
Mamata Banerjee expels Humayun Kabir from TMC party for statement on Babri Masjid
Babri Masjid Bhoomi Pujan : बंगाल : अयोध्येमध्ये श्री रामाच्या जन्मभूमीवर राम मंदिर बांधून पूर्ण झाले आहे. याचबरोबर धर्मध्वजरोहण करण्यात आले आहे. यामुळे भाजप नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला तर विरोधी नेत्यांनी जोरदार टीका केली. दरम्यान, बंगालच्या मुर्शिदाबाद जिल्ह्यात बाबरी मशीद बांधण्याचा आमदार हुमायू कबीर यांनी आग्रह धरला. त्यांनी बाबरी मशीद बांधण्याचा निर्धार केल्यानंतर त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
तृणमूल काँग्रेसने पक्षातून निलंबित केले आहे. तृणमूल काँग्रेसच्या आमदाराने ६ डिसेंबर रोजी बाबरी मशिदीची पायाभरणी करणार असल्याचे जाहीर केले होते.त्यांच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. आमदाराच्या या वक्तव्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील कबीरवर नाराज असल्याचे समोर आले आहे. त्यांनी असा दावा केला होता की बाबरी मशिदीची पायाभरणी करताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि अनेक वरिष्ठ तृणमूल नेते उपस्थित असतील.
हे देखील वाचा : महाराष्ट्रात महायुतीतील दुरावा वाढला? BJP ने पुन्हा एकनाथ शिंदेंकडे केला काणाडोळा, इशाराही टाळला
२८ नोव्हेंबर रोजी मुर्शिदाबाद जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पोस्टर्स लावण्यात आले होते, ज्यात असे म्हटले होते की बाबरी मशिदीचा पायाभरणी समारंभ ६ डिसेंबर रोजी बेलडांगा येथे होणार आहे. पोस्टर्समध्ये हुमायून कबीर यांना आयोजक म्हणून सूचीबद्ध करण्यात आले होते, ज्यामुळे वाद निर्माण झाला होता. तृणमूल काँग्रेसने त्यांच्या संपूर्ण प्रचारापासून स्वतःला दूर ठेवले. पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की हुमायून कबीर येत्या निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठी दबाव आणण्यासाठी ही युक्ती वापरत होते, परंतु त्यांचे प्रयत्न उलटे पडले. कबीर यांनी बंगाल पोलिसांना आव्हान दिले होते की, बाबरी मशिदीची पायाभरणी करण्यापासून कोणीही त्यांना रोखू शकणार नाही.
तृणमूल काँग्रेसमधून काढून टाकल्यानंतर हुमायून म्हणाले, “मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी २२ डिसेंबर रोजी माझ्या नवीन पक्षाची घोषणा करेन. विधानसभा निवडणुकीत मी १३५ जागांवर उमेदवार उभे करेन. मी दोघांविरुद्ध (तृणमूल काँग्रेस आणि भाजप) निवडणूक लढवीन.”असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला आहे.
हे देखील वाचा : नाशिकच्या तपोवन वृक्षतोडी वरुन पेटलं रान! सयाजी शिंदेंनी काढले सरकारचे वाभाडे
मी बाबरी मशिदीची पायाभरणी करेन – हुमायून
टीएमसीमधून काढून टाकल्यानंतर हुमायून कबीर म्हणाला, “मी ६ डिसेंबर रोजी बाबरी मशिदीची पायाभरणी करेन. ही माझी वैयक्तिक बाब आहे. कोणत्याही पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही. त्यांनी २०१५ मध्ये मला सहा वर्षांसाठी निलंबित केले होते. आता पुन्हा एकदा, यावर माझे काहीही म्हणणे नाही. त्यांना जे काही करायचे ते करू द्या.”
कोलकात्याचे महापौर म्हणाले, “हुमायूनला आधी इशारा देण्यात आला होता.”
कोलकात्याचे महापौर फिरहाद हकीम म्हणाले, “आम्हाला लक्षात आले की मुर्शिदाबादमधील आमच्या एका आमदाराने अचानक बाबरी मशिदीच्या बांधकामाची घोषणा केली. अचानक का? आम्ही त्यांना आधीच इशारा दिला होता. त्यांचे विधान पक्षाच्या विरोधात आहे.”
कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
आमदार हुमायून कबीर यांनी गुरुवारी बाबरी मशिदीच्या बांधकामाच्या प्रस्तावाविरुद्ध कोलकाता उच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली. हुमायून कबीर यांचा प्रस्ताव संविधानाचे उल्लंघन करतो असे म्हटले गेले. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांचे खंडपीठ या प्रकरणाची सुनावणी करू शकते.