जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस; जनजीवन विस्कळीत
28 Aug 2025 06:12 PM (IST)
IMD Rain Alert: राज्यभरात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान वरुणराजा देखील बाप्पाच्या स्वागतासाठी हजेरी लावताना दिसून येत आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला आहे. मराठवाड्याला तर पावसाने झोडपून काढले आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. येत्या काही तासांमध्ये राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
28 Aug 2025 05:50 PM (IST)
Banagladesh News In Marathi : ढाका : गेल्या काही दक्षिण आशियामध्ये चीनचा (China) प्रभाव वाढत चालला आहे. बांगलादेशमध्येही (Bangladesh) मोहम्मद युनूस (Muhammad Yuns) राजवट चीन समर्थक बनत चालले आहे. याच पार्श्वभूमीवर एक मोठी माहिती समोर आली आहे. बांगलादेश चीनकडून J-10 लढऊ विमाने खरेदी करण्याच्या विचारात आहे. १२ लढाऊ विमाने खरेदी केली जाण्याची शक्यता आहे.
28 Aug 2025 05:22 PM (IST)
अभियांत्रिकी आणि ईपीसी क्षेत्रातील कंपनी विक्रान इंजिनिअरिंगचा ७७२ कोटी रुपयांचा आयपीओ गुंतवणूकदारांमध्ये सतत चर्चेत आहे. बोलीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी दुपारी १२:१५ वाजेपर्यंत, या इश्यूला ४.१२ वेळा सबस्क्राइब केले गेले आहे. आतापर्यंत, रिटेल श्रेणीमध्ये ४.१९ वेळा, एनआयआय श्रेणीमध्ये ८.५७ वेळा आणि क्यूआयबी श्रेणीमध्ये ०.६६ वेळा सबस्क्राइब केले गेले आहे. सबस्क्रिप्शनच्या दुसऱ्या दिवशी वाढ झाली आहे. हे लक्षात घेण्यासारखे आहे की सबस्क्रिप्शनच्या पहिल्या दिवशी, या इश्यूला २.५१ वेळा सबस्क्राइब केले गेले होते.
28 Aug 2025 05:21 PM (IST)
मारुती सुझुकी ही देशातील आघाडीची ऑटो कंपनी आहे, ज्यांनी विविध सेगमेंटमध्ये दमदार कार ऑफर केल्या आहेत. Maruti Brezza ही त्यातीलच एक सुपरहिट कार. ही कार खरेदी करताना 28 टक्के GST दिला जातो, ज्यामुळे ही कार सामन्यांना जरा जास्त महाग वाटते. मात्र, आता जीएसटी कमी होणार अशी बातमी सगळीकडे रंगली आहे.
28 Aug 2025 05:01 PM (IST)
सध्या थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एका रॅलीदरम्यान डीजेसमोर काही तरुणी नाचत होत्या. वेगवेळ्या देवाच्या भूमिकेत डान्स सुरु होता. यावेळी महादेवाची भूमिका साकारणार तरुण खाली बसला आणि अचानक कोसळला. यामुळे सर्वत्र गोंधळ उडाला होता. त्यानंतर तरुणाला रुग्णालयात नेण्याक आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. सांगितले जात आहे की, तरुणाचा हृदयाच्या झटक्याने मृत्यू झाला होता.
28 Aug 2025 04:50 PM (IST)
वंचित बहुजन आघाडीने सम्यक विद्यार्थी आंदोलन राबवत केडीएमसी आयुक्तांना कमळ दिले. आयुक्त भाजपच्या प्रचारात आहेत का, यावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
28 Aug 2025 04:50 PM (IST)
सध्या बॉलीवूडमध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा केला जात आहे. गुरुवारी जान्हवी कपूर आणि सिद्धार्थ मल्होत्राने त्यांच्या आगामी ‘परम सुंदरी’ चित्रपटाच्या यशासाठी बाप्पांचे आशीर्वाद घेतले. दोघेही लालबागच्या राजाला भेट देण्यासाठी गेले होते, तर अभिनेत्री नुश्रत भरुच्चा यांनीही लालबागच्या राजाला भेट देऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. तसेच या सगळ्यांचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
28 Aug 2025 04:40 PM (IST)
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आंदोलकांसह मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होणार आहेत. मराठा आंदोलकांचा हा मोर्चा नवी मुंबईहून मुंबईकडे रवाना होणार आहे.त्यासाठी नवी मुंबईतील मराठा समन्वयकांनी मराठा आंदोलकांसाठी एपीएमसी परिसरातील कांदा बटाटा मार्केटमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र नवी मुंबई पालिका व सिडको प्रशासनाकडून कोणतीही मदत केली नसल्याचा मराठा समन्वयकांनी आरोप केला आहे.
