉर्म क्रमांक १६ आणि १४ मध्ये गोंधळ उडाला. खरंतर, प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून एक ट्रेन प्रयागराजला जाणार होती. प्रवासी त्याची वाट पाहत असतानाच, प्लॅटफॉर्म क्रमांक १६ वरून दुसरी ट्रेन सुटणार असल्याची घोषणा करण्यात आली.
देशातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर प्रवासी गोंधळले आणि १४ ते १६ च्या दिशेने धावू लागले. या चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर, रेल्वेने प्लॅटफॉर्मवरील गर्दीचा ताण कमी करण्यासाठी चार विशेष गाड्यांची व्यवस्था केली आहे. मृत आणि जखमींना भरपाईची घोषणाही करण्यात आली आहे.