
मदिना- हैदराबाद विमानाचे अहमदाबादमध्ये अचानक लॅंडींग
एका प्रवाशाचा आपल्याजवळ बॉम्ब असल्याचा दावा
कोणतीही संशयास्पद वस्तु आढळून आलेली नाही
मदिनावरून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो एअरलाइन्सचे फ्लाइटचे अहमदाबादमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. अचानक इंडिगो फ्लाइटमध्ये धावपळ सुरू झाली. विमानातील एका प्रवाशाने आपल्याजवळ बॉम्ब असल्याचे सांगताच एकच खळबळ उडाली. यानंतर या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग अहमदाबादमध्ये करण्यात आले आहे.
एका प्रवाशाने माझ्याकडे बॉम्ब आहे असे सांगताच इंडिगो फ्लाइटचे इमर्जन्सी लँडिंग अहमदाबादमध्ये करण्यात आले . सुरक्षा यंत्रणेने विमानाची तपासणी केली. तपासणी केली असता या व्यक्तीजवळ कोणतीही संशयास्पद वस्तु आढळून आली नाही. समोर आलेल्या माहितीनुसार, विमानातील एका प्रवाशाने आपल्याकडे बॉम्ब असल्याचे सांगताच खळबळ उडाली आहे.
व्यक्तीने असे सांगताच विमानातील स्टाफने एटीसीला संपर्क केला. त्यांनंतर हैदराबादला जाणारे हे विमान अहमदाबादमध्ये उतरवण्यात आले. सकाळी 11.30 वाजता अहमदाबादमध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले. तातडीने बॉम्ब शोधक पथक दाखल झाले अन विमानाची तपासणी करण्यात आली.
200 विमाने रद्द…! 3 ते 8 तास उड्डाण उशिराने
कुवेतहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानाला विमानात “मानवी बॉम्ब” असल्याची धमकी मिळाल्यानंतर विमानाची मुंबई विमानतळावर आत्पकालीन लॅंडिंग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दिल्ली विमानतळावर ईमेलद्वारे ही धमकी देण्यात आल्याने धोका लक्षात घेता पाललटने मुंबई विमानतळावर विमानाचे आत्पातकालीन लॅंडिग केले.
मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी कुवैतहुन हैदराबादला निघालेल्या इंडिगोच्या विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकीचा मेल दिल्ली विमानतळ अधिकाऱ्यांना प्राप्त झाला. या मेलमध्ये विमानात मानवी बॉम्ब असल्याची धमकी नमुद करण्यात आली होती. जी अधिकाऱ्यांना अत्यंत संवेदनशील वाटत होती. मेल मिळताच विमानतळ अधिकारी ताबडतोब सतर्क झाले. अधिकाऱ्यांनी पायलटला विमानाचे मुंबई विमानतळावरच लँडिग करण्यास सांगितले. टेकऑफनंतर लगेचच या धमकीमुळे विमान मुंबईकडे वळवण्यात आले.
Breaking: मोठा धोका टळला! इंडिगो विमानाची वाराणसीत ‘इमर्जन्सी लँडिंग’; नेमका कोणता झाला बिघाड?
गेल्या काही महिन्यांपासून विमानतळांना सातत्याने बॉम्बच्या धमक्या दिल्या जात आहेत. सोमवारी, महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड परिसरातील एका खाजगी शाळेला बॉम्बची धमकी मिळाली. सकाळी ६:३० च्या सुमारास शाळेच्या कार्यालयात एक ईमेल आला, ज्यामध्ये शाळेत बॉम्ब ठेवल्याचे आणि त्याचा स्फोट करणार असल्याचे म्हटले होते.