Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर

भारतीय निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. जाणून घ्या या निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Sep 24, 2025 | 04:58 PM
राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला; जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
Follow Us
Close
Follow Us:
  • राज्यसभा निवडणुकीचा बिगुल वाजला
  • जम्मू-काश्मीर आणि पंजाबच्या ५ जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर
  • पाहा संपूर्ण वेळापत्रक

Punjab Jammu Kashmir Rajya Sabha Election 2025: भारतीय निवडणूक आयोगाने बुधवारी जम्मू-काश्मीर आणि पंजाबमधील राज्यसभा जागांसाठी पोटनिवडणुका जाहीर केल्या आहेत. आयोगाच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीरमधील ४ आणि पंजाबमधील १ अशा एकूण ५ राज्यसभा जागांसाठी २४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्याच दिवशी म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाईल.

#UPDATE | चुनाव आयोग ने पंजाब और जम्मू-कश्मीर में राज्यसभा की कुल 5 सीटों के लिए उपचुनाव की घोषणा की है। इसमें पंजाब की एक और जम्मू-कश्मीर की चार सीटें शामिल हैं। इन सभी सीटों के लिए मतदान और मतगणना एक ही दिन, 24 अक्टूबर को होगी। प्रक्रिया 6 अक्टूबर से शुरू होगी। कॉपीराइट-फ्री… pic.twitter.com/7FQosYu7Jn — PB-SHABD (@PBSHABD) September 24, 2025

संपूर्ण वेळापत्रक

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, जम्मू-काश्मीरमधील चार आणि पंजाबमधील एका राज्यसभा जागेसाठीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

  • अधिसूचना जारी: ६ ऑक्टोबर
  • अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख: १३ ऑक्टोबर
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: १६ ऑक्टोबर
  • मतदान: २४ ऑक्टोबर (सकाळी ९ ते सायंकाळी ४)
  • मतमोजणी: २४ ऑक्टोबर (सायंकाळी ५ वाजता)

Leh Protest: लेहमध्ये हिंसाचार! ‘या’ मागणीसाठी भाजप ऑफिस पेटवले अन्…; नेमके प्रकरण काय?

जम्मू-काश्मीरमध्ये ४ वर्षांपासून जागा रिक्त

जम्मू-काश्मीरमधील राज्यसभा जागा गेल्या सुमारे ४ वर्षांपासून रिक्त आहेत. गुलाम नबी आझाद, शमशेर सिंग मन्हास, नझीर अहमद लावे आणि फयाज अहमद मीर या चार राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ फेब्रुवारी २०२१ मध्ये संपला होता. जम्मू-काश्मीर ऑक्टोबर २०२४ पर्यंत राष्ट्रपती राजवटीखाली असल्यामुळे या जागांसाठी निवडणुका होऊ शकल्या नव्हत्या. आता केंद्रशासित प्रदेशात विधानसभा कार्यरत असल्याने निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्या आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये कलम ३७० हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरला केंद्रशासित प्रदेश घोषित करण्यात आले. केंद्रशासित प्रदेश म्हणून जम्मू-काश्मीरमध्ये राज्यसभा निवडणुका होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पंजाबची जागा का झाली रिक्त?

पंजाबमधील राज्यसभेची जागा खासदार संदीप अरोरा यांच्या राजीनाम्यानंतर जुलैमध्ये रिक्त झाली होती. अरोरा यांनी आता पंजाब सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. त्यांनी लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या तिकिटावर पोटनिवडणूक जिंकली होती.

Web Title: Rajya sabha by election jammu kashmir punjab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2025 | 04:58 PM

Topics:  

  • Election Commision
  • Jammu and Kashmir
  • Nation News
  • Punjab
  • Rajyasabha Election

संबंधित बातम्या

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा
1

Railway Employees Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस; सरकारची मोठी घोषणा

Satyendar Kumar Jain: सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीकडून आणखी एक कारवाई! ७.४४ कोटींची मालमत्ता जप्त
2

Satyendar Kumar Jain: सत्येंद्र जैन यांच्यावर ईडीकडून आणखी एक कारवाई! ७.४४ कोटींची मालमत्ता जप्त

Jammu-Kashmir News: कश्मीरी हिंदूंची मोठी मागणी…; पण सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली?
3

Jammu-Kashmir News: कश्मीरी हिंदूंची मोठी मागणी…; पण सर्वोच्च न्यायालयाने का फेटाळली?

Ujjwala Yojana: मोदी सरकारची मोठी घोषणा! उज्ज्वला योजनेचा विस्ताराला मंजुरी, २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
4

Ujjwala Yojana: मोदी सरकारची मोठी घोषणा! उज्ज्वला योजनेचा विस्ताराला मंजुरी, २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.