तर मराठा आंदोलक हे नवी मुंबईमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली असून, आज रात्री किंवा पहाटे मनोज जरांगे हे नवी मुंबईमध्ये दाखल होणार असल्याचे मराठा समन्वयकांनी म्हटले आहे.
28 Aug 2025 04:35 PM (IST)
मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मोर्चा निघण्याच्या दोन दिवसांपुर्वी बोलणं झालं होतं. मात्र त्यांचा काही निरोप आला नाही. मग मी तो विषय घेतला नाही. कालही नगरमध्ये भेटावे असे नियोजन होते. मात्र ते मुंबईला जाण्याला ठाम होते. आम्ही चर्चेला तयार आहोत. मनोज जरांगेंचा गैरसमज झाला असेल तर तो दूर करू. मुंबईत आम्ही समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न आहे. शांतपणे ते आंदोलन करतायत त्याच कौतुकचआहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करुन काही फायदा नाही. त्यांना आपण जाब विचारला पाहिजे, मराठा समाजाचा विश्वासघात कोणी केला आहे.
28 Aug 2025 04:30 PM (IST)
विरार पूर्वेतील रमाबाई अपार्टमेंटचा भाग मंगळवारी मध्यरात्री कोसळून मोठी दुर्घटना घडली. ढिगाऱ्याखाली दबून आई आरोही गोयल आणि तिची एक वर्षीय मुलगी उत्कर्षा यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून वाढदिवशीच चिमुकलीचा अंत झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. वडील ओमकार गोयल अद्याप बेपत्ता असून बचावकार्य सुरू आहे. या दुर्घटनेत नऊ जण जखमी झाले असून गेल्या दोन महिन्यांत वसई-विरारमधील ही तिसरी इमारत दुर्घटना आहे.
28 Aug 2025 04:30 PM (IST)
नुकतेच महाराष्ट्रातील १२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट झाल्याने सर्वत्र आनंद व अभिमान व्यक्त केला जात आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांनीही वेगवेगळ्या देखाव्यांद्वारे आपली कला सादर केली आहे. ठाण्यातील कार्तिक निलेश मंडलिक या शाळकरी चिमुकल्याने विशेष देखावा सादर केला आहे. त्याने जागतिक वारसा यादीत समाविष्ट झालेल्या १२ किल्ल्यांचा आकर्षक देखावा उभारला असून त्याचबरोबर प्रत्येक किल्ल्याची माहितीही दिली आहे. हा देखावा तयार करण्यासाठी तब्बल ५ ते ६ दिवसांची मेहनत घेतली असून कार्तिकच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
28 Aug 2025 04:25 PM (IST)
नवी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी विश्रांती, अंघोळ आणि शौचालय सुविधा पुरवण्यासाठी शशीकांत शिंदे यांनी आश्वासन दिले. ते म्हणाले, नेते जातीनुसार विभागले जात आहेत, हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि हा पक्षीय आंदोलन नाही, असं शशीकांत शिंदे यांनी सांगितलं आहे.
28 Aug 2025 04:13 PM (IST)
नवी मुंबईत मराठा आंदोलकांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा मुंबईकडे रवाना होणार असून पालिकेकडून कोणतीही मदत मिळालेली नाही, असं आंदोलकांकडून सांगण्यात येत आहे.
