झारखंड: ‘ दहशतवादी हल्ल्याचे गुप्तचर अहवाल असूनही केंद्राने पहलगाममध्ये अधिक सुरक्षा का तैनात केली नाही? हल्ल्याच्या तीन दिवस आधी गुप्तचर यंत्रणेने मोदीजींना अहवाल पाठवला होता, म्हणून मोदीजींनी काश्मीरला भेट देण्याचा त्यांचा कार्यक्रम रद्द केला.’ असा धक्कादायक आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी धक्कादायक आरोप केले आहेत. इतकेच नव्हे तर, जर सरकारने गुप्तचर यंत्रणेचे अपयश स्वीकारले आहे. पहलगाम हल्ल्यात झालेल्या जीवित आणि मालमत्तेच्या नुकसानीसाठी केंद्र सरकार जबाबदार असू नये का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. झारखंडमध्ये बोलताना मल्लिकार्जून खर्गेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.
मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, “देशात जे काही घडत आहे ते तुमच्या समोर आहे. २२ एप्रिल रोजी देशात एक भयानक दहशतवादी हल्ला झाला. २६ लोकांचा मृत्यू झाला आणि सरकारने हे गुप्तचर यंत्रणेचे अपयश असल्याचे मान्य केले. पण जर तुम्हाला याची माहिती होती तेव्हा तुम्ही त्याठिकाणी सुरक्षा व्यवस्था का तैनात केली नाही? काही गोष्टींची माहिती मिळाली आणि अनेक कागदपत्रेही मिळाली होती. ज्यात हल्ल्याच्या तीन दिवस आधी मोदीजींना एक पत्र पाठवण्यात आले होते, ज्यामुळे त्यांनी त्यांचा काश्मीर दौरा रद्द केला. हे वर्तमानपत्रात वाचले होते.
पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी ही माहिती का देण्यात आली नाही?
खर्गे म्हणाले की, जेव्हा गुप्तचर यंत्रणांनी तुमच्या संरक्षणासाठी तुम्ही तिथे जाणे योग्य नसल्याचे सांगितले होते, तेव्हा तुम्ही तुमच्या गुप्तचर यंत्रणांना, सुरक्षा यंत्रणांना, पोलिसांना, सीमा दलांनाही याबाबत का सांगितले नाही? मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमचा कार्यक्रम रद्द केला, पण मोठ्या संख्येने तिथे गेलेल्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तुम्ही काहीच पावले का उचलली नाहीत. तुम्ही त्यांच्यासाठी अधिक चांगली सुरक्षा पाठवू शकला असता. जेव्हा तुम्ही तुमची चूक मान्य करत असता तेव्हा या घटनेत इतक्या लोकांच्या मृत्यूची जबाबदारीही तुम्ही घेतली पाहिजे.
Aahilyangar News: अहिल्यानगरमध्ये शासकीय महाविद्यालयाची घोषणा; देवेंद्र फडणवीसांनी थेट नावच सांगितलं
खर्गे म्हणाले की, तुम्ही मरणाऱ्या लोकांकडे लक्ष देत नाही आहात, तुम्ही फक्त काँग्रेस सरकारला शिव्या देत आहात. पाकिस्तानविरुद्ध सरकारच्या लढाईत काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा देण्यास तयार आहोत कारण हा संपूर्ण देशाचा मुद्दा आहे. मी झारखंडमधील सर्व जनतेचे मनापासून आभार मानतो. तुमच्यामुळेच आम्हाला बहुमत मिळाले आणि आज झारखंडमध्ये एक मजबूत सरकार कार्यरत आहे. आम्ही जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आहोत. आमच्या सरकारचे मंत्री आणि आमदार सर्वजण मिळून लोकांसाठी चांगले काम करत आहेत. याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो.