ष्णोदेवीच्या मार्गावर दरड कोसळली, दोन यात्रेकरु ठार, प्रवासावर तात्पुरती बंदी
नवी दिल्ली: माता वैष्णोदेवीच्या पदयात्रा मार्गावर एक मोठी दुर्घटना घडली आहे. पदयात्रा मार्गावर सोमवारी सकाळी ( 2 सप्टेंबर) ला दरड कोसळल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत दोन महिला यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची माहिती पीटीआय वृत्तसंस्थेने दिली आहे. तर अनेक भाविक जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच परिस्थितीत नियंत्रित आणण्यासाठी घटनास्थली बचावक पथक पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे. कटराचे SDM पीयूष धोत्रा यांनी माध्यांमांशी बोलताना माहिती दिली की, भूस्सखलन झाल्याने दरड कोसळली आहे, यामुळे जखमी झालेल्या भाविकांना तात्काळ रुग्णालयात दाख करण्यात आले आहे. तसेच अपघातानंतर हा प्रवास तात्पुरता थांबवण्यात आला आहे.
तसेच माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाने आपल्या निवेदनात म्हटले आहे, “श्री माता वैष्णोदेवी तीर्थ मार्गावर दगड पडण्याची आणि दरड कोसळण्याची घटना घडली आहे. मंडळाचे आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आहे.” मीडिया रिपार्टनुसार, प्रशासनाने भाविकांना यात्रेदरम्यान सावध राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, रस्त्याची परिस्थिती लक्षात घेऊन पुढे न जाण्याचा सल्ला दिला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा मार्गावरील वाहतूक तात्पुरती थांबवण्यात आली आहे. बचावकार्य सुरू आहे. तसेच प्रवासी मार्ग खुला करण्याची कार्यवाही सुरू आहे.
#WATCH | Katra, J&K: Katra SDM Piyush Dhotra says, “A landslide occurred in which two people lost their lives and one person is injured…The dead bodies and injured are being brought to the hospital…” https://t.co/TeFLovCPWA pic.twitter.com/HbWNyYqPCU
— ANI (@ANI) September 2, 2024
लाखो भाविक दर्शनासाठी येतात
याआधी 1 सप्टेंबर रोजी हवामान खात्याने जम्मू-काश्मीरमध्ये 12 सप्टेंबरपर्यंत कोरडे हवामान राहण्याची शक्यता वर्तवली होती. काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता होती. मात्र आज दरड कोसळण्याच्या घटनेने भाविक चिंतेत पडले आहेत. हिंदू धर्माच्या अनुयायांमध्ये वैष्णोदेवीच्या मंदिरावर प्रचंड श्रद्धा आहे. गेल्या वर्षी विक्रमी भाविक दर्शनासाठी आले होते. या काळात ९३.५ लाख भाविकांनी वैष्णोदेवी मंदिरात दर्शन घेतले. एका दशकात येथे येणाऱ्या भाविकांची ही सर्वात मोठी संख्या असल्याचे सांगण्यात आले. यापूर्वी 2013 मध्ये 93.24 लाख भाविक दर्शनासाठी वैष्णोदेवी मंदिरात पोहोचले होते.
108 शक्तीपीठांपैकी एक मंदिर वैष्णोदेवी मंदिर
देवी दुर्गा मातेल समर्पित हे वैष्णोदेवी मंदिर 108 शक्तीपीठांपैकी एक आहे. दरवर्षी लाखो भाविक या तीर्थक्षेत्राला भेट देतात. भारतातील सर्वात जास्त भेट देणाऱ्या तीर्थक्षेत्रापैकी वैष्णवदेवी मंदिर आहे. तसेच भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी देखील हे एक मंदिर आहे. नवरात्रीसारख्या सणांमध्ये या ठिकाणी लोखो भक्त दुर्गा मातेच्या दर्शनासाठी येतात. या मंदिराचे व्यवस्थापन आणि प्रशासन श्री माता वैष्णोदेवी श्राइन बोर्डाद्वारे संभाळले जाते.