28 Aug 2025 03:47 PM (IST)
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे लाखो मराठा समर्थकांसह मुंबईमकडे निघाले आहेत. यामुळे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
28 Aug 2025 03:44 PM (IST)
PM Modi Meet Mohan Bhagwat: मागील आठ-दहा महिन्यांपासून भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जागा रिकामी आहे. भाजपच्या इतक्या वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती उद्भवली आहे की आठ-दहा महिने भाजपच्या अध्यक्षपदाची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान आता लवकरच हा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे.
28 Aug 2025 03:39 PM (IST)
उत्तर प्रदेशमधून एक मोठी घटना समोर आली आहे. यामध्ये एक पोलीस अधिकारी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना दरडावत आहे. याबाबतचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हायरल झालेला व्हिडीओ उत्तर प्रदेशच्या महाराजगंज मधील असल्याचे समोर आले आहे.
28 Aug 2025 03:23 PM (IST)
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. जरांगे पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबईमध्ये आंदोलन करणार आहेत. यासाठी त्यांचा लाखो समर्थकांसह आणि मराठा बांधवांसह मोर्चा निघाला आहे. जुन्नर मार्गे जरांगे पाटील हे मुंबईमध्ये दाखल होणार आहेत.
28 Aug 2025 02:36 PM (IST)
नवी मुंबई : नवी मुंबईमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढत चालले आहे. अनेक गुन्हे उघड होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आता ऐरोलीमधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ऐरोलीत राहणाऱ्या एका इसमाने आपण मंत्रालयाच्या असिस्टंट कमिशनर तसेच, राज्य शासनाच्या विविध मोठ्या पदांवर असल्याचे सांगून, लोकांची फसवणूक केली आहे. यामध्ये रबाळे पोलिसांनी डॅनियल वाघमारे याला अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या जवळून विविध शासकीय विभागाचे बनावट ओळखपत्र आणि बनावट पासपोर्ट देखील जप्त केला आहे.
28 Aug 2025 02:36 PM (IST)
चित्रपट निर्माती फराह खान सध्या तिच्या यूट्यूब व्लॉगमुळे चर्चेत आहे. दरम्यान, ती तिचा नवीन टॅलेंट शो घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे, ज्याची तिने अधिकृत घोषणा केली आहे. हा शो खूपच अनोखा असणार आहे, ज्याचे नाव ‘आंटी किसको बोला’ हे आहे. सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे फराह खानसोबत गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा देखील या शोमध्ये जज म्हणून दिसणार आहेत. सोशल मीडियावर या शो चा प्रोमो व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामध्ये दोघीनी खूप धमाल करताना दिसत आहेत.
28 Aug 2025 02:35 PM (IST)
देशभरात सगळीकडे गणपती बाप्पाचे मोठ्या जलौषात आगमन झाले आहे. पुढील दहा दिवस सगळीकडे आनंदाचे वातावरण आहे. सणावाराच्या दिवसांमध्ये त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसण्यासाठी वेगवेगळ्या स्किन केअर प्रॉडक्टचा वापर केला जातो. वेगवेगळे स्किन केअर मास्क, फेसपॅक किंवा क्रीम लावून त्वचेची काळजी घेतली जात आहे. चेहरा आधी सुंदर करण्याच्या नादात केमिकलयुक्त प्रॉडक्ट त्वचेचा पूर्णपणे खराब करून टाकतात. सौंदर्य खुलवण्यासाठी वापरले जाणारे स्किन केअर प्रॉडक्ट काहीवेळा त्वचेला हानी पोहचवतात. त्यामुळे चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी कायमच घरगुती पदार्थांचा वापर करावा. घरगुती पदार्थांच्या वापरामुळे त्वचा अधिकच सुंदर आणि चमकदार दिसते. मागील अनेक वर्षांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी बेसन पिठाचा वापर केला जात आहे. बेसन पिठात असलेले गुणधर्म त्वचा अधिक सुंदर करतात.
28 Aug 2025 02:35 PM (IST)
कार खरेदी करताना अनेक जण त्याची किंमत आणि मायलेजवर जास्त लक्षकेंद्रित करत असतात. त्यातही खासकरून शहरात राहणाऱ्या ग्राहकांचा अशा कार्सना पाठिंबा असतो, ज्या रोजच्या वापरात चांगला परफॉर्मन्स देतील. अनेकदा कार खरेदी करताना नेमकी कोणती कार खरेदी करावी याबाबत संभ्रम पाहायला मिळतो. जर तुम्ही सुद्धा उत्तम कारच्या शोधात असाल तर मग आज आपण 5 बेस्ट कारबद्दल जाणून घेऊयात.
28 Aug 2025 02:34 PM (IST)
Kim Jong Un China visit : आंतरराष्ट्रीय राजकारणात नेहमीच गूढतेचा आव आणणारे आणि क्वचितच परदेश दौऱ्यावर जाणारे उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन पुन्हा एकदा जागतिक माध्यमांच्या केंद्रस्थानी आले आहेत. पुढील आठवड्यात किम जोंग उन चीनच्या बीजिंग शहरात होणाऱ्या भव्य लष्करी परेडला सहभागी होणार आहेत. हा दौरा अमेरिकेसाठी नक्कीच धोक्याची घंटा ठरू शकतो, कारण या समारंभात रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचीही उपस्थिती निश्चित झाली आहे.
28 Aug 2025 02:34 PM (IST)
रिलस्टार अथर्व सुदामे याने हिंदू मुस्लीम वादावर रिल शेअर केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला. अथर्व सुदामे याने मुस्लीम मूर्तीकाराकडून मूर्ती खरेदी करण्याबाबत व्हिडिओ केला होता. यावरुन हिंदू महासंघाचे आनंद दवे यांनी जोरदार टीका केली होती. वादानंतर अथर्व सुदामे याने व्हिडिओ डिलीट करत माफी देखील मागितली होती. मात्र आता मित्राच्या मदतीला मित्र धावून आला आहे. आता सुप्रसिद्ध रिलस्टार डॅनी पंडित याने देखील हिंदू मुस्लीम ऐक्यावर रिल शेअर केली आहे.
28 Aug 2025 02:33 PM (IST)
बिग बॉस 19 मध्ये सुरू होण्याच्या दोन महिन्याच्या आधीपासूनच चर्चेचे नाव म्हणजेच गौरव खन्ना. आता बिग बॉस सुरू होऊन तीन ते चार दिवस झाले आहेत आणि सध्या बिग बॉस 19 मध्ये गौरव खन्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. आणखी एक प्रोमो समोर आला आहे. अनेक मागील सीजन मधील स्पर्धकांशी गौरव खन्नाची तुलना केली जात आहे. जियोहॉटस्टारने त्यांच्या सोशल मीडियावर एक प्रमोद शहर केला आहे यामध्ये कुणीका सुदानंद आणि गौरव खन्ना हे दोघेही भांडताना दिसत आहेत.
28 Aug 2025 02:33 PM (IST)
नवी दिल्ली : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) २ दिवसांच्या जपान (Japan) दौऱ्यावर जाणार आहे. गुरुवारी (२८ ऑगस्ट) संध्याकाळी ते जपानासाठी रवाना होतील. या दरम्यान पंतप्रदान मोदी जपानचे पंतप्रधान शिगेरु इशिबा यांची भेट घेणार आहे. पंतप्रधान मोदी १५ व्या भारत-जपान वार्षिक परिषदेसाठी दौऱ्यावर जाणार आहे. हा पंतप्रधान मोदींचा आठवा जपान दौरा असेल.
28 Aug 2025 02:32 PM (IST)
गणेशोत्सव आण मुंबई यांचं समीकरणच वेगळं आहे. देशाची आर्थिक राजधानी, पर्यटन स्थळ, मायानगरी या व्यक्तिरिक्त मुंबईची आणखी एक ओळख म्हणजे गणेश मंडळ. मुंबईकरांच्या पिढ्यान पिढ्या या गणेश मंडळाच्या सेवेत खर्ची झाल्या आहे. फक्त गणपतीची मुर्तीच नाही तर सामाजिक भान जपत ही गणेश मंडळ विविध कार्यक्रम देखील राबवतात. दीड ते पाच दिवसांच्या गणपती विसर्गनानंतर मुंबईच्या या गणेश मंडळांच्या गणपतीचं दर्शन घेण्यास आणि देखावा पाहण्यास मुंबईकर मोठ्या प्रमाणात येत असतात. त्यातील एक प्रसिद्ध मंडळ म्हणजे लालबागचा राजा.
28 Aug 2025 01:55 PM (IST)
तुर्की हा देश सध्या जगभरात फक्त राजकारण किंवा परराष्ट्र धोरणामुळेच नाही, तर आपल्या अत्याधुनिक सुरक्षाव्यवस्थेमुळेही चर्चेत आला आहे. राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या सैन्याला एक असे हत्यार दिले आहे, जे भविष्यात तुर्कीच्या सुरक्षेचे सर्वात मोठे कवच ठरणार आहे याचे नाव आहे स्काय डोम सिस्टम (Sky Dome System).४७ वाहनांनी बनलेली ही अत्याधुनिक हवाई संरक्षण प्रणाली तब्बल ४६० दशलक्ष डॉलर्स किमतीची आहे. त्याचबरोबर, तुर्की सरकारने देशातील ८१ प्रांतांमध्ये भूमिगत बंकर उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. या सर्व घडामोडींमुळे मुस्लिम जगतात तुर्की आज “सर्वात सुरक्षित देश” म्हणून उदयास येत आहे.
28 Aug 2025 01:50 PM (IST)
राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर नेत्यांच्या भेटीगाठी देखील वाढल्या आहेत. दरम्यान, गणेशोत्सावाच्या निमित्ताने राजकीय नेते हे एकमेकांच्या घरी भेट देत आहे. मनसे नेते राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे आले होते. सकाळी ठाकरे बंधूंची भेट झाल्यानंतर रात्री राज ठाकरेंच्या घरी मुख्यमंत्री फडणवीस हे देखील आले होते. यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्रित येण्यावर टोमणा मारला. यावर आता खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे.
28 Aug 2025 01:45 PM (IST)
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे लाखो मराठा समर्थकांसह मुंबईमकडे निघाले आहेत. यामुळे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे असे सत्ताधारी नेत्यांकडून विचारले जात आहे. अशातच आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मराठा आरक्षणाबाबत प्रतिक्रीया दिली आहे.
28 Aug 2025 01:40 PM (IST)
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. जरांगे पाटील हे लाखो मराठा समर्थक आणि बांधवांसह मुंबईमध्ये येणार आहेत. यामुळे राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. जरांगे पाटील यांनी महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र विरोधकांची मराठा आरक्षणाबाबत भूमिका काय आहे असे सत्ताधारी नेत्यांकडून विचारले जात आहे. खासदार संजय राऊत यांनी मराठा आरक्षणाबाबत शिवसेना ठाकरे गटाची भूमिका मांडली आहे.
28 Aug 2025 01:30 PM (IST)
भारताला सतत त्रास देणारा आणि असंख्य जीव घेतलेला दहशतवाद आता नव्या मार्गाने भारतात घुसखोरी करत आहे. पाकिस्तान समर्थित दहशतवादी संघटना ‘जैश-ए-मोहम्मद’चे तीन दहशतवादी उस्मान, हसनैन अली आणि आदिल हुसेन अलीकडेच नेपाळमार्गे भारतात घुसल्याची माहिती समोर आली आहे. बिहार पोलिस मुख्यालयाने याबाबत हाय अलर्ट जारी केला असून या तिघांचा शोध सुरू आहे. हा प्रकार नवीन नाही. २०१३ पासून आतापर्यंत नेपाळमार्गे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न अनेक दहशतवाद्यांनी केला आहे. यामध्ये यासीन भटकळ, अब्दुल करीम टुंडा आणि तहसीन अख्तर यांसारख्या कुख्यात दहशतवाद्यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो नेपाळमार्गेच भारतात घुसणे दहशतवाद्यांसाठी सोपे का आहे?
28 Aug 2025 01:20 PM (IST)
रशियावर निर्बंध, पुतिन यांच्यावरील नाराजी आणि भारतावर लादलेले कर या सगळ्या राजकीय आणि आर्थिक दबावांमध्ये अमेरिकेने नुकताच घेतलेला निर्णय जगाच्या लक्षात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून हिरे आयात करण्यास अंशतः परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारालाच नाही तर भारत, चीन आणि युरोपसारख्या बाजारपेठांनाही मोठा धक्का बसू शकतो.
28 Aug 2025 01:10 PM (IST)
मराठी चित्रपटसृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन झाले आहे. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी मुंबईतील राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘चिमणराव’ या मालिकेतून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले. त्यांची गुंड्याभाऊची भूमिका प्रेक्षकांना खूप आवडली. अभिनय क्षेत्रात त्यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही न भरून निघणारी आहे.
28 Aug 2025 01:05 PM (IST)
भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता दक्षिण अमेरिकन देश अर्जेंटिनामध्ये विना व्हिसा तुम्हाला जाता येणार आहे. पण यासाठी एक अट मान्य करावी लागाणार आहे. अर्जेंटिनाने भारतीयांना देश व्हिसा मुक्त प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. मात्र यासाठी भारतीयांकडे अमेरिकेचा पर्यटक व्हिसा असणे आवश्यक आहे. याची माहिती अर्जेंटिनाचे भारतातील राजदूत मारियानो कौसिनो यांनी सोशल मीडियावरुन दिली.
28 Aug 2025 12:05 PM (IST)
"तुम्ही या प्रवासात तुमची सर्व शक्ती पणाला लावली आहे. लहान मुले येत आहेत, ते माझ्या कानात सांगत आहेत की नरेंद्र मोदी मते चोरतात. कर्नाटकात, आम्ही भाजपने मते चोरल्याचे पुरावे देऊन दाखवले आहे. त्याआधी, मी कधीही असे म्हटले नाही की भाजप आणि निवडणूक आयोग मते चोरत आहेत. आतापर्यंत मी फक्त कर्नाटकचा पुरावा दिला आहे. येणाऱ्या काळात मी लोकसभा निवडणुका आणि हरियाणा निवडणुकीचे पुरावे देईन. आम्ही हे सिद्ध करू की भाजप आणि आरएसएस मते चोरून निवडणुका जिंकतात..." अशी टीका लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी टीका केली आहे.
28 Aug 2025 12:00 PM (IST)
मुंबईमध्ये पुन्हा एकदा वरुणराजाने आगमन केले आहे. गणेशोत्सवाचा मोठा उत्साह असताना दुसरीकडे पावसाने हजेरी लावली आहे. दादरभागामध्ये संततधार पावसाची सुरुवात झाली आहे.
28 Aug 2025 11:50 AM (IST)
गोरगरीब मराठ्यांची नाराजी अंगावर घेतली की, पुढच्या काळात काय होईल?. बहुमताची सत्ता मराठ्यांशिवाय आली नाही. मराठ्यांच्या नाराजीची लाट तुमच्याविरोधात गेली, तर येणारे दिवस तुमचे राजकीय करिअर बरबाद करणारे असतील” असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
28 Aug 2025 11:40 AM (IST)
मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे. लाखो समर्थकांसह मनोज जरांगे पाटलांचा मोर्चा मुंबईकडे रवाना झाला असून यावेळी तुफान गर्दी दिसून येत आहे.
28 Aug 2025 11:30 AM (IST)
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे अथर्वशीर्ष पठन आयोजित करण्यात आले होते. यानिमित्ताने ॠषीपंचमीनिमित्त पहाटे स्त्री शक्तीचा जागर दिसून आला. तब्बल ३५ हजार महिलांनी एकत्र येत अथर्वशीर्ष पठणातून गणरायाला नमन केले. गणेश नामाचा जयघोष करीत ॠषीपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यात उर्जेने भारलेल्या वातावरणामध्ये हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक यानिमित्ताने पहायला मिळाला. अथर्वशीर्षासोबत महाआरती आणि गणरायाचा गजर करीत महिलांनी स्त्री शक्तीचा जागर केला.
