Stock Market Today: गुंतवणूकदारांनो इकडे लक्ष द्या! अशी होणार आज शेअर बाजाराची सुरुवात, तज्ज्ञांनी दिला सल्ला
1 जुलै आज महिन्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात काय होणार आहे? गुंतवणूकदारांसाठी कोणते शेअर्स फायद्याचे ठरणार आहे? गुंतवणूकदारांनी कोणते शेअर्स खरेदी करावेत? याबाबत तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे. शिवाय तज्ज्ञांनी काही शेअर्सची देखील शिफारस केली आहे, ज्यांची खरेदी केली जाऊ शकते. आजच्या शेअर बाजाराविषयी तज्ज्ञांनी काय सांगितलं आहे, जाणून घेऊया.
जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज 1 जुलै रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे. गिफ्ट निफ्टीवरील ट्रेंड देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकाची सुरुवात स्थिर असल्याचे दर्शवितात. सोमवारी सेन्सेक्स ४५२.४४ अंकांनी म्हणजेच ०.५४% ने घसरून ८३,६०६.४६ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १२०.७५ अंकांनी म्हणजेच ०.४७% ने घसरून २५,५१७.०५ वर बंद झाला. त्यामुळे सोमवारी झालेल्या घसरणीनंतर आज शेअर बाजाराची सुरुवात सपाट पातळीवर होण्याचा अंदाज गुंतवणूकदारांनी वर्तवला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
सलग तीन सत्रे वाढल्यानंतर, भारतीय शेअर बाजारातील प्रमुख बेंचमार्क निर्देशांक सोमवारी खाली आले. निफ्टी ५० निर्देशांक १२० अंकांनी घसरून २५,५१७ वर बंद झाला, बीएसई सेन्सेक्स ४५२ अंकांनी घसरून ८३,६०६ वर बंद झाला, तर बँक निफ्टी निर्देशांक १३१ अंकांनी घसरून ५७,३१२ वर बंद झाला. निफ्टीवरील आघाडीच्या कामगिरी करणाऱ्या कंपन्यांमध्ये ट्रेंट, बीईएल आणि एसबीआय हे आघाडीवर होते.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जागतिक बाजारातील मिश्र संकेतांमुळे आज 1 जुलै रोजी मंगळवारी भारतीय शेअर बाजारातील बेंचमार्क निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता आहे.प्रभुदास लिल्लाधर येथील तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्षा वैशाली पारेख यांनी आज गुंतवणूकदारांना TCS, झेन टेक आणि UCO बँक हे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.
फेडरल बँक, जेके सिमेंट, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर, भारत फोर्ज, एसजेव्हीएन, अपोलो हॉस्पिटल्स, भारत इलेक्ट्रॉनिक्स, गोदरेज इंडस्ट्रीज, हिंदुस्तान कॉपर, सीजी पॉवर, हे शेअर्स आज गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. MOFSL च्या वेल्थ मॅनेजमेंटच्या डेरिव्हेटिव्ह्ज अँड टेक्निकल्स प्रमुख चंदन टपारिया यांनी आज गुंतवणूकदारांना भारत डायनॅमिक्सचे शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे.