Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तडकाफडकी भाजपच्या दोन खासदारांचा राजकारणालाच रामराम; तर दुसरीकडे लोकसभेची यादी जाहीर, या टायमिंग काय आहे रहस्य, वाचा सविस्तर

  • By युवराज भगत
Updated On: Mar 02, 2024 | 08:26 PM
Two MPs of the BJP hastily indulged in politics; On the other hand, Lok Sabha list announced, what is the timing of this secret, read in detail

Two MPs of the BJP hastily indulged in politics; On the other hand, Lok Sabha list announced, what is the timing of this secret, read in detail

Follow Us
Close
Follow Us:
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) भाजपमध्ये गेल्या दोन दिवसांपासून पहिल्या उमेदवार यादीची प्रतीक्षा असतानाच अवघ्या 24 तासांमध्ये दोन खासदारांनी राजकारणाला तडकाफडकी रामराम केल्याने खळबळ उडाली आहे. गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि जयंत सिन्हा (Jayant Sinha) या दोन भाजप खासदारांनी राजकारणातून संन्यास घेतला आहे. गंभीरने पुन्हा क्रिकेटशी निगडीत बाबींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे. जयंत सिन्हा यांनी राजकारणातून बाजूला होत भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन, असे म्हटले आहे.
I have requested Hon’ble Party President Shri @JPNadda ji to relieve me of my direct electoral duties so that I can focus my efforts on combating global climate change in Bharat and around the world. Of course, I will continue to work with the party on economic and governance… — Jayant Sinha (@jayantsinha) March 2, 2024
जयंत सिन्हांचा राजकारणाला रामराम
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल-मेमध्ये होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे निश्चित करण्यासाठी आयोजित केलेल्या मॅरेथॉन बैठकीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने सुमारे 16 राज्यांच्या नावांवर चर्चा केली. पहिल्या यादीत अनेक दिग्गजांची नावे येऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे भाजपमध्ये तिकिट कापल्यानंतरही नाराजी उफाळण्याची चिन्हे आहेत. हजारीबागचे खासदार जयंत सिन्हा यांनी निवडणुकीच्या जबाबदारीतून मुक्त होण्याची मागणी केली आहे. एका ट्विटमध्ये ते म्हणाले की, मी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना माझ्या थेट निवडणुकीच्या कर्तव्यातून मुक्त करण्याची विनंती केली आहे जेणेकरून मी भारत आणि जगभरातील जागतिक हवामान बदलांना तोंड देण्यासाठी माझे प्रयत्न केंद्रित करू शकेन.
I have requested Hon’ble Party President @JPNadda ji to relieve me of my political duties so that I can focus on my upcoming cricket commitments. I sincerely thank Hon’ble PM @narendramodi ji and Hon’ble HM @AmitShah ji for giving me the opportunity to serve the people. Jai Hind! — Gautam Gambhir (@GautamGambhir) March 2, 2024
गंभीरने सुद्धा सक्रिय राजकारणातून निवृत्ती
याआधी खासदार गौतम गंभीरने असेच ट्विट करून जेपी नड्डा यांना निवडणूक ड्युटीतून मुक्त करण्याची मागणी केली होती. त्यांच्या विनंतीनंतर काही तासांनी जयंत सिन्हा यांनीही ट्विट करून अशीच मागणी केली आहे. आपल्या पोस्टमध्ये आर्थिक आणि प्रशासनाशी संबंधित मुद्द्यांवर मी पक्षासोबत काम करत राहीन, असे ते म्हणाले. गेली दहा वर्षे भारतातील आणि हजारीबागच्या जनतेची सेवा करण्याचे सौभाग्य मला मिळाले. त्यांनी लिहिले की, ‘याशिवाय, मला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजप नेतृत्वाने दिलेल्या अनेक संधींचा आशीर्वाद मिळाला आहे. त्या सर्वांचे माझे मनःपूर्वक आभार. जय हिंद.’
दुसरीकडे, माजी क्रिकेटपटू आणि भाजपचे विद्यमान खासदार गौतम गंभीरने सुद्धा सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती त्याने सोशल मीडियावर शेअर केली आहे. गौतम गंभीर पूर्व दिल्लीतून भाजप खासदार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आज आपली पहिली यादी जाहीर करू शकते. यावेळी अनेक विद्यमान खासदारांची तिकिटे कापली जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
I have requested Hon’ble Party President @JPNadda ji to relieve me of my political duties so that I can focus on my upcoming cricket commitments. I sincerely thank Hon’ble PM @narendramodi ji and Hon’ble HM @AmitShah ji for giving me the opportunity to serve the people. Jai Hind! — Gautam Gambhir (@GautamGambhir) March 2, 2024
गौतम गंभीरने सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे, “मी पक्षाचे माननीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना विनंती केली आहे. मला माझ्या राजकीय कर्तव्यातून मुक्त करावे, जेणेकरून मी माझ्या आगामी क्रिकेट वचनबद्धतेवर लक्ष केंद्रित करू शकेन. मी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांचे आभारी आहे. आदरणीय, मला लोकांची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी गृहमंत्र्यांचे मनापासून आभार मानतो, जय हिंद!”
गौतम गंभीरने 22 मार्च 2019 रोजी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. भाजपने पूर्व दिल्ली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. गौतम गंभीरने आम आदमी पार्टीचे आतिशी आणि काँग्रेसचे अरविंदर सिंग लवली यांचा पराभव करून ही जागा जिंकली होती. गंभीरने 2014 मध्ये फौंडेशनची स्थापना केली होती. दिल्लीत कोणीही उपाशी झोपू नये हा या फौंडेशनचा उद्देश होता. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी, 2017 मध्ये पटेल नगर, दिल्लीत एक सामुदायिक स्वयंपाकघर स्थापन करण्यात आले. फौंडेशनचा मुख्य प्रकल्प निमलष्करी शहीदांच्या जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्या संपूर्ण शैक्षणिक गरजा पूर्ण करून त्यांना सक्षम करणे हा आहे. याव्यतिरिक्त, GGF पोषण, आरोग्य आणि स्वच्छतेबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी वंचित घरांतील किशोरवयीन मुलींसोबत काम करते आणि शहरातील वायू प्रदूषणाशी लढण्यासाठी वृक्षारोपण करून हरित दिल्ली करण्याचा प्रयत्न करते.

Web Title: Lok sabha election 2024 in just a few hours two mps of bjp have gone to politics what actually happened read the details nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 02, 2024 | 08:26 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024
  • loksabha election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.