28 Aug 2025 11:20 AM (IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याने मनसे नेते राज ठाकरे यांच्या घरी गणेशोत्सवानिमित्ताने भेट दिली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी सचिन तेंडुलकर यांनी कुटुंबासह बाप्पाचे दर्शन घेतले.
भारतरत्न श्री. सचिन तेंडुलकर यांनी राजसाहेबांच्या शिवतीर्थ या निवास्थानी येऊन सहपरिवार गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं...#गणेशोत्सव #MNSAdhikrut pic.twitter.com/jCCmcMPGYW
— MNS Adhikrut - मनसे अधिकृत (@mnsadhikrut) August 28, 2025
28 Aug 2025 11:09 AM (IST)
मराठी साहित्य विश्वामध्ये बहूमूल्य योगदान देणारे व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी अनेक कांदबरी आणि कथासंग्रहांचे लेखन केले आहे. विख्यात साहित्यिक ग. दि. माडगूळकर ह्यांचे व्यंकटेश हे धाकटे बंधू होते. त्यांनी अनेक कादंबरी, कथासंग्रह लिहिले. यातील एक लोकप्रिय कादंबरी म्हणजे बनगरवाडी आहे. याचबरोबर वावटळ, पुढचं पाऊल, करुणाष्टक आणि सत्तांतर अशा अनेक कादंबरी लिहिल्या आहेत. आजच्या दिवशी 2001 साली व्यंकटेश दिगंबर माडगूळकर यांनी जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांची साहित्यकृती अजूनही त्यांचे अस्तित्व टिकवून आहे.
28 Aug 2025 10:55 AM (IST)
गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ सुरु असलेल्या रशिया युक्रेन युद्धाने (Russia Ukraine War) संपूर्ण जगाला चिंतेत टाकले आहे. हे युद्ध दिवसेंदिवस घातल होत चालले आहे. रशियाने युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. नुकतेच रशियाने युक्रेनची राजधनी कीवर पुन्हा एकदा मोठा हल्ला केला आहे. यामध्ये क्षेपणास्त्रे आणि ड्रोन्सचा वापर करण्यात आला आहे. वाचा सविस्तर
28 Aug 2025 10:50 AM (IST)
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या शेजारी देशांमधील तणाव पुन्हा एकदा टोकाला पोहोचला आहे. पाकिस्तानने सोमवारी सकाळी अफगाणिस्तानातील खोस्त आणि नांगरहार प्रांतात मोठे हवाई हल्ले केले. पाकिस्तानी हवाई दलाने केलेल्या या कारवाईत मुलांसह किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. डुरंड रेषेजवळ झालेल्या या कारवाईमुळे दोन्ही देशांमध्ये तणावाची स्थिती अधिकच तीव्र झाली आहे.
28 Aug 2025 10:45 AM (IST)
आता या चेंगराचेगरी प्रकरणाच्या तीन महिन्यानंतर आरसीबीच्या सोशल मिडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे. यामध्ये त्यांनी पुन्हा नव्याने सुरु करण्यासाठी संदेश दिला यामध्ये नक्की त्यांनी काय म्हटले आहे यासंदर्भात सविस्तर वाचा.
28 Aug 2025 10:30 AM (IST)
भारतामध्ये गणेशोत्सव साजरा केला जात आहे, घरोघरी गणरायाचे स्वागत केले जात आहे. त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. भारताचे क्रिकेट खेळाडू सध्या विश्रांती करत आहेत त्याचबरोबर गणरायाचे स्वागत आणि सेवा करण्यात देखील व्यस्त आहेत. आता रोहित शर्मापासून ते जहीर खानपर्यत सर्वानीच सोशल मिडियावर त्याच्या गणरायाचे फोटो शेअर करुन शुभेच्छा दिल्या आहेत.
