गेल्या दोन-तीन दिवसापासुन लक्षद्वीप प्रकरण (Lakshdweep) चांगलच गाजतयं. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) लक्षद्वीप दौऱ्यादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मालदीवच्या मंत्र्यानी सध्या केलेली पोस्ट चर्चेत आहे. भारतविरोधी सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या मालदीवच्या मंत्र्यांना निलंबित करण्यात आले आहे, अशी बातमी सध्या मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, तथ्य तपासणीत ही माहिती खोटी असल्याचे सिद्ध झाले आहे. मालदीवचे उपमंत्री हसन जिहान यांनी स्वतःच्या निलंबनाचे वृत्त खोटे असल्याचे म्हटले आहे.
[read_also content=”पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यावर मालदीवच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर एकच चर्चा! https://www.navarashtra.com/india/maldive-minister-controversial-social-media-post-about-narendra-modi-lakshdweep-tour-nrps-495808.html”]
मालदीव सरकारने सांगितले की, परराष्ट्र मंत्रालयाने सोशल मीडियावर भारताबद्दल अपमानास्पद पोस्ट्सबाबत भारत सरकारच्या भूमिकेवर आपले विधान जारी केले आहे. भारत आणि पंतप्रधानांविरोधातील वक्तव्यानंतर मालदीवमध्ये जाणाऱ्या मोठ्या संख्येने भारतीय पर्यटकांनी आपले दौरे रद्द केले असल्याचे सांगण्यात येत आहे.
दुसरीकडे, मालदीव सरकारचा हवाला देत दावा केला जात आहे की, ज्यांनी सरकारमध्ये असताना सोशल मीडियावर काही आक्षेपार्ह पोस्ट केले होते, त्यांना त्यांच्या नोकरीतून निलंबित करण्यात आले आहे. अपुष्ट वृत्तानुसार, मंत्री मरियम शिउना, मलशा शरीफ आणि हसन जिहान यांना निलंबित करण्यात आले आहे. पण तथ्य तपासणीत ही बातमी खोटी असल्याचे सिद्ध झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या लक्षद्वीप भेटीचे फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केले होते. तो समुद्रकिनाऱ्यांवर फिरताना आणि स्नॉर्कलिंग करताना दिसला. हे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले. लक्षद्वीपमध्ये लोकांची आवड वाढली, त्यामुळे लक्षद्वीप गुगल सर्चमध्ये टॉपवर पोहोचला.
सोशल मीडियावर अनेकांनी दावा केला की लक्षद्वीपमध्ये मालदीवची जागा पर्यटन केंद्र म्हणून बदलण्याची क्षमता आहे. गेल्या वर्षी सुमारे एक लाख भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली. मालदीवला भेट देणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी हे प्रमाण ११ टक्के होते. मालदीव हे पर्यटनावर अवलंबून आहे. सरकारच्या 90% पेक्षा जास्त महसूल पर्यटनमधून येतो.
मालदीवचे नवे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू हे चीन समर्थक आहेत. त्यांनी भारताला मालदीवमधून आपले सैन्य मागे घेण्यास सांगितले आहे. मुइझ्झू यांनी पदभार स्वीकारल्यापासून, मालदीव पूर्वीच्या ‘इंडिया फर्स्ट’ धोरणावरून ‘इंडिया आउट’ धोरणाकडे वळले आहे.