आजपासून अनेक नियमांत होणार बदल; तुम्ही UPI वापरत असाल तर 'ही' माहिती जाणून घ्याच...!
नवी दिल्ली : नवीन महिना सुरु होतानाच एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत काही प्रमाणात बदल केला जातो. त्यातच आजपासून जुलै महिना सुरु होत आहे. त्यानुसार, आता 1 जुलैपासून देशभरात अनेक मोठे नियम बदलणार आहेत. ज्याचा थेट तुमच्या खिशावर आणि जीवनशैलीवर परिणाम होऊ शकतो. जर तुम्ही यूपीआय वापरत असाल तर याची माहिती तुम्हाल असणे गरजेचे आहे.
आता बँका एनपीसीआयकडून पुन्हा परवानगी न घेता चार्जबॅक क्लेमची प्रक्रिया स्वतः करू शकतात. यामुळे ग्राहकांना जलद आणि अधिक प्रभावी उपाय मिळू शकणार आहे. तसेच बँकिंग ते एलपीजी सिलेंडरची किंमत, ट्रेन तिकीट बुकिंग, यूपीआय चार्जबॅक, जीएसटी रिटर्न आणि पॅन कार्डशी संबंधित अनेक नवीन नियम लागू होणार आहेत. नवीन महिन्याच्या सुरुवातीपासून लागू होणारे हे बदल सामान्य माणसासाठी खूप महत्त्वाचे आहेत.
हेदेखील वाचा : Stock Market Today: गुंतवणूकदारांनो इकडे लक्ष द्या! अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला सल्ला
याशिवाय, 1 जुलैपासून नवीन पॅन कार्ड काढण्यासाठी आधार पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे. आता फक्त आयडी प्रूफ किंवा जन्म प्रमाणपत्र काम करणार नाही. या बदलामुळे कर प्रणालीत पारदर्शकता वाढेल आणि बनावट पॅन बनवणाऱ्यांना आळा बसेल.
आयकर विभागाकडून करदात्यांना दिलासा
आयकर विभागाने आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख 31 जुलैवरून 15 सप्टेंबरपर्यंत वाढवून करदात्यांना दिलासा दिला आहे. यामुळे लोक घाई न करता त्यांचे रिटर्न योग्यरित्या भरू शकतील. तसेच, अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेने एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क वाढवले आहे. आयसीआयसीआयमध्ये ५ मोफत व्यवहारांनंतर, प्रति व्यवहार २३ रुपये आकारले जातील, तर आंतरराष्ट्रीय एटीएममध्ये १२५ रुपये आणि ३.५ टक्के चलन रूपांतरण शुल्क भरावे लागेल.
हेदेखील वाचा : स्वप्नवत घर… पण फक्त स्वप्नातच! मुंबईत घर घेणं अशक्यच? २ बीएचके खरेदी करण्यासाठी १०० वर्षे करावी लागेल बचत