28 Aug 2025 10:20 AM (IST)
मोठ्या स्पर्धा आणि मालिकांमध्ये सातत्याने दुर्लक्षित राहिल्यानंतर शमीच्या निवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मोहम्मद शमीला हा प्रश्न विचारला असता, त्याने त्याच्या टीकाकारांची तोंडे बंद केली, “मला सांगा, मी कोणाचा जीवनरत्न बनलो आहे की तुम्ही मला निवृत्ती घ्यायची इच्छा बाळगता?” चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताच्या विजयात शमीने महत्त्वाची भूमिका बजावली, तो ९ विकेट्ससह स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.
28 Aug 2025 10:10 AM (IST)
मुंबई म्हटले की गणेशोत्सवाची धामधूम आपोआप डोळ्यांसमोर उभी राहते. लालबागचा राजा, अंधेरीचा गणेश, गिरगावचा गणपती… असे कितीतरी मानाचे मंडळे आहेत. पण या सगळ्यांमध्ये एक विशेष नाव घेतले जाते माटुंग्याच्या किंग्ज सर्कलमधील जीएसबी सेवा मंडळ. दरवर्षी इथे गणेशोत्सवाची भक्तीभाव आणि परंपरांची अद्भुत सांगड पाहायला मिळते. पण यंदा या मंडळाने केलेला विक्रम सगळ्यांचे लक्ष वेधून घेतोय. 474.46 कोटी रुपयांचा विमा हा आकडा ऐकूनच आश्चर्य वाटते. भारतातील कोणत्याही गणेश मंडळाचा इतका मोठा विमा आतापर्यंत काढला गेला नव्हता. हा विक्रम आता जीएसबी सेवा मंडळाच्या नावावर जमा झाला आहे.
28 Aug 2025 09:45 AM (IST)
चालकाच्या चुकीमुळे अनेक अपघात होताना दिसत आहे. त्यात नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी-मंगरुळ पांदण रस्त्यावर मंगळवारी (दि. २६) दुपारी सव्वा एकच्या सुमारास भीषण घटना घडली. टोलनाका वाचवण्यासाठी कंटेनर ट्रक पांदण रस्त्याने जात असताना 11 हजार व्होल्टच्या विद्युत तारेच्या स्पर्शाने चालकाचा जागीच मृत्यू झाला.
28 Aug 2025 09:30 AM (IST)
जातवैधता प्रमाणपत्रासाठी पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. आता अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एसईबीसी आणि ओबीसी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, यापूर्वी मुदतवाढ मिळूनही प्रमाणपत्र सादर न केलेल्यांसाठी ही शेवटची संधी असणार आहे.
28 Aug 2025 09:20 AM (IST)
दहशतवादी हल्ल्यावर मात करण्यासाठी वाशिम जिल्हा पोलिस दलाच्या वतीने कारंजा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग टोलनाक्यावर रंगीत तालीम घेण्यात आली. ही तालीम उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिनेशचंद्र शुक्ला यांच्या उपस्थित घेण्यात आली.
Marathi Breaking News Live Updates : जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांत अतिमुसळधार पाऊस झाला. या झालेल्या विक्रमी पावसाने पूर आणि भूस्खलनामुळे मोठे नुकसान झाले. श्री माता वैष्णोदेवी यात्रा मार्गावर झालेल्या भूस्खलनात मृतांचा आकडा बुधवारी 34 वर पोहोचला. या मुसळधार पावसाने गेल्या 115 वर्षांचा रेकॉर्डच मोडल्याचे दिसून येत आहे. याचा फटका तेथील नागरिकांना बसला आहे.
गेल्या काही दिवसांपासून देशातील विविध राज्यांत मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. त्यात आता जम्मूमध्ये नद्यांच्या लाटेमुळे अनेक प्रमुख पूल, घरे आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांसह सार्वजनिक पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झाले आहे. सैन्यासह सर्व संस्था बचावकार्यात व्यस्त आहेत. आतापर्यंत 10000 हून अधिक लोकांना पूरग्रस्त भागातून बाहेर काढण्यात आले